अकोला दि.22 (आजचा साक्षीदार) – जिल्हा नियोजन समिती निवडणुकीचा कार्यक्रम घोषीत झाला आहे. कार्यक्रमानुसार सोमवार दि. 29 ऑगस्ट रोजी मतदान तर मंगळवार दि. 30 रोजी मतमोजणी होणार आहे, अशी माहिती जिल्हा नियोजन समिती निवडणूक निर्वाचन अधिकारी अनिल खंडागळे यांनी दिले आहे.

यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रानुसार, जिल्हा नियोजन समितीची निवडणूक सोमवार दि. 29 ऑगस्ट रोजी सकाळी आठ ते सायंकाळी पाचवाजेपर्यंत लोकशाही सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला या मतदान केंद्रात होईल. निवडणूकीकरीता एकूण मतदारांची संख्या 53 आहे. तसेच मतमोजणी मंगळवार दि. 30 रोजी सकाळी 10 वाजेपासून छत्रपती सभागृह, नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला येथे होणार आहे.