महाराष्ट्र शासन योजना

जिल्ह्याच्या औद्योगिक, पर्यटन विकासाची ‘ब्लू प्रिंट’ तयार करावी – पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील | आपत्ती व्यवस्थापन, शासन आपल्या दारी उपक्रम तसेच जिल्हा विकास, पर्यटन व औद्योगिक विकास आराखड्याचा घेतला आढावा

नगर दि.9 मे 2023 : पुढील पंधरा दिवसात जिल्ह्याच्या औद्योगिक, पर्यटन विकासाची ‘ब्लू प्रिंट’ तयार करावी. ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमात शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी.” अशा सूचना राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दूग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पंडीत जवाहरलाल नेहरू सभागृहात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण , ‘शासन आपल्या दारी’ उपक्रम तसेच जिल्हा विकास, पर्यटन व औद्योगिक विकास आराखड्याचा आढावा पालकमंत्री श्री.विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, महानगरपालिका आयुक्त डॉ पकंज जावळे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे तसेच विविध शासकीय विभागांचे विभागप्रमुख, सर्व तालुक्यातील तहसीलदार, गटविकास अधिकारी उपस्थित होते.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापनांचा आढावा घेतांना पालकमंत्री श्री.विखे-पाटील म्हणाले की, जिल्ह्यातील ओढे-नाले युध्दपातळीवर स्वच्छता करण्यात यावी. नाल्यावरील अतिक्रमण काढण्यासाठी मोहीम राबवावी. धरणातील उपलब्ध पाणी साठ्याचे सूक्ष्म नियोजन करण्यात यावे. जनावरांना चारा कमी पडणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. पावसाळ्यापूर्वी अंतर्गत रस्त्यांची कामे करण्यात यावी.

‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाचा आढावा घेतांना श्री.विखे पाटील म्हणाले की, शासनाच्या सर्व विभागांनी समन्वय ठेवत शासन आपल्या दारी उपक्रमाची यशस्वी अंमलबजावणी करावी. सर्वसामान्यांना योजनांचा तत्परतेने लाभ देण्याचे काम करावे. संवाद मोहीम राबविण्यात यावी. जिल्ह्यातील औद्योगिक व पर्यटन विकासाला चालना मिळावी. यासाठी एमआयडीसी, पर्यटन महामंडळ यांनी विकासाचा आराखडा तयार करावा. औद्योगिकीकरणाला चालना देण्यासाठी छोटे-छोटे क्लस्टर तयार करा. धार्मिक स्थळांच्या विकासासाठी पायाभूत सुविधांची निर्मिती करण्यावर भर देण्यात यावा.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वतीने जिल्ह्यात केलेल्या ‘जल जीवन मिशन’ योजनेच्या कामांच्या ठिकाणी फलक त्वरित प्रदर्शित करण्यात यावेत. अशा सूचना ही पालकमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

सोयाबीनच्या उत्‍पादन वाढीसाठी अष्‍ठसुत्रीचा वापर करावा कृषी विभागाचे आवाहन

जिल्ह्याच्या औद्योगिक, पर्यटन विकासाची ‘ब्लू प्रिंट’ तयार करावी – पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील | आपत्ती व्यवस्थापन, शासन आपल्या दारी उपक्रम तसेच जिल्हा विकास, पर्यटन व औद्योगिक विकास आराखड्याचा घेतला आढावा

जिल्ह्याच्या औद्योगिक, पर्यटन विकासाची 'ब्लू प्रिंट' तयार करावी - पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील | आपत्ती व्यवस्थापन, शासन आपल्या दारी उपक्रम तसेच जिल्हा विकास, पर्यटन व औद्योगिक विकास आराखड्याचा घेतला आढावा

कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहाय्यक आयुक्त संपत चाटे यांचे आवाहन

सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराची संधी लातूर येथे आज मुलाखतींचे आयोजन | ‘जागेवर निवड संधी’ उपक्रमाचे आयोजन | Jobs in Latur

नोकरीसाठी इच्छुक युवक-युवतींना नामवंत खासगी कंपन्या, कारखाने, उद्योगसमूह यांच्या माध्यमातून उत्तमोत्तम रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी लातूर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, मार्गदर्शन केंद्रातर्फे प्रत्येक महिन्याला रोजगार मोहीम अर्थात ‘जागेवरच निवड संधी’चे आयोजन करण्यात येत आहे. या अंतर्गत 10 मे 2023 रोजी लातूर येथे मुलाखतींचे आयोजन करण्यात आले असल्याचे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त बा. सु. मरे यांनी कळविले आहे.

सोयाबीनच्या उत्‍पादन वाढीसाठी अष्‍ठसुत्रीचा वापर करावा कृषी विभागाचे आवाहन

वाळू लिलाव बंद होणार आणि आता डेपोतूनच वाळू ६०० रुपयात मिळणार | सर्वसामान्यांसाठी वाळू स्वस्त! ६०० रुपये प्रती ब्रास दरात मिळणार वाळू!

वाळू लिलाव बंद होणार आणि आता डेपोतूनच वाळू ६०० रुपयात मिळणार | सर्वसामान्यांसाठी वाळू स्वस्त! ६०० रुपये प्रती ब्रास दरात मिळणार वाळू!

जलयुक्त शिवार अभियानासाठी जिल्हास्तरीय समिती स्थापन

Maharashtra Sarkari Yojna | महाराष्ट्र राज्य सरकारने सुरू केलेल्या या काही प्रमुख सरकारी योजना

महाराष्ट्र सरकारने आपल्या नागरिकांचा विकास, कल्याण आणि सर्वसमावेशकता वाढवण्यासाठी विविध योजना आणि धोरणे लागू केली आहेत. या योजना आणि धोरणांमध्ये कृषी, सिंचन, उद्योजकता, आरोग्य, शिक्षण आणि समाजकल्याण अशा विविध क्षेत्रांचा समावेश आहे. राज्य सरकारने, केंद्र सरकारच्या भागीदारीत, गरिबी, बेरोजगारी आणि पर्यावरणाचा ऱ्हास या आव्हानांना तोंड देण्यासाठी अनेक कार्यक्रम सुरू केले आहेत. या उपक्रमांनी महाराष्ट्रातील लोकांचे जीवनमान सुधारण्यात आणि शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण प्रभाव पाडला आहे. एकंदरीत, सर्वसमावेशक वाढ आणि विकासावर सरकारचे लक्ष कौतुकास्पद आहे आणि महाराष्ट्राला आणखी प्रगती आणि समृद्धीकडे नेण्याची अपेक्षा आहे.

कृषी शिक्षण, संशोधन आणि विस्तार ही तीन प्रमुख उद्दिष्टे समोर ठेवून आज राहुरी कृषी विद्यापीठाचे कामकाज सुरू आहे. नगर, मनमाड या महामार्गावर अहमदनगरपासून ३५ कि.मी. अंतरावर असलेले हे विद्यापीठ आज महाराष्ट्रातीलच नव्हे, तर देशभरातील अनेक शेतकऱ्यांसाठी तीर्थक्षेत्र बनले आहे.

नगर जिल्ह्याचा समृध्द वारसा | कृषी शिक्षणाची पंढरी – महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी

कृषी शिक्षण, संशोधन आणि विस्तार ही तीन प्रमुख उद्दिष्टे समोर ठेवून आज राहुरी कृषी विद्यापीठाचे कामकाज सुरू आहे. नगर, मनमाड या महामार्गावर अहमदनगरपासून ३५ कि.मी. अंतरावर असलेले हे विद्यापीठ आज महाराष्ट्रातीलच नव्हे, तर देशभरातील अनेक शेतकऱ्यांसाठी तीर्थक्षेत्र बनले आहे.

मोबाइलमध्ये नक्की ठेवा हे ३ ॲप्स!

मोबाइलमध्ये नक्की ठेवा हे ३ ॲप्स!

महाशिवरात्री निमित्त भाविकांसाठी जिल्हा प्रशासन सज्ज - जिल्हाधिकारी

महाशिवरात्रिसाठी बाजारात आता सर्टिफाईड रुद्राक्ष व रत्ने ! आधुनिक पूजा सामुग्री

महाशिवरात्रिसाठी बाजारात आता सर्टिफाईड रुद्राक्ष व रत्ने ! आधुनिक पूजा सामुग्री

अहमदनगर औरंगाबाद रस्त्यावर अहमदनगरपासून सुमारे ६६ कि. मी. वर श्रीक्षेत्र देवगड आहे. हे पवित्र क्षेत्र म्हणजे भूलोकावरील स्वर्गच म्हणता येईल. सदर मंदीर हे अत्यंत सर्वांगसुंदर व पवित्र क्षेत्र नेवासेपासून जवळच आहे. सदर देवस्थान किसनगिरीजी महाराज यांनी स्थापन केलेले आहे. देवगड या क्षेत्राचा विकास भास्करगिरी महाराजांनी केला.

परिपत्रक – ‘आपले सरकार तक्रार निवारण प्रणालीमधील तक्रारींबाबत करावयाची कार्यवाही.’

आपले सरकार तक्रार निवारण प्रणालीमधील तक्रारींबाबत करावयाची कार्यवाही.

अमृतवाहिनी प्रवरेकाठी वसलेल्या नेवासे (पूर्वीचे निधीनिवास) गावात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांनी शके १२१२ मध्ये ज्ञानेश्वरी कथन केली. ज्ञानेश्वरी लिहून घेणारे सच्चिदानंद बाबा नेवासे परिसरातलेच. करविरेश्वराच्या मंदिरात ज्या खांबाला टेकून ज्ञानेश्वर बसत असत, तो १.५ मीटर उंचीचा दगडी पैस खांबावर आज भाविकांचे श्रद्धास्थान बनला आहे.

उमरी पोलीस स्टेशनच्या भिंतीही देतात स्वातंत्र्यासाठी केलेल्या हल्ल्याची साक्ष • निजामाच्या जोखडातून मुक्तीसाठी उमरी बँक, पोलीस स्टेशन हल्ल्याच्या घटनेला आज 75 वर्षे पूर्ण

उमरी पोलीस स्टेशनच्या भिंतीही देतात स्वातंत्र्यासाठी केलेल्या हल्ल्याची साक्ष • निजामाच्या जोखडातून मुक्तीसाठी उमरी बँक, पोलीस स्टेशन हल्ल्याच्या घटनेला आज 75 वर्षे पूर्ण

इंद्रायणी थडी जत्रेचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन | देशाच्या विकासासाठी महिलांना अर्थव्यवस्थेच्या प्रवाहात सहभागी करावे लागेल - उपमुख्यमंत्री

इंद्रायणी थडी जत्रेचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन | देशाच्या विकासासाठी महिलांना अर्थव्यवस्थेच्या प्रवाहात सहभागी करावे लागेल – उपमुख्यमंत्री

इंद्रायणी थडी जत्रेचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन | देशाच्या विकासासाठी महिलांना अर्थव्यवस्थेच्या प्रवाहात सहभागी करावे लागेल - उपमुख्यमंत्री