महाराष्ट्र शासन योजना

नांदेड दि. 1 :– महाराष्ट्राच्या सिमेवर असलेल्या किनवट तालुक्यातील भोगरवाडा हे आदिवासी गोंड जमातीचे गाव. “माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी” या महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या अभिनव पथदर्शी उपक्रमामुळे या गावाच्या आत्मविश्वासाला आज नवी जोड मिळाली. निमित्त ठरले नांदेडचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांचे भोगरवाडा गावात शेतकऱ्यांसमवेत संपूर्ण दिवसभर राहणे, त्यांच्या सोबत शेतशिवार फेरी करून पीक पद्धतीला समजून घेण्यासाठी महत्वपूर्ण ठरले. गावातील शेतीलापूरक ठरेल अशी पीक पद्धती लक्षात घेणे व शेतकऱ्यांना या बदलापर्यंत विचाराच्या जवळ आणणे हा उद्देश सफल करीत भोगरवाडा गावाने या उपक्रमातून सेंद्रिय हळदीचे गाव म्हणून आम्ही विकसित करू असा आत्मविश्वास निर्माण केला.

तर महाराष्ट्राच्या सिमेवर असलेले भोगरवाडा सेंद्रिय हळदीचे गाव म्हणून ओळखले जाईल!▪️कृषि अधिकाऱ्यांनी एक दिवस गावात देऊन शेतकऱ्यांच्या मनात जागविला विश्वास

या गावातील शेतकरी पिढीच्या रिवाजानुसार कापूस व सोयाबीन या पिकावर अधिक भर देत आले आहेत. गावाच्या चोहुबाजुला डोंगर आणि झाडी. पावसाचे प्रमाण समाधानकारक असल्याने पाण्याची पातळी ही बऱ्यापैकी या गावात चांगली आहे. निलगाय, हरण, रानडुक्कर यांच्या त्रासापासून व होणाऱ्या नुकसानीपासून वाचण्यासाठी त्यातल्या त्यात गावातील शेतकऱ्यांनी कापसाला जवळ केले. मात्र यातून आर्थिक गणित सावरेलच याची शाश्वती नाही. यापासून प्रवृत्त करून त्यांच्या हाती नवीन पीक पद्धती देणे, त्यांना अधिक उत्पादन घेता यावे यासाठी उच्च तंत्रज्ञानाची ओळख करून देणे हे आवश्यक होते. शासनाच्या एक दिवस माझ्या बळीराजासाठी अंतर्गत प्रत्यक्ष कृषि अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने त्यांना शेतीच्या विकासाचा आज नवा मार्ग गवसला.

ज्योतिराम पांडुरंग तुमराम या आदिवासी शेतकऱ्याच्या घरी चलवदे थांबले. तुमराम यांची चार एकर जमीन या गावात आहे. नवीन तंत्रज्ञान आम्ही आत्मसात करायला तयार असून शासनाने ज्या योजना दिल्या आहेत त्याचा अधिक डोळस वापर करू असे त्यांनी सांगितले. भोगरवाडा गावातील शिवार व येथील जमीन फलोत्पादनासाठी चांगली आहे. येथे सिताफळ, पेरू चांगल्या पद्धतीने पिकू शकतील. ज्यांना फलोत्पादन शक्य नाही त्या शेतकऱ्यांनी हळदी सारखे पीक उत्तम पद्धतीने घेण्यासाठी पुढे सरासवले पाहिजे. इथल्या जमिनीचा पोत चांगला असून सेंद्रीय खताच्या माध्यमातून या गावाला सेंद्रीय हळदीचे गाव म्हणून विकसीत करण्यात मोठा वाव असल्याचे रवीशंकर चलवदे यांनी सांगितले.

या भागात निलगाय, हरण, रानडुक्कर सारखे प्राणी शेतीच्या पिकांना हानी पोहोचवतात. हे लक्षात घेता वन विभागाच्या नियमानुसार शेत शिवाराच्या भोवताली मोठा चर करणे याबाबत शक्य-अशक्यता पडताळून पाहिली जाईल, असे त्यांनी गावकऱ्यांना सांगितले. येथे उष्णतेचे प्रमाण लक्षात घेता सौर ऊर्जा आणि ठिबक सारखे तंत्रज्ञान शेतकऱ्यांनी जवळ केले तर यात मोठा बदल साध्य करता येईल. याचबरोबर दुग्धव्यवसाय, बकरी पालन, कुक्कुटपालन याला मोठा वाव असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदे यांनी सांगून शेतकऱ्यांच्या मनात नवा विश्वास निर्माण केला.

तर महाराष्ट्राच्या सिमेवर असलेले भोगरवाडा सेंद्रिय हळदीचे गाव म्हणून ओळखले जाईल!▪️कृषि अधिकाऱ्यांनी एक दिवस गावात देऊन शेतकऱ्यांच्या मनात जागविला विश्वास

तर महाराष्ट्राच्या सिमेवर असलेले भोगरवाडा सेंद्रिय हळदीचे गाव म्हणून ओळखले जाईल!▪️कृषि अधिकाऱ्यांनी एक दिवस गावात देऊन शेतकऱ्यांच्या मनात जागविला विश्वास

पिक नुकसानीचे सर्व्हेक्षण नि:शुल्क शेतकऱ्यांनी पैसे देऊ नये – कृषी विभागाचे आवाहन

पिक नुकसानीचे सर्व्हेक्षण नि:शुल्क शेतकऱ्यांनी पैसे देऊ नये - कृषी विभागाचे आवाहन

अनुसूचित जातीतील युवक व युवतींकरीता उद्योजकता विकास शिबीरआहे |18 दिवसांचे नि:शुल्क निवासी उद्योजकता प्रशिक्षण

अनुसूचित जातीतील युवक व युवतींकरीता उद्योजकता विकास शिबीरआहे |18 दिवसांचे नि:शुल्क निवासी उद्योजकता प्रशिक्षण

अंमली पदार्थ विक्रीची माहिती मिळाल्यास तात्काळ संबंधित पोलीस स्टेशनला कळवा – न्यायाधीश डी. एम. जज • विधी सेवा प्राधिकरणाच्यावतीने कायदेविषयक शिबिराचे आयोजन

अंमली पदार्थ विक्रीची माहिती मिळाल्यास  तात्काळ संबंधित पोलीस स्टेशनला कळवा - न्यायाधीश डी. एम. जज •  विधी सेवा प्राधिकरणाच्यावतीने कायदेविषयक शिबिराचे आयोजन

एक दिवस माझ्या बळीराजासाठी उपक्रमांतर्गत चर्चासत्र व कार्यक्रम संपन्न…

एक दिवस माझ्या बळीराजासाठी उपक्रमांतर्गत चर्चासत्र व कार्यक्रम संपन्न...

आरसेटीव्दारे कुक्कुटपालनाचे निशुल्क प्रशिक्षण..

आरसेटीव्दारे  कुक्कुटपालनाचे निशुल्क प्रशिक्षण..

उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुक्रवारी नोंदणी व मुद्रांक भवनाचे भूमिपूजन

उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुक्रवारी नोंदणी व मुद्रांक भवनाचे भूमिपूजन

संगमनेरमधील शेतकऱ्यांना महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते कृषी साधनांचे वाटप

संगमनेरमधील शेतकऱ्यांना महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते कृषी साधनांचे वाटप

‘वन स्टेशन वन शॉप’ – महिला बचतगटाची उत्पादने प्रवाशांमार्फत जाणार देशभर; अकोला रेल्वे स्थानकावर स्टॉल कार्यान्वित

‘वन स्टेशन वन शॉप’ - महिला बचतगटाची उत्पादने प्रवाशांमार्फत जाणार  देशभर; अकोला रेल्वेस्थानकावर स्टॉल कार्यान्वित

पिकांच्या उत्पादन वाढीसाठी एकदिवशीय कार्यशाळा संपन्न

पिकांच्या उत्पादन वाढीसाठी एकदिवशीय कार्यशाळा संपन्न