पहिला पाऊस पडला कि, उकाड्याने त्रस्त असलेले आपण सुखावून जातो. त्यामुळे प्रत्येकजण चातकाप्रमाणे पावसाची वाट पाहत असतो. मात्र पाऊस जितका सुखावह तितकाच तो अनेक आजारांना आमंत्रण देणारा देखील असतो. त्यामुळे यावेळी विशेष काळजी घेण गरजेचे आहे. आपण या लेखात पाहणार आहोत, पावसाळयात कोणता गोष्टींची काळजी घेवयाला हवी, पावसाळ्यात पायाच्या भेगा घालवायच्या असल्यास काय करावे, पावसाळ्यात घरी करता येण्याजोगे व्यायाम कोणते, पावसाळ्याती चहा आणि पावसाळ्यात काय करावे आणि काय करू नये याबाबत माहिती व त्यावर एक नजर…
पावसात भिजताय? तर ‘या’ गोष्टींची काळजी घ्याच…
Health Tips for Rainy season : पहिला पाऊस पडला कि, उकाड्याने त्रस्त असलेले आपण सुखावून जातो. त्यामुळे प्रत्येकजण चातकाप्रमाणे पावसाची वाट पाहत असतो. मात्र पाऊस जितका सुखावह तितकाच तो अनेक आजारांना आमंत्रण देणारा देखील असतो. त्यामुळे यावेळी विशेष काळजी घेण गरजेचे आहे. त्यावर एक नजर…
- पावसात भिजण्यापूर्वी शक्यतो हाफ स्लिव वा शॉर्ट असे कपडे घालावेत. जेणेकरून ओल्या कपड्यात सर्दी वा थंडी पकडणार नाही.
- त्वचेची काही समस्या असल्यास त्वचेला बॉडी लोशन लावून पावसात बाहेर पडा.
- पावसाच्या पाण्याने केस ड्राय होतात त्यामुळे पावसात भिजल्याचे असेल तर भिजताना केसांना छान तेल लावून जा त्यामुळे तुमच्या केस ड्राय होणार नाहीत
- पावसात भिजताना मोकळ्या जागी पावसात भिजा. कारण पन्हाळ्या खाली, शेड्सखाली उभे राहिले तर छपरांवरील सर्व धूळ, कचरा हा खाली फेकला जातो.
- पावसातून भिजल्या नंतर केस त्वरित पुसून घ्या त्यामुळे काही आजार उद्भवणार नाही.
- पावसातून भिजल्या नंतर जमल्यास गरम पाण्याने आंघोळ करावी त्यामुळे काही आजार उद्भवणार नाही.
पावसाळा ऋतूत पायाच्या भेगा घालवायच्या असल्यास…
Health Tips for Rainy season : पावसाळा ऋतू सुरु झाल्याने आरोग्यासंबंधित विविध आजार डोके वर काढत असतात. अशात आपल्या पायांची काळजी घेणे फार महत्वाचे आहे. कारण पावसाळा ऋतू मध्ये अनेकांच्या पायांना भेगा पडल्याचे दिसून येते.
पायाच्या भेगा घालवायच्या असल्यास तुम्ही खालील सोपे उपाय करा…
- पावसाळा ऋतू मध्ये पायांना भेगा पडल्यास कडुलिंबाचा पाल्याचा रस पायांना लावा. यामुळे भेगा कमी होण्यास मदत होईल.
- पावसाळा ऋतू मध्ये दररोज रात्री झोपण्यापूर्वी आपल्या पायांना कोणतीही सॉफ्ट क्रिम लावा. याने त्वचा मऊ होऊन पायांची आग कमी होईल.
- पावसाळा ऋतू मध्ये भेगा पडलेल्या ठिकाणी चंदनाचा लेप लावल्यासही भेगा कमी होतात.
- लोणी, आंबेहळद आणि मीठ यांचे एक मिश्रण तयार करुन दररोज पायांना लावल्यास फायदा पावसाळा ऋतू मध्ये होईल.
- व्हॅसलिन, जैतून तेल आणि बोरिक पावडर एकत्र करुन भेगांमध्ये भरा. याने पायाच्या भेगा भरण्यास पावसाळा ऋतू मध्ये मदत होईल.
पावसाळा ऋतू आणि घरी करता येण्याजोगे व्यायाम
Health Tips for Rainy season : निरोगी आयुष्य जगण्यासाठी व्यायाम अतिशय गरजेचा आहे. मात्र पावसाळा ऋतू आला की, विविध कारणाने आपले व्यायामातील सातत्य खंड होते. म्हणून पावसाळा ऋतू मध्ये घरी करता येण्याजोगे व्यायाम प्रकार पाहुयात…
- घर किंवा इमारतीतील जिने चढ उतार करणे हा देखील उत्तम आणि सोप्पा व्यायाम प्रकार आहे आणि जे करणे सहज शक्य आहे.
- शरीराचा वॉर्मअप होण्यास मदत होण्यासाठी पावसाळ्यामध्ये घरच्या घरी स्ट्रेचिंग करून तुम्ही तुमच्या व्यायामाला सुरुवात करू शकता.
- इंटरनेटवर असणारे अएरोबिक व्यायामाचे प्रकारचे अनेक व्हिडीओ उपलब्ध आहेत. तुम्ही डॉक्टर किंवा आहारतज्ञाला विचारून तुमच्या शरीरासाठी योग्य तो अएरोबिक व्यायामाचे व्हिडीओ शोधून घेऊन दररोज वापरू शकता.
- शरीरातील मांसपेशी मजबूत करण्यासाठी दोरीच्या उड्या तसेच जंपिंग जॅक यांसारखे व्यायाम प्रकार तुम्ही करू शकता.
- पावसाळा ऋतू मध्ये घरातील बरीच कामेसुद्धा आपल्याला छान व्यायाम मिळवून देऊ शकतात.
अशा रीतीने आता आपण पावसाळा ऋतू मध्ये सुद्धा निरोगी आणि सशक्त राहण्याचे अनेक मार्ग आपल्यासमोर उपलब्ध आहेत.
पावसाळा ऋतूत ‘हा’ चहा आरोग्यास फायदेशीर
Health Tips for Rainy season : पावसाळा ऋतू आला कि, चहाप्रेमींसह सर्वांनाच गरमागरम चहा पिण्याची तलप येत असते. मात्र पावसाळ्यात चहासोबत काही गुणकारी आणि औषधी किंवा घरातील इतर गोष्टी टाकल्यास साथीच्या आजारापासून दूर राहणे शक्य आहे. त्याबाबत जाणून घेऊयात…
- पावसाळा ऋतू मध्ये चहामध्ये आले किसून टाकल्याने शरीरात उष्णता निर्माण होते आणि तुम्ही सर्दी, कफ यांसारख्या आजारांपासून दूर राहतात.
- पावसाळा ऋतू मध्ये आले आणि तुळशीची पाने चहामध्ये वापरल्याने शरीराला आराम मिळतो व पचनक्रिया सुधारते. .
- पावसाळा ऋतू मध्ये गवती चहा देखील शरीरास गुणकारी आहे. त्यामधील औषधी गुणांना ताप, सर्दी, खोकला यांसारख्या आजारांपासून आराम मिळतो.
- पावसाळा ऋतू मध्ये काळी मिरी वा दालचिनी घातलेला चहाइन्सुलिन सेन्सिव्हिटी वाढविण्यासाठी फायदेशीर ठरतो यापासून तुम्ही बऱ्याच आजरांपासून दूर राहतात.
- पावसाळा ऋतू मध्ये वेलची आणि जायफळ यांची पावडर करून ती चहामध्ये वापरल्यास ताजेतवाने वाटते आणि मनोबल वाढते.
पावसाळ्यात ‘या’ गोष्टी टाळाच…!
Health Tips for Rainy season : हवाहवासा पावसाळा आरोग्याच्या अनेक समस्यांना घेऊनच येतो. त्यामुळे पावसाळा ऋतू मध्ये आपले शरीर निरोगी ठेवायचे असेल तर काही काही गोष्टी टाळणे गरजेचे आणि महत्वाचे आहे. त्यावर एक नजर…
पावसाळ्यात खालील पदार्थ खाणे टाळा :
- पावसाळा ऋतू मध्ये शिळे किंवा रस्त्यावरचे अन्न खाऊ नका.
- पावसाळा ऋतू मध्ये शरीराची पचनशक्ती कमजोर झालेली असते. आणि अशातच बेसनाने बनलेली भजी पचनशक्तीवर प्रचंड ताण आणतात त्यामुळे ती खाणे टाळा.
- पावसाळा ऋतू मध्ये प्रदूषित पाण्याची समस्या असल्याने आपण खाणारे चटकदार (पाणीपुरी, दहिपुरी, रगडा पॅटीस, भेळपुरी) पदार्थ आपल्याला आजारी बनवू शकतात म्हणून ते खाणे टाळा.
- अस्वच्छ आणि शरीरास अपायकारक पदार्थ खाल्ल्याने विविध समस्या होऊ शकतात. म्हणून ते शक्यतो टाळाच.
- पावसाळा ऋतू हा माशांच्या प्रजननाचा काळ असल्याने या काळात मासे खाणे टाळा.
- पावसाळा ऋतू मध्ये पचनशक्ती कमजोर होत असल्याने किमान पावसाळ्यात तरी कार्बनेटेड पेये पिणे टाळलेले उत्तम.
पावसात भिजल्यावर ‘या’ गोष्टी कराच…!
Health Tips for Rainy season : पावसाळा सुरू झाल्यामुळे अनावधानाने का होईना आपण भिजतोच. अशात आपल्याला अधिकच खबरदारी घेण्याची गरज आहे. असे केले नाही तर आजारी पडण्याची शक्यता जास्त असते.
- कपडे बदला : पावसात भिजले असाल तर सर्वात आधी कपडे बदला. अन्यथा यामुळे थंडी लागून थंडी ताप या सारख्या आजाराने आजारी पडण्याची शक्यता निर्माण होते.
- केस वाळवून घ्या : पावसात भिजले असाल तर कोमट पाण्याने अंघोळ करा. नंतर आपल्या संपूर्ण शरीराला विशेषतः आपल्या केसांना वाळवून घ्या. कारण केस ओले झाल्यामुळे डोक्यात संसर्गाचा धोका वाढू शकतो.
- खाण्यापिण्याची काळजी : पावसाळा ऋतू मध्ये सर्वत्र पाणीच पाणी असल्यामुळे व्हायरल आणि बेक्टेरियल संसर्गाचा धोका वाढतो. त्यामुळे खाण्यापिण्याची विशेष काळजी घेतली पाहिजे.
- तेलकट, फास्ट फूड टाळा : पावसाळा ऋतू मध्ये बाहेरचे खाद्यपदार्थांचे सेवन केल्याने आपले पोट खराब होऊ शकत. त्यातच जर तुम्ही भिजला असाल तर असे पदार्थ खाणे टाळाच.
- व्यायाम कराच : पावसाळा ऋतू मध्ये हलके-फुलके व्यायाम करा. याने आपण तंदुरुस्त राहाल. तसेच बाहेरून भिजून आल्यावर ताणण्याचे व्यायाम केल्यास शरीरामध्ये पटकन उब येईल.