सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरण : अटकपूर्व जामिनासाठी रिया चक्रवर्तीचे केले प्रयत्न सुरू Sushant Singh Rajput Latest News

सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरण : अटकपूर्व जामिनासाठी रिया चक्रवर्तीचे केले प्रयत्न सुरू Sushant Singh Rajput Latest News

अभिनेता सुशांत सिंह राजपूत च्या आत्महत्या प्रकरणाला आता नवीन वळण मिळालं आहे. सुशांत च्या वडिलांनी पाटणा येथे पोलीस मध्ये तक्रार दाखल करत रिया चक्रवर्तीने सुशांतकडून पैसे घेतल्याचा आरोप केला आहे आणि तसंच सुशांतला धमक्या दिल्याचंही म्हटलं आहे. 
त्या नतर रिया चक्रवर्ती ने मंगळवारी रात्री वकिलांची भेट घेतली असून बुधवारी ती अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करणार आहे. रिया चक्रवर्तीचे वकील सतीश मानशिंदे यांनी जामिनासाठीची सर्व कागदपत्रे तयार केली आहेत.

सुशांतच्या वडिलांनी तक्रारीत काय म्हटलंय ?

 “सुशांत आणि रिया रिलेशनशिपमध्ये होते. माझ्या मुलाला सर्व काही सोडून केरळला जाऊन आपल्या मित्रासोबत शेती करण्याची इच्छा होती. पण रिया चक्रवर्ती ने त्याला रोखलं.”
 “जर माझे ऐकलं नाही तर मेडिकल रिपोर्ट Sushant Singh Rajput Medical Reports मीडियामध्ये प्रसिद्ध करणार आणि मानसिक स्थिती योग्य नसल्याचं सांगणार अशी धमकी रिया चक्रवर्ती ने सुशांत सिंह राजपूत ला दिली होती.”
“जव्हा सुशांत आपलं ऐकत नसल्याचं आणि त्याच्या बँक खात्यात पैसे नसल्याचं लक्षात आलं तेव्हा रियाने ‘आता त्याचा काही उपयोग नाही असा विचार केला”, असे आरोप सुशांत सिंह राजपूतच्या वडिलांनी तक्रारीत केले आहेत.
“सुशांतची मॅनेजर दिशाने आत्महत्या केल्यानंतर मीडियामधील बातम्यांमुळे सुशांतला भीती वाटू लागली होती. त्याने चक्रवर्ती शी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण तिने नंबर ब्लॉक केला होता. “
“दिशाच्या आत्महत्येसाठी चक्रवर्ती आपल्याला जबाबदार ठरवेल, अशी भीती सुशांत सिंह राजपूतला होती,” असंही त्यांनी तक्रारीत सांगितलं आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment