अहिल्यानगर : हुतात्मा स्मारकाच्या देखभालासाठी नोंदणीकृत संस्थांना अर्ज करण्याचे आवाहन
अहिल्यानगर | ७ जुलै २०२५ : राज्य शासनाने हुतात्मा स्मारकांची देखभाल व परिरक्षण स्थानिक स्वायत्त संस्थांच्या माध्यमातून करण्याचा निर्णय घेतला असून, यासाठी नोंदणीकृत शैक्षणिक संस्थांना अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ही कार्यवाही अनुदान तत्वावर राबविण्यात येणार आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील एकूण पाच हुतात्मा स्मारकांपैकी मौजे चिंचपूर इजदे (ता. पाथर्डी) येथील स्मारकाची देखभाल करण्याचे नियोजन सध्या करण्यात आले असून, त्या गावातील किंवा पाथर्डी तालुक्यातील नोंदणीकृत शैक्षणिक संस्थेकडे हे कार्य सोपविले जाणार आहे.
अर्जासाठी मार्गदर्शक सूचना:
- इच्छुक शैक्षणिक संस्थांनी शासनाच्या विहित अटी व शर्तींच्या अधीन राहून अर्ज करावेत.
- अर्जासोबत संस्थेचा नोंदणी प्रमाणपत्र, संस्थेची नियमावली, व आवश्यक कागदपत्रे जोडणे अनिवार्य आहे.
- अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ३० जुलै २०२५ असून, अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष जमा करावा.
अधिक माहिती:
शासनाच्या अटी व शर्तींबाबतचे संपूर्ण विवरण जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सामान्य प्रशासन शाखेत उपलब्ध असून, इच्छुक संस्थांनी त्या आधीच पाहाव्यात, असे निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांनी कळवले आहे.
या उपक्रमातून हुतात्म्यांच्या स्मृती संवर्धनाला चालना मिळणार असून, स्थानिक शैक्षणिक संस्थांना समाजासाठी योगदान देण्याची एक सकारात्मक संधी उपलब्ध होणार आहे.