पोस्ट ऑफिस च्या पब्लिक प्रॉव्हिडंट फंड स्कीममध्ये १५ वर्षांसाठी करा गुंतवणूक; इनकम टॅक्समध्ये मोठी सूट मिळवा आणि त्यासोबत मिळणार मोठा रिटर्न…. Post Office PPF Scheme
आज ही मोठ्या संख्येने लोक पोस्ट ऑफिसच्या विविध योजनां मध्ये पैसे गुंतवत आहेत. याचे उत्तम कारण म्हणजे चांगल्या पोस्ट ऑफिस च्या योजना देत आहेत परताव्यासह उपलब्ध सुरक्षा. पोस्ट ऑफिस ची पब्लिक प्रॉव्हिडंट फंड ही एक पोस्ट ऑफिस योजनां पैकी एक योजना आहे जी उत्कृष्ट परतावा आणि सुरक्षा देत आहे. त्यामुळे या योजनेतील जोखीम हि जवळ – जवळ नगण्यच आहे. Post Office PPF Scheme
पोस्ट ऑफिस पब्लिक प्रॉव्हिडंट फंड योजनेशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊया… Information about Post Office PPF Scheme
◼️तुम्ही पोस्ट ऑफिस पब्लिक प्रॉव्हिडंट फंड या योजनेत ५०० रूपयांचा पहिला हप्ता जमा केला, ज्यावर तुम्हाला ३० रुपये व्याज मिळाले तर पुढच्या वर्षी तुम्हाला ५३० रूपयांवर व्याज दिलं जाईल. वर्षानुवर्षे पैसे असेच वाढत राहती
◼️ पोस्ट ऑफिस पब्लिक प्रॉव्हिडंट फंड योजनेअंतर्गत गुंतवणूकीचे पैसे, व्याजाचे पैसे आणि मुदतपूर्तीचे पैसे पूर्णपणे व्याजमुक्त असतात.
◼️ पोस्ट ऑफिस पब्लिक प्रॉव्हिडंट फंड योजनेत पैसे गुंतवल्यास इन्कम टॅक्सच्या सेक्शन ८० सी अंतर्गत इन्कम टॅक्समध्ये सूट मिळते.
◼️ तुम्हील ५०० रूपयांनी गुंतवणूक सुरू करू शकता. परंतु वर्षभरात सर्वाधिक १.५ लाखांपर्यंतच रक्कम जमा करू शकता.पोस्ट ऑफिस पब्लिक प्रॉव्हिडंट फंड योजना हि १५ वर्षांसाठी आहे. यामध्ये जर तुम्ही मधूनच पैसे काढू इच्छित असाल तर तसं तुम्हाला करता येणार नाही.१५ वर्षांनंतर तुम्हाला दर ५ वर्षांसाठी ही (पोस्ट ऑफिस पब्लिक प्रॉव्हिडंट फंड) स्कीम वाढवता येऊ शकते.
◼️ जर ५०० रूपयांचीं गुंतवणूक केलीजर तुम्ही दर महिन्याला ५०० रूपये पोस्ट ऑफिस पब्लिक प्रॉव्हिडंट फंड योजनेत गुंतवले, तर १५ वर्षांसाठी तुम्हाला ९० हजार रूपये जमा करावे लागतात. यानंतर १५ वर्षांनी तुम्हाला १,१५,७८४ रूपये मिळतील.
Post Office PPF Scheme