महाराष्ट्र बातम्या

लग्नानिमित्त जेवणाचा ठेका देताना नागरिकांनी खबरदारी बाळगावी अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त विवेक पाटील यांचे आवाहन…


जळगाव जिल्ह्यात लग्न सराई सुरू झाली आहे. यानिमित्त जेवणाचा ठेका देताना नागरिकांनी खबरदारी बाळगावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त विवेक पाटील (अन्न) यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये केले आहे.


श्री. पाटील यांनी म्हटले आहे, लग्नानिमित्त जेवणावळीचे कंत्राट हे कॅटरिंग व्यावसायिकास देण्यात येते. लग्नानिमित्त होणाऱ्या जेवणावळीत अनेकजण जेवण करतात. त्यामुळे या अन्नाचा दर्जा तसेच त्याची तयार करण्याच्या कार्यप्रणालीबाबत अन्न व औषध प्रशासनाने आवाहन केले आहे. त्यानुसार लग्नानिमित्त जेवणाचे कंत्राट हे अन्न सुरक्षा मानके कायद्यांतर्गत योग्य परवाना असलेल्या कॅटरिंग व्यावसायिकांनाच द्यावे. जेथे कॅटरिंग व्यावसायिक हा अन्न पदार्थ तयार करतो ती जागा आरोग्याच्या दृष्टीने स्वच्छ व आरोग्यदायी असावी. लग्नामध्ये जेवण तयार करताना कॅटरिंग व्यावसायिकाने अन्न तयार करणाऱ्या व्यक्तींची वैद्यकीय तपासणी केलेली असावी.

लग्नानिमित्त जेवणाचा ठेका देताना नागरिकांनी खबरदारी बाळगावी अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त विवेक पाटील यांचे आवाहन…


अन्न पदार्थाचे वितरण करणाऱ्यांना ॲप्रॉन, ग्लोव्हज व डोक्याला टोपी पुरविलेली असावी. जेवण तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी भांडी ही स्वच्छ असावीत. अन्नपदार्थ ज्या ठिकाणी तयार केले जातात तेथे वापरण्यात येणारे पाणी हे पिण्यास योग्य असावे. कॅटरिंग व्यावसायिकाने जेवण तयार करताना वापरण्यात येणारे दुग्धजन्य पदार्थ जसे पनीर, खवा तसेच गोड पदार्थांचा दर्जाबाबत खात्री करावी व त्याचे वेळेतच सेवन होईल याबाबत लक्ष पुरवावे. तयार अन्न पदार्थामध्ये खाद्यरंग वापरला जावू नये याबाबत देखील खात्री करावी. जेवण तयार करण्याकामी लागणारा कच्चा माल हा दर्जेदार वापरावा. याबाबत देखील लक्ष पुरवावे. लग्नाच्या ठिकाणी वाढणारे जेवण हे कॅटरिंग व्यावसायिकाने नीटनेटके झाकून तसेच योग्य त्या तापमानास ठेवावे. शिल्लक अन्न पदार्थ हे त्याकरीता कार्यरत असलेल्या एजन्सीला देण्यात यावे.

तसेच उष्टे/ शिल्लक अन्न पदार्थाची विल्हेवाट योग्य प्रकारे लावावी. वरील ठळक मुद्यांचे कॅटरिंग व्यावसायिकाने पालन केले आहे किंवा कसे हे लग्ननिमित्त जेवण बनविण्याचे कत्राट देताना नागरिकांनी लक्ष द्यावे. जेणेकरुन अन्न विषबाधासारख्या घटना घडणार नाहीत, असेही सहाय्यक आयुक्त श्री. पाटील यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

लग्नानिमित्त जेवणाचा ठेका देताना नागरिकांनी खबरदारी बाळगावी अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त विवेक पाटील यांचे आवाहन…

लग्नानिमित्त जेवणाचा ठेका देताना नागरिकांनी खबरदारी बाळगावी अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त विवेक पाटील यांचे आवाहन...

मराठवाड्यातील रेल्वे विकासाच्या प्रश्नाबाबत दक्षिण मध्य रेल्वेचा दुजाभाव कशासाठी ? – सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण

मराठवाड्यातील रेल्वे विकासाच्या प्रश्नाबाबत दक्षिण मध्य रेल्वेचा दुजाभाव कशासाठी ? - सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण

महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातून भाजप उमेदवार श्री Chandrashekhar Bawankule यांचा उमेदवारी अर्ज दाखल…

महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातून भाजप उमेदवार श्री Chandrashekhar Bawankule यांचा उमेदवारी अर्ज दाखल...

कोपरगांव तालुक्यातील रस्त्याच्या मजबुतीकरण व डांबरीकरण करणे विविध कामाचे भूमिपूजन आज आमदार आशुतोष काळे (कोपरगाव विधानसभा मतदारसंघ) यांच्या हस्ते पार पडले….

कोपरगांव तालुक्यातील रस्त्याच्या मजबुतीकरण व डांबरीकरण करणे विविध कामाचे भूमिपूजन आज आमदार आशुतोष काळे (कोपरगाव विधानसभा मतदारसंघ) यांच्या हस्ते पार पडले....

औंढा (ना) येथे अनुसूचित जमाती प्रवर्गातील युवकांसाठी मोफत दुग्ध व्यवसाय प्रशिक्षण कार्यक्रम…

औंढा (ना) येथे अनुसूचित जमाती प्रवर्गातील युवकांसाठी मोफत दुग्ध व्यवसाय प्रशिक्षण कार्यक्रम...

रेशीम शेतीचा स्वीकार करुन शेतकऱ्यांनी आर्थिक विकास साधावा — जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

रेशीम शेतीचा स्वीकार करुन शेतकऱ्यांनी आर्थिक विकास साधावा -- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

मुळा धरणातून पारनेर शहरासाठी पाणी पुरवठा योजना मंजूर – उपमुख्यमंत्री अजित पवार

◼️संत निळोबाराय देवस्थान ट्रस्टला विकास कामांसाठी पन्नास लक्ष रुपये मदतीची घोषणा ◼️कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन ◼️संतांनी मानवकल्याणाचा संदेश दिला ही परंपरा पुढे चालू ठेवावी

नांदेड जिल्ह्यात 2 व्यक्ती कोरोना बाधित…

नांदेड जिल्ह्यात 2 व्यक्ती कोरोना बाधित...

शेंडी येथे ‘भव्य मोफत सर्व रोगनिदान शिबीर’ संपन्न…

शेंडी येथे 'भव्य मोफत सर्व रोगनिदान शिबीर' संपन्न...

अकोले तालुक्याच्या भूषण बीजमाता राहीबाई पोपरे व अन्नमाता ममताबाई भांगरे यांचा आमदार डॉ. किरण लहामटे यांच्या हस्ते सत्कार….

अकोले तालुक्याच्या भूषण बीजमाता राहीबाई पोपरे व अन्नमाता ममताबाई भांगरे यांचा आमदार डॉ. किरण लहामटे यांच्या हस्ते सत्कार....