वाशिम दि.७ : भारत सरकारच्या सूक्ष्म,लघु व मध्यम उद्योजकता विभाग अर्थात एमएसएमई विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांची माहिती देण्यासाठी १० सप्टेंबर रोजी सकाळी १०:३० वाजता नियोजन भवन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर वाशिम येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेला संबंधित विभागाचे केंद्र सरकारचे अधिकारी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहे.

उद्योजक,उद्योजक व नवीन उद्योग सुरू करण्यास इच्छुक असलेल्या व्यक्तींनी उपस्थित राहून कार्यशाळेचा लाभ घ्यावा.इच्छुकांनी त्यांचे प्रस्ताव कार्यशाळेला येताना सोबत आणावे. ज्या विभागामार्फत केंद्र पुरस्कृत योजना राबविण्यात येत आहे, त्या संदर्भात निधी उपलब्धता/ प्रस्ताव मंजुरी प्रलंबित असल्यास त्याबाबत संबंधित विभागामार्फत केलेल्या पत्र व्यवहाराच्या प्रती सोबत आणाव्यात. असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.