संभाजीनगर, दिनांक 19 ऑगस्ट 2022 : सार्वजनिक न्यासाव्यातिरिक्त गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळ, नागरिकांनी महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियमानुसार वर्गणी गोळा करण्यासाठी विहित नमुन्यात अर्ज सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयात करणे अनिवार्य असल्याचे सहायक धर्मादाय आयुक्त स.वि. पवार यांनी कळवले आहे.
विहित नमुन्यातील अर्ज https://charity.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन उपलब्ध आहे.

अर्ज ऑनलाईन वा ऑफलाइन पद्धतीने करता येईल. संकेतस्थळावर प्राथमिक कार्यपद्धती या सदराखाली कलम 41-क परवानगी अर्ज नमुना या शीर्षकात अर्जाचा नमुना उपलब्ध आहे. नमुना डाउनलोड करून त्यात आवश्यक ती माहिती भरून अर्जदारांनी त्यांच्या ओळखपत्रांच्या प्रतीसह धर्मादाय आयुक्त कार्यालयात अर्ज सादर करावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.