इयत्ता 12 वी व इयत्ता 10 वी परीक्षा कॉपीमुक्त अभियानाच्या कार्यवाहीत अंशत: बदल

इयत्ता 12 वी व इयत्ता 10 वी परीक्षा कॉपीमुक्त अभियानाच्या कार्यवाहीत अंशत: बदल

इयत्ता 12 वी इयत्ता 10 वी परीक्षा कॉपीमुक्त अभियानाच्या कार्यवाहीत अंशत: बदल

नांदेड (आजचा साक्षीदार)दि. 31 जानेवारी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये घेण्यात येणारी इ. 12 वी परीक्षा 11 फेब्रुवारी ते 18 मार्च व इ. 10 वी परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च 2025 या कालावधीत पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या विभागीय मंडळांमार्फत आयोजित करण्यात आल्या आहेत.

इयत्ता 12 वी व इयत्ता 10 वी परीक्षा कॉपीमुक्त अभियानाच्या कार्यवाहीत अंशत: बदल
इयत्ता 12 वी व इयत्ता 10 वी परीक्षा कॉपीमुक्त अभियानाच्या कार्यवाहीत अंशत: बदल

सर्व परीक्षा केंद्रावर केंद्रसंचालक, पर्यवेक्षक व परीक्षेशी संबंधित व्यक्तींची नियुक्ती सदर केंद्रावर समाविष्ट असणाऱ्या शाळेतील शिक्षक व अन्य कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त इतर अन्य शाळा, उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक व कर्मचाऱ्यांमधून करण्याची कार्यवाही करण्याबाबत 17 जानेवारी रोजीच्या पत्रान्वये कळविण्यात आले होते. परंतू या निर्णयाच्या संदर्भात लोकप्रतिनिधी, विविध शिक्षक संघटना व संस्थाचालक संघटना यांनी हरकती घेतलेल्या आहेत. त्यामुळे या निर्णयात अंशत: बदल करण्यात येत असून फेब्रुवारी-मार्च 2025 च्या इ. 12 वी व इ. 10 वी परीक्षा निकोप वातावरणात पार पाडण्यासाठी पुढील प्रमाणे कार्यवाही करण्यात येणार आहे.

कोरोना काळातील सन 2021 व सन 2022 या दोन परीक्षा वगळून मागील 5 वर्षाच्या म्हणजेच फेब्रुवारी-मार्च 2018, 2019, 2020,2023 व 2024 या परीक्षांमध्ये ज्या परीक्षा केंद्रांवर गैरमार्गाची प्रकरणे आढळून आलेली आहेत अशा परीक्षा केंद्रावर केंद्रसंचालक, पर्यवेक्षक व परीक्षेशी संबंधित व्यक्तींची नियुक्ती सदर केंद्रावर समाविष्ट असणाऱ्या शाळेतील शिक्षक व अन्य कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त इतर अन्य शाळा, उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक व कर्मचाऱ्यांमधून करण्यात येणार आहे.

फेब्रुवारी-मार्च 2025 च्या इ. 10 वी व इ. 12 वी परीक्षांमध्ये ज्या परीक्षा केंद्रांवर गैरमार्गाची प्रकरणे आढळून येतील त्या केंद्रांची परीक्षा केंद्र मान्यता पुढील वर्षीपासून कायमची रद्द करण्याबाबतची कार्यवाही करण्यात येईल. जिल्हाधिकारी तथा जिल्हा दक्षता समिती अध्यक्ष यांना त्यांच्या जिल्हयात इ. 10 वी व इ. 12 वीची परीक्षा पारदर्शकपणे होण्यासाठी आवश्यकतेप्रमाणे नियोजन करण्याची मुभा राहील.

शिक्षणाधिकारी (माध्यमिक), सदस्य सचिव दक्षता समिती, विभागीय मंडळे यांनी जिल्हाधिकारी तथा जिल्हा दक्षता समिती अध्यक्ष यांच्या सहकार्याने परीक्षा कालावधीत प्रत्येक परीक्षा केंद्रावर पूर्णवेळ बैठेपथक कार्यरत राहील अशी कार्यवाही करण्याबाबत सर्व विभागीय मंडळे व सर्व संबंधितांना कळविण्यात आले आहे, अशी माहिती राज्य मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी दिली.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment