महाराष्ट्र शासन योजना

जिल्हा बाल संरक्षण कक्षामार्फत बालविवाह प्रतिबंध कायद्याची इसापूर रमना येथे जनजागृती

हिंगोली दि. २६ (आजचा साक्षीदार): येथील श्री शिवाजी महाविद्यालयाच्या वतीने दि. 20 जानेवारी, 2023 रोजी हिंगोली तालुक्यातील इसापूर रमना येथे जि.प.मा.शाळेमध्ये आयोजित राष्ट्रीय सेवा योजना निवासी शिबीरामध्ये जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विठ्ठल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे यांच्या नियोजनानुसार जिल्हा बाल संरक्षण कक्षामार्फत बालविवाह प्रतिबंध कायदा 2006 विषयी जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला.

या कार्यक्रमामध्ये जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे यांनी बाल विवाह निर्मुलन या विषयावर सविस्तर माहिती दिली. यामध्ये बाल विवाह प्रतिबंधक अधिनियम, 2006 नुसार असे विवाह बेकायदा ठरतात आणि या विरोधात गुन्हा नोंदविला जाणे अपेक्षित आहे व अशा गुन्ह्यास एक लाख रुपये दंड व दोन वर्षे सक्त मजुरीची शिक्षा आहे. या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी ग्रामीण भागासाठी ग्रामसेवक आणि शहरी भागासाठी बाल विकास प्रकल्प अधिकारी यांना बाल विवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहेत. तसेच ग्रामस्तरावर ग्राम बाल संरक्षण समिती स्थापन करण्यात आली असून या समितीचे अध्यक्ष सरपंच आहेत व सदस्य सचिव अंगणवाडी सेविका आहे. या सर्वानी आपापल्या कार्यक्षेत्रात बालविवाह होणार नाही याची खबरदारी घ्यावी.

तसेच मुलीच्या वयाची 18 वर्ष व मुलाच्या वयाची 21 वर्ष पूर्ण होण्याच्या आगोदर लग्न करणे हा कायद्याने गुन्हा आहे, असे सांगितले. कायदा व परिविक्षा अधिकारी अॅड. अनुराधा पंडित यांनी बाल विवाहाचे दुष्परिणामाबाबत माहिती दिली. समुपदेशक सचिन पठाडे यांनी महाराष्ट्रातील बाल विवाहाचे प्रमाण आणि जिल्ह्याची स्थिती या बाबत पीपीटीच्या माध्यमातून सादरीकरण केले. यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी बाल विवाह प्रतिबंध या विषयावर पथ नाट्य सादर केले.

जिल्ह्यातील कोणत्याही ठिकाणी बाल विवाह होणार असल्याबाबतची माहिती मिळताच चाईल्ड लाईन टोल फ्री क्रमांक 1098 किंवा पोलीस हेल्प लाईन क्रमांक 112 यावर माहिती देण्याबाबत उपस्थित गावकऱ्यांना सांगितले.

कार्यक्रमाच्या शेवटी जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे यांनी सर्व उपस्थितांकडून बाल विवाह प्रतिबंधक प्रतिज्ञेचे वाचन करुन शपथ देण्यात आली. या कार्यक्रमासाठी बाल संरक्षण अधिकारी (संस्थाबाह्य) जरीबखान पठाण, कायदा व परविक्षा अधिकारी अॅड. अनुराधा पंडित, सामाजिक कार्यकर्ता रामप्रसाद मुडे, समुपदेशक सचिन पठाडे, तसेच श्री शिवाजी महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.संगीता मुंडे, प्रा.डॉ.सुनिल कांबळे, प्रा.डॉ.मनिषा गवळी, कनिष्ठ विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रा. बळीराम शिंदे, प्रा. संजय चव्हाण व राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व स्वयंसेवक, गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

जिल्हा बाल संरक्षण कक्षामार्फत बालविवाह प्रतिबंध कायद्याची
इसापूर रमना येथे जनजागृती

जिल्हा बाल संरक्षण कक्षामार्फत बालविवाह प्रतिबंध कायद्याची इसापूर रमना येथे जनजागृती

जलयुक्त शिवार योजनेत राहाता तालुक्यात २१ गावांची निवड | प्रशासन करतेयं शिवार फेऱ्यांद्वारे जनजागृती

हिंदू परंपरेनुसार, नदीत स्नान केल्याने अनेक आध्यात्मिक आणि शारीरिक फायदे होतात असे मानले जाते. यापैकी काही फायद्यांचा समावेश आहे.!

हिंदू परंपरेनुसार, नदीत स्नान केल्याने अनेक आध्यात्मिक आणि शारीरिक फायदे होतात असे मानले जाते. यापैकी काही फायद्यांचा समावेश आहे.!

किडनी वाचवा आणि डायलिसिस थांबवा अभियानांतर्गत आयोजित निबंध स्पर्धेचे 26 जानेवारी रोजी बक्षीस वितरण

किडनी वाचवा आणि डायलिसिस थांबवा अभियानांतर्गत आयोजित निबंध स्पर्धेचे 26 जानेवारी रोजी बक्षीस वितरण

साखर उद्योगाच्या समस्या सोडविण्यासाठी केंद्राचे सहकार्य – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांच्याशी सकारात्मक चर्चा

साखर उद्योगाच्या समस्या सोडविण्यासाठी केंद्राचे सहकार्यमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांच्याशी सकारात्मक चर्चा नवी दिल्ली, दि. 26 (आजचा साक्षीदार) : ...

जलयुक्त शिवार योजनेत राहाता तालुक्यात २१ गावांची निवड | प्रशासन करतेयं शिवार फेऱ्यांद्वारे जनजागृती

जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियान 2.0 सुरुवात….

जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियान 2.0 सुरुवात.... ग्रामपंचायतींनी प्रजासत्ताक दिनी ग्रामसभेत जलयुक्त शिवार, गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार बाबतचे ठराव घ्यावेत

सकस आहार तिरंगा थाळी स्पर्धेचे उद्घाटन

श्री क्षेत्र घृष्णेश्वर वेरुळ विकास आराखड्या बाबत..

श्री क्षेत्र घृष्णेश्वर वेरुळ विकास आराखड्या

“साडेतीन शक्तिपीठे आणि नारी शक्त‍ि” वर आधारीत महाराष्ट्राचा चित्ररथ प्रजासत्ताक दिनी राजधानीतील कर्तव्यपथावर दिसणार

“साडेतीन शक्तिपीठे आणि नारी शक्त‍ि” वर आधारीत महाराष्ट्राचा चित्ररथ प्रजासत्ताक दिनी राजधानीतील कर्तव्यपथावर दिसणार

२६ जानेवारीला राज्यातील जवळपास सर्व गावात ग्रामसभा होतील, त्यासाठी हे अत्यंत महत्वाचे परिपत्रक!

२६ जानेवारीला राज्यातील जवळपास सर्व गावात ग्रामसभा होतील, त्यासाठी हे अत्यंत महत्वाचे परिपत्रक!

भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती सन 2022-23 चे प्रलंबित अर्ज महाविद्यालयांनी 30 जानेवारीपर्यंत पाठविण्याचे आवाहन

भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती सन 2022-23 चे प्रलंबित अर्ज महाविद्यालयांनी 30 जानेवारीपर्यंत पाठविण्याचे आवाहन

नवीन मतदार नोंदणीसाठी पुढील ऑनलाइन पर्यायांचा वापर करा

नवीन मतदार नोंदणीसाठी पुढील ऑनलाइन पर्यायांचा वापर करा