31 डिसेंबर ते 2 जानेवारी विभागीय महसुल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा …
वाशिम, दि. 01 जानेवारी 2023 : विभागीय महसुल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा 2022-23 चे आयोजन 31 डिसेंबर 2022 ते 2 जानेवारी 2023 या कालावधीत जिल्हा क्रीडा संकुल, वाशिम येथे आयोजित करण्यात आले आहे.
31 डिसेंबर रोजी विभागीय आयुक्त डॉ.दिलीप पांढरपट्टे यांच्या हस्ते स्पर्धेचे उदघाटन होणार आहे. अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी वसुमना पंत ह्या असतील. प्रमुख पाहुणे म्हणून अकोला जिल्हाधिकारी श्रीमती निमा अरोरा,अमरावती जिल्हाधिकारी श्रीमती पवनीत कौर, यवतमाळ जिल्हाधिकारी अमोल येडगे व बुलढाणा जिल्हाधिकारी एच.पी. तुम्मोड यांची तर विशेष अतिथी जिल्हा पोलीस अधिक्षक बच्चन सिंह, उपायुक्त (सामान्य) संजय पवार, उपायुक्त (पुरवठा) अजय लहाने, उपायुक्त (पुनर्वसन) गजेंद्र बावणे, उपायुक्त (रोहयो) दिलीप गुट्टे, यवतमाळ अपर जिल्हाधिकारी प्रमोद दुबे, अमरावती अपर जिल्हाधिकारी रामदास सिध्दभट्टी, बुलढाणा अपर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे व अकोला अपर जिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे यांची उपस्थित राहणार आहे.
2 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी वसुमना पंत यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त डॉ.दिलीप पांढरपट्टे यांच्या हस्ते बक्षिस वितरण समारंभ पार पडणार आहे. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा अधिक्षक पोलीस अधिकारी बच्चन सिंह हे असतील. तर अपर जिल्हाधिकारी शहाजी पवार, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, उप जिल्हाधिकारी (रोहयो) कैलास देवरे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी संदिप महाजन, उप जिल्हाधिकारी (भुसंपादन- 2) नितीन चव्हाण, उप जिल्हाधिकारी (भुसंपादन-1) श्रीमती सुहासीनी गोणेवार,वाशिम उपविभागीय अधिकारी प्रकाश राऊत, जिल्हा पुरवठा अधिकारी तेजश्री कोरे, मंगरुळपीर उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे, मानोरा तहसिलदार ज्ञानेश्वर घ्यार, मालेगांव तहसिलदार रवि काळे,वाशिम तहसिलदार विजय साळवे,रिसोड तहसिलदार अजित शेलार, मंगरुळपीर तहसिलदार शितल बंडगर, कारंजा तहसिलदार धिरज मांजरे, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी राजेश वझीरे, तहसिलदार, नायब तहसिलदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय साळवे, महसुल कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रविंद्र राऊत,मंडळ अधिकारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मुकुंद,तलाठी संघटनेचे जिल्हाध्यक्ष किसन महाले, महाराष्ट्र महसुल चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष बबन व्यवहारे व कोतवाल संघटनेचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर भिल प्रामुख्याने उपस्थित राहणार आहे.