आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांसाठी ऑनलाईन भरती मेळावा…

आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांसाठी ऑनलाईन भरती मेळावा…

नांदेड : औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्यावतीने 25 नोव्हेंबर 2021 रोजी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे (भरती मेळावा) आयोजित करण्यात आलेला आहे. या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी आयटी आय उत्तीर्ण प्रशिक्षणार्थ्यांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत 25 नोव्हेंबर रोजी सकाळी 10.30 वाजता उपस्थित रहावे, असे आवाहन प्राचार्य सुभाष सिताराम परघणे यांनी केले आहे.

या मेळाव्यासाठी आवश्यक अर्हता, पात्रता, तात्पुरत्या उमेदवारासाठी वेतन आणि शिकाऊ उमेदवारासाठी मानधन व आवश्यक व्यवसाय याचा तपशिल पुढीलप्रमाणे आहे. अर्हता आयटीआय उत्तीर्ण (तात्पुरत्या आणि शिकाऊ उमेदवारासाठी) आयटीआय अधिक एनसीव्हीटी अधिक किमान 6 महिन्याचा अनुभव ट्रेनी / तात्पुरत्या कालावधीसाठी अनुभव अनिवार्य आहे.

वय 18 ते 28 वर्ष (पेंटर जनरल ट्रेडसाठी 30 वर्ष ) मुलींसाठी 18 ते 24 वर्षे, वेतन 16 हजार रुपये, वेतन, कॅन्टीन, युनिफॉर्म व बसची सुविधा, व्यवसाय-वेल्डर, पेंटर, फिटर, मोटर मेकॅनि, डिझेल मेकॅनिक, इलेक्ट्रीशियन, शिट मेटल, इलेक्ट्रानिक्स मॅकॅनिक, टॅक्ट्रर मेकॅनिक याप्रमाणे तपशिल आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment