दिवसभरातील महत्वाच्या बातम्या |Todays News – 12.08.2010
Mumbai Traffic : मुंबई-पुण्यातलं ट्रॅफिक 50 % ने कमी करणार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं व्हिजन.. सध्याच्या कामगिरीवर समाधानी नाही, प्रतिदिन 100 किलोमिटर चा महामार्ग बांधण्याचं माझं लक्ष्य, नितीन गडकरी यांचा विश्वास..
India Vs England Test Series : भारत विरुद्ध इंग्लंड आजपासून दुसरी कसोटी, पावसामुळे खेळाला उशीर, भारताची धावसंख्या 153/2, रोहित शर्मा, के. एल राहुलचे खणखणीत अर्धशतक. चेतेश्वर पुजारा स्वस्तात परतला.
Twitter Vs Congress : काँग्रेसविरोधात ट्विटरचा कारवाईचा सपाटा; राहुल गांधी यांच्यानंतर पक्षाचे अधिकृत अकाऊंट बंद.. केंद्रीय नेत्यानंतर राज्यातील बाळासाहेब थोरात आणि भाई जगताप या नेत्यांचेही ट्विटर हँडल ट्विटरकडून बंद..
Nadi Jodo Pariyojna : राज्यातल्या समान विकासासाठी ‘नदी जोडो’ प्रकल्पावर भर देणार, माझा महाराष्ट्र माझं व्हिजन कार्यक्रमात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचं प्रतिपादन..
Covid Vaccination for Students : महाविद्यालयीन तरुणांसाठी जिल्हा स्तरावर 30 टक्के लस राखीव ठेवावी, उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांचा प्रस्ताव, महाविद्यालयीन फी संदर्भातही विद्यार्थ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करणार..
Nashik Zilha Parishad : नाशिक जिल्हा परिषदेच्या लाचखोर शिक्षणाधिकारी वैशाली झनकर पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार..ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा निष्काळजीपणा समोर. आता ACB चं धाडसत्र सुरू.
Covid 19 : कोरोनाचा धोका अद्याप टळलेला नाही, देशात गेल्या 24 तासांत 40 हजारांहून अधिक रुग्णांची नोंद.. राज्यात बुधवारी 5560 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर रिकव्हरी रेट 96.82 टक्के..
Swasta Danya Dukan : आता स्वस्त धान्य दुकानात चहा पावडर मिळणार. विविध अन्नधान्यासह चहा पावडरचे वाटप करण्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचा निर्णय जाहीर..
Gold Rate : दिल्ली सराफा बाजारात सोन्याच्या भावात 422 रुपये प्रति 10 ग्रॅममागे वाढ. सोन्याचा भाव 45,560 रुपये प्रति तोळा. चांदीच्या दरात 113 रुपये वाढीसह 61,314 रुपये प्रति किलोवर बंद.
दिवसभरातील महत्वाच्या बातम्या |Todays News – 12.08.2010