त्र्यंबकेश्वर ता.9 ऑगस्ट 2022 – येथे जागतिक आदिवासी दिन आ. हिरामण खोसकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये साजरा झाला.
आदिवासी दिन गेल्या दोन वर्षांची कमतरता प्रबोधनात्मक कार्यक्रम करून भरून काढण्यात आली. नियोजन जागतिक आदिवासी उत्सव समिती त्र्यंबक शहर व तालुका यांनी केले होते. आदिवासी सांस्कृतिक रॅलीचे नियोजन करण्यात आले. तारपा नृत्य, मोगरा नृत्य, कांबड नृत्य अशा वैविध्यपूर्ण रॅली त्रंबकेश्वर शहरात काढली त्याचबरोबर श्री चंद्र लॉन्स या ठिकाणी गुणवंतांचा सत्कार, आदिवासी समाज प्रबोधन पर कार्यक्रम, आदिवासी सांस्कृतिक नृत्य आदिवासी, महापुरुषांची रांगोळी काढणे, तसेच आदिवासी महापुरुषांची वेशभूषा धारण केली.

या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे श्री चंद्र लॉन्स चौकास आद्य क्रांतिकारक वीर राघोजी भांगरे चौक असे नामकरण करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती व नगर सेवक उपस्थित होते. समाजाचे नगरसेवक, ग्रामीण भागतील नेतेमंडळी, कार्यकर्ते, पदाधिकारी या सर्वांनीच अथक परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला. नगरीत भव्य शोभायात्रा मिरवण्यात आली. सर्वांच्या सहकार्याबद्दल विजय पुराणिक यांनी आभार मानले. रॅलीत युवक वर्ग सहभागी होता.