केंद्र शासनाच्या स्टँड अप इंडिया योजनेंतर्गत अनुसूचित जाती व नवबौध्द समाजाच्या घटकांकरीता मार्जिन मनी योजना….
केंद्र शासनाने स्टँड अप इंडिया ही योजना सुरु केलेली असून या योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत 25% मार्जिन मनी भरण्याची क्षमता नसलेल्या अनुसूचित जाती व नवबौध्द समाजाच्या घटकातील होतकरु नवउद्योजक लाभार्थ्यांना मार्जिन मनी उपलब्ध करुन त्याला सक्षम बनविण्याच्या उद्देशाने राज्य शासनाच्या मार्जिन मनी योजना सुरु केलेली आहे.
केंद्र शासनाच्या स्टँड अप इंडिया योजनेंतर्गत अनुसूचित जाती व नवबौध्द समाजाच्या घटकांकरीता मार्जिन मनी योजना….
या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीसाठीच्या सवलती घेण्यास पात्र असलेल्या अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील नवउद्योजकांना 10% स्व-हिस्सा भरणा केल्यांनतर व बँकेने अर्जदारास स्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत 75% कर्ज मंजूर केल्यानंतर उर्वरित Front and Subsidy 15% राज्य शासनामार्फत देण्यात येते.
तरी सदर योजनेचा लाभ घेणेकरीता व या योजनेसंबंधी अधिक माहितीकरीता सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, पालघर आफरीन अपार्टमेंट, बी-वींग, पहिला मजला, रुम नं.106, 107 रेल्वे फाटकाजवळ नवली, पालघर (पु.) येथिल कार्यालयाशी किंवा दुरध्वनी क्रमांक 025252-254277 वर संपर्क साधावा.