जिल्हाधिकारी कार्यालयात वीर पत्नी व मातांचा सत्कार…

वाशिम, दि. १२ ऑगस्ट २०२२ : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त “ घरोघरी तिरंगा ” या उपक्रमाबाबत जनजागृती करण्यासाठी वाशिम शहरातून आज 12 ऑगस्ट रोजी मोटार सायकल रॅली काढण्यात आली. या रॅलीत सहभागी वीर पत्नी व माता श्रीमती शांताबाई सरकटे, श्रीमती पार्वती लहाने व श्रीमती मीराबाई नागुलकर यांची मिरवणूक काढण्यात आली. रॅलीचा समारोप जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात झाल्यानंतर वीर पत्नी व मातांचा जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात सत्कार करण्यात आला.

जिल्हाधिकारी कार्यालयात वीर पत्नी व मातांचा सत्कार…

जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांच्या हस्ते वीर पत्नी व माता श्रीमती शांताबाई सरकटे, श्रीमती पार्वती लहाने व श्रीमती मीराबाई नागुलकर यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व साडीचोळी देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी जिल्हयातील माजी सैनिक मोठया संख्येने उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment