सिंधुदुर्गनगरी, दि. 20ऑग 2022 : राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, भारत सरकार यांच्या मार्फत आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्था यांना ‘सुभाषचंद्र बोस आपदा प्रबंधन पुरस्कार’ देवून सन्मानित केले जाणार आहे. या पुरस्कारासाठी 31 ऑगस्ट 2022 पर्यत https://ndma.gov.in या लिंकवर ऑनलाईन पध्दतीने अर्ज करण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय भडकवाड यांनी केले आहे.
आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात आपत्ती प्रतिबंध, आपत्ती पुर्वतयारी, आपत्ती सौम्यीकरण, शोध व बचाव कार्य, आपत्ती प्रतिसादाचे कार्य, मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन अनुषंगाने संशोधन, नाविन्यपूर्ण संकल्पना आणि आपत्तीपूर्व सूचना प्रणाली या क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्था सुभाषचंद्र बोस आपदा प्रबंधन पुरस्कार 2023 साठी ऑनलाईन पध्दीने अर्ज करु शकतात.

पुरस्कारासाठी 3 व्यक्ती किंवा संस्था यांची निवड केली जाईल.संस्थेची निवड झाल्यास संस्थेस रक्कम रु. 51 लाख आणि प्रशस्तीप्रत्र देण्यात येईल. संस्थेला मिळालेली रक्कम आपत्ती व्यवस्थापन कार्यासाठी वापरणे बंधनकारक असेल. या पुरस्कारासाठी व्यक्तीची निवड झालेल्यास रक्कम रु. 05 लाख आणि प्रशस्तीपत्र देण्यात येईल. आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात कार्य करणारी भारतीय नागरिक असलेली व्यक्ती किंवा भारती संस्था अर्ज करु शकते.
पुरस्कार प्राप्त व्यक्ती आणि संस्था यांची नावे 23 जानेवारी 2023 या दिवशी सुभाष चंद्र बोस यांच्या जयंतीदिनी केंद्र शासनामार्फत जाहीर करण्यात येतील. पुरस्काराची अधिक माहितीसाठी https://ndma.gov.in या वेब साईटला भेट द्यावी. जिल्ह्यातील पात्र व्यक्ती आणि संस्था जास्तीत जास्त पुरस्कारासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज दाखल करावेत असे ही आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. भडकवाड यांनी केले आहे.