जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता सहावीकरीता प्रवेश सुरु; आधार क्रमांक मोबाईला लिंक आवश्यक

जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता सहावीकरीता प्रवेश सुरु; आधार क्रमांक मोबाईला लिंक आवश्यक

जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता सहावीकरीता प्रवेश सुरु; आधार क्रमांक मोबाईला लिंक आवश्यक

अकोला, दि.७ जानेवारी २०२३ – जवाहर नवोदय विद्यालय येथे शैक्षणिक सत्र २०२३-२४ करीता इयत्ता सहावीच्या प्रवेश प्रक्रिया सुरु झाले आहे. ही प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने होणार असून आधार क्रमांक मोबाईला लिंक असणे आवश्यक आहे. याकरीता विद्यार्थी व पालकांनी ऑनलाईन प्रवेशाकरीता आधार क्रमांक लिंक करुन घ्यावे, असे आवाहन जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य आर.एस. चंदनशिव यांनी केले आहे.

पालकांनी शाळेच्या मुख्याधापकांच्या सही शिक्यानिशी माहिती भरलेले फार्म आधार कार्ड व पासपोर्ट फोटो घेवून ऑनलाईन प्रवेश अर्ज करावा. अर्ज अपलोड करताना मोबाईलवरील ओटीपीव्दारे प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. याकरीता आधार क्रमांक मोबाईल लिंक करणे आवश्यक राहिल. प्रवेश अर्ज प्रक्रिये करीता http://cbseitms.rcil.gov.in/nvs/Index/Registration या संकेतस्थळावर अपलोड करावा. अर्ज करण्यासाठी अंतिम दि. ३१ जानेवारी २०२३असून त्यापूर्वी आधार क्रमांक मोबाईला लिंक करुन घ्यावे. तांत्रिक व इतर कारणामुळे प्रवेशापासून वंचित राहणार नाही याची दक्षता विद्यार्थी व पालकांनी घ्यावी राहू नये याकरीता मुदतीपुर्वीचे नोंदणी करुन घ्यावी. अधिक माहितीसाठी जवाहर नवोदय विद्यालय बाभूळगांव जहॉ.,अकोला येथे किंवा ०७२४ – २९९१०८७ या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

प्रवेशाकरीता पात्रता : जिल्ह्यातील सरकारमान्य शाळेत शैक्षणिक सत्र २०२२ -२३ मध्ये इयत्ता पाचवी मध्ये शिकलेला असावा, विद्यार्थी-विद्यार्थीनी इयत्ता तिसरी व चौथी पूर्ण शैक्षणिक सत्र सलगपणे सरकारमान्य शाळेतून उत्तीर्ण असावा, तसेच विद्यार्थ्यांचे इयत्ता पाचवीचे पुर्ण शैक्षणिक सत्र अकोला जिल्ह्यातील सरकारमान्य शाळेत झालेला असावे, विद्यार्थ्यांचा जन्म दि. ०१ मे २०११ ते दि. ३० एप्रिल २०१३ (दोन्ही दिवस धरुन) या कालावधीत झालेला असावा.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment