Sakshidar.co.in | अत्यंत महत्वाच्या बातम्या । Important Breaking News

Sakshidar.co.in | अत्यंत महत्वाच्या बातम्या । Important Breaking News

अत्यंत महत्वाच्या बातम्या । Important Breaking News

अमित शहांच्या भेटीला महाराष्ट्राचे राज्यपाल श्री. भगतसिंह कोश्यारीं..

नाशिकमधील उद्योजक रतन लथ यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेची शुक्रवारी सुनावणी झाली; 12 आमदारांच्या नियुक्तीवरुन उच्च न्यायालयाने कान टोचल्यानंतर राज्यपाल श्री. भगतसिंह कोश्यारींनी घेतली अमित शहांची भेट

काँग्रेस पक्षाचे राहुल गांधींचे ट्विटर अकाऊंट झाले ‘अनलॉक’

काँग्रेस पक्षाचे आणि नेत्यांचे ट्विटर अकाऊंटही पुन्हा सुरु; काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे ट्विटर अकाऊंट एका आठवड्यानंतर पुन्हा सुरु करण्यात आलं आहे. काँग्रेस चे राहुल गांधी यांनी दिल्लीतील बलात्कार पीडितेच्या आई-वडिलांचा फोटो ट्वीट करुन त्यांची ओळख जाहीर केली होती.

लसींचे दोन्ही डोस घेतलेल्यांनाच मिळणार महाराष्ट्र राज्यात एंट्री

महाराष्ट्रात वाढला डेल्टा प्लसचा धोका: आतापर्यंत 5 जणांनी गमावला जीव, जळगावात सर्वात जास्त 13 रुग्ण आढळले; लसींचे दोन्ही डोस घेतलेल्यांनाच मिळणार महाराष्ट्र राज्यात एंट्री; महाराष्ट्र राज्यात येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला कोविड लसीचे दोन्ही डोस घेणे आवश्यक असेल.

शिर्डीला नवे विश्वस्त मंडळ मिळणार कधी?

शिर्डीतील साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाच्या नियुक्तीवरून सुरू असलेला न्यायालयीन वाद चांगलाच रखडला आहे. येत्या 23 ऑगस्ट २०२१ ला याबाबत सुनावणी होणार आहे अशी माहिती आहे.

दहशतवादी संघटना तालिबानची भारताला धमकी; अफगाणिस्तान मध्ये लष्कर पाठवल्यास…

अफगाणिस्तान मध्ये सत्ता काबीज करण्यासाठी सरसावलेल्या दहशतवादी तालिबानने भारताला धमकी दिली आहे. अफगाणिस्तान सरकारच्या मदतीसाठी अफगाणिस्तान मध्ये भारतीय लष्कर दाखल झाल्यास त्याचे परिणाम चांगले होणार नसल्याचे तालिबान संघटनेनें म्हटले आहे. तालिबान मध्य लष्करी हस्तक्षेप करण्याआधी भारताने दुसऱ्या देशांची झालेली परिस्थिती पाहावी असेही दहशतवादी तालिबान ने म्हटले आहे.

हितशत्रूंकडून राजकीय जीवन संपविण्याचे प्रयत्न; शिवसेना आमदार संजय राठोड यांनी फेटाळले आरोप
माजी मंत्री आणि शिवसेनेचे नेते, शिवसेना आमदार संजय राठोड हे एका महिलेने पोलिसांना पोस्टाद्वारे पाठविलेल्या कथित आरोपपत्रा मुळे पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत. शिवसेना आमदार संजय राठोड यांनी मात्र हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. विरोधक आणि हितशत्रूंकडून आपले राजकीय जीवन संपविण्यासाठी कथित आरोपांची ‘सुपारी’ दिली आहे, असा आरोप आमदार संजय राठोड केला आहे.

Join WhatsApp

Join Now