भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती अर्ज भरण्यास 31 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ

कोल्हापूर, दि. 29 : भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनेंतर्गत विमुक्त जाती व भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांनी अद्यापही शिष्यवृत्तीचे अर्ज भरलेले नाहीत त्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्यासाठी 31 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर तात्काळ अर्ज भरावेत, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे प्रभारी सहायक आयुक्त सचिन साळे यांनी केले आहे.

भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती अर्ज भरण्यास 31 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ

विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्यासाठी 14 डिसेंबर 2021 पासून सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. त्यामुळे अद्यापही ज्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरलेले नाहीत त्या विद्यार्थ्यांसाठी शासन स्तरावरुन सन 2021-22 मधील शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्यासाठी 31 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांनी त्यांच्या स्तरावर प्रलंबित असणारे अर्ज छाननी करुन लवकरात-लवकर ऑनलाईन प्रणालीतुन सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाकडे वर्ग करावेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment