शासकीय वसतिगृहासाठी जमीन देऊ इच्छिणाऱ्यांनी संपर्क साधण्याचे आवाहन

शासकीय वसतिगृहासाठी जमीन देऊ इच्छिणाऱ्यांनी संपर्क साधण्याचे आवाहन

शासकीय वसतिगृहासाठी जमीन देऊ इच्छिणाऱ्यांनी संपर्क साधण्याचे आवाहन

पुणे, दि. 21 जानेवारी २३ (आजचा साक्षीदार): डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृह, भोर या शासकीय वसतिगृहासाठी भोर मुख्यालयापासून ३ कि.मी. अंतरामध्ये खाजगी जागा खरेदी करावयाची असून इच्छूक जमीन मालकांनी ३१ जानेवारी २०२३ पर्यंत संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

महाराष्ट्र शासकीय उपक्रम । सरकारी योजना । महाराष्ट्र शासन योजना ।
महाराष्ट्र शासकीय उपक्रम । सरकारी योजना । महाराष्ट्र शासन योजना ।

शासकीय वसतिगृहासाठी कमीत कमी एक एकर ते जास्तीत जास्त दोन एकराच्या मर्यादेत जागा खरेदी करण्यात येणार आहे. इच्छुक जमीन मालकांनी आपल्या वैयक्तिक अथवा संयुक्त मालकीची खाजगी जमीन विकण्यास तयार असल्यास त्यांनी जागेचा सन १९३० ते २०२२ पर्यंतचे ७/१२ उतारे, सर्व फेरफार, झोन दाखला, मोजणी क प्रत, कलर झोनिंग, भाग नकाशा, गट नकाशा, अॅक्विझेशन, रिक्विझेशन नसल्याबाबत दाखला, वहिवाटीचा रस्ता आदी कागदपत्रे घेऊन सहायक आयुक्त समाजकल्याण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन स.नं.१०५, १०४, विश्रांतवाडी रोड, येरवडा स्टेशनसमोर, येरवडा, पुणे येथे संपर्क साधावा असे आवाहन, सहायक आयुक्त समाजकल्याण संगिता डावखर यांनी केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment