
अकोला,दि.6- आणीबाणीच्या कालावधीत (सन 1975 ते 1977) लढा देणाऱ्या व्यक्तींचा सन्मानार्थ शासनाव्दारे मानधन दिल्या जाणार आहे. आणिबाणीच्या कालावधीत ज्या व्यक्तींना 1 महिन्या पेक्षा जास्त तुरुंगवास भोगावा लागला अशा व्यक्तींना 10 हजार रूपये व त्यांच्या पश्चात त्यांच्या विधवा पत्नींना 5 हजार रूपये तर एक महिन्यापेक्षा कमी तुरुंगवास भोगावा लागला अशा व्यक्तींना मानधन 5 हजार रूपये व त्यांच्या विधवा पत्नींना 2 हजार 500 रूपये मानधन दिल्या जाणार आहे.
ही योजना शासनानी पुन्हा नव्याने सुरु केली असून यांचा लाभ घेण्यासाठी अर्जदारांनी दि. 30 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करावा. पात्रता धारक लाभार्थ्यांनी दि. 15 सप्टेंबर 2018 च्या शासन निर्णयानुसार परिपुर्ण कागदपत्रांसह अर्ज जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला येथे सादर करावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी केले.









