आजचा साक्षीदार | दिवसभरातील महत्वाच्या टॉप बातम्या : 24 जानेवारी 2023
👉भारताने न्यूझीलंडला दिले 386 धावांचे टार्गेट; रोहित-शुभमनचे शतक तर हार्दीकची फिफ्टी
👉….अन्यथा राज्यव्यापी आंदोलन करु – जानेवारी महिन्यात जर 75 हजार पदांची नोकरभरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली नाही तर राज्यव्यापी आंदोलन करु, असा इशारा राज्यातील स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने दिला आहे. महाराष्ट्रात एकूण रिक्त पदांची संख्या लाखांच्या जवळपास आहे. 75 हजार पदभरतीची घोषणा करुन तीन ते चार महिने उलटून गेले. मात्र प्रत्यक्षात जाहिरात प्रसिद्ध होत नाही. या विरोधात स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
👉महिला IPL संघांचा लिलाव 25 जानेवारीला.. – महिला IPL संघांचा 25 जानेवारीला लिलाव होणार आहे. या लिलावातून बीसीसीआयला 4 हजार कोटी रुपये मिळू शकतात. रिपोर्टनुसार, एक संघ 500 ते 600 कोटी रुपयांना विकला जाऊ शकतो. बोली 800 कोटींच्या वर जाऊ शकते. महिला IPL मध्ये संघ खरेदी करण्यासाठी 30 हून अधिक कंपन्या स्पर्धा करत आहेत. यामध्ये अदानी ग्रुप, टोरेंट ग्रुप, हल्दीराम ग्रुप, कॅप्री ग्लोबल, कोटक आणि आदित्य बिर्ला ग्रुप यासह पुरुषांच्या IPL च्या मालकांचा समावेश आहे. या सर्वांनी 5 लाख रुपयांना बोलीची कागदपत्रे खरेदी केली होती
👉…म्हणून राज्यांमध्ये इंधनाच्या किंमती जास्त! – केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी तेल कंपन्यांना महत्वाचं आवाहन केलं आहे. ‘केंद्र सरकारने नोव्हेंबर 2021 आणि मे 2022 मध्ये इंधनावरील उत्पादन शुल्क कमी केले होते, तरीदेखील काही राज्य सरकारांनी इंधनावरील व्हॅट कमी केला नाही. व्हॅट कमी न करणाऱ्या राज्यांमध्ये इंधनाच्या किंमती जास्त आहेत. त्यामुळे तेल कंपन्यांना विनंती आहे कि इंधनाच्या किंमती कमी कराव्यात’, असे पुरी यांनी सांगितले आहे.
👉 कर्नाटकातील बंगळुरुमधील उड्डाण पुलावरून पैसे फेकतानाचा व्हिडीओ व्हायरल, या पैशांचा पाऊस पाडणाऱ्या व्यक्तीचा पोलीस घेताय शोध
👉ऑस्कर पुरस्कार सोहळा: सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याच्या श्रेणीत RRR चित्रपटातील ‘नाटू नाटू’ या गाण्याला अंतिम नामांकन, मार्चमध्ये ऑस्कर पुरस्कार जाहीर होणार
👉मुंबईच्या झवेरी बाजारातून आरोपींनी एका कार्यालयातून 25 लाख रुपये रोख आणि 3 किलो सोने चोरले; बनावट ईडी अधिकारी असल्याचं भासवत मारला छापा
👉 ‘गांधी गोडसे एक युद्ध’ चित्रपटाचे दिग्दर्शक राजकुमार संतोषींना धमक्या; मुंबई पोलिसांना लिहिलं पत्र, सुरक्षेची केली मागणी
👉 श्रद्धा हत्या खटल्यात 6000 पानांचे आरोपपत्र, 100 जणांचे जबाब आणि इलेक्ट्रॉनिक-फॉरेन्सिक पुराव्यांचा समावेश
👉 येत्या 24 तासांत उत्तर-मध्य महाराष्ट्र, मुंबईसह उत्तर कोकणातील काही भागांत किमान तापमान कमी होण्याची शक्यता, पुढील 2 दिवसांत राज्याच्या अंतर्गत भागात अंशतः ढगाळ आकाश राहण्याचा अंदाज
👉 प्रत्येक महिन्याला 1 लाख 30 हजार रुपये द्यावे लागतील; 2018 पासून वेगळे राहत असल्यापासून घटस्फोटाची केस सुरू.
आजचा साक्षीदार | दिवसभरातील महत्वाच्या टॉप बातम्या : 24 जानेवारी 2023