महाराष्ट्र शासन योजना

भारतीय डाक विभागाची ‘गोल्ड बॉन्ड’ योजना …

अकोला, दि.२३(आजचा साक्षीदार) – रिझर्व बॅंक ऑफ इंडीया द्वारा संचलित ‘सॉव्हरिन गोल्ड बॉन्ड योजना’ दि.२२ते २६ ऑगस्ट या दरम्यान भारतीय डाक विभाग मार्फत राबविण्यात येत आहे, या योजनेचा ग्राहकांनी लाभ घ्यावा,असे आवाहन प्रवर अधीक्षक, डाकघर, अकोला डाकविभाग अकोला यांनी केले आहे.

असे आहे योजनेचे स्वरुपः या योजने मध्ये अगदी एक ग्राम सोन्या पासून ते ४ किलो ग्राम पर्यंत गुंतवणूक करता येते. एक ग्राम गोल्ड बॉन्ड चा दर हा ५ हजार १९७ रुपये इतका आहे. या योजने मध्ये गुंतवणूकदाराना वार्षिक अडीच टक्के दराने व्याज मिळते. दर सहा महिन्यांनी व्याजाची रक्कम मिळते. यात प्रत्यक्ष सोन्याप्रमाणे जीएसटी किंवा मेकिंग चार्जेस लागत नाहीत. गुंतवणुकीवर कॅपिटल गेन टॅक्स आकाराला जात नाही. या योजनेचा परिपक्वता कालावधी आठ वर्ष असून पाच ते सात वर्ष कालावधी दरम्यान मुदतपूर्व बॉन्ड बंद करता येतो. परिपक्वतेच्या वेळेस सोन्याच्या विद्यमान बाजारभावाची हमी, तसेच त्या व्यतिरिक्त नियमित व्याज सुद्धा मिळते.

यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात डाक विभागाने म्हटले आहे की, ‘सॉव्हरिन गोल्ड बॉन्ड’ हा गुंतावणुकीचा सुरक्षित पर्याय मानला जातो. त्यामुळे जोखीम कमी होते.

आवश्यक कागदपत्रे: पॅनकार्ड, आधार कार्ड, बँक पासबूक/ Cancelled Cheque. ही योजना अकोला डाक विभागातील सर्व डाकघरांमध्ये उपलब्ध असून या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रवर अधिक्षक डाकघर अकोला विभाग, अकोला यांनी केले आहे.

भारतीय डाक विभागाची ‘गोल्ड बॉन्ड’ योजना …

भारतीय डाक विभागाची ‘गोल्ड बॉन्ड’ योजना ...

नई रोशनी लोक संचलित साधन केंद्राची सभा संपन्न महिलांनी उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून स्वत: बरोबर आपल्या कुटुंबाचा विकास साधावा – सहा. महाप्रबंधक सुनिल नवसारे

नई रोशनी लोक संचलित साधन केंद्राची सभा संपन्न महिलांनी उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून स्वत: बरोबर आपल्या कुटुंबाचा विकास साधावा - सहा. महाप्रबंधक सुनिल नवसारे

कृषी योजनांचा लाभ 29 ऑगस्टपर्यंत महाडीबीटीद्वारे लाभ घ्या कृषी विभागाचे आवाहन

कृषी योजनांचा लाभ 29 ऑगस्टपर्यंत महाडीबीटीद्वारे लाभ घ्या कृषी विभागाचे आवाहन

कुंडलिका-सीना नदीच्या पुनरुज्जीवनासाठी प्रशासनाचे सवतोपरी सहकार्य – जिल्हाधिकारी

कुंडलिका-सीना नदीच्या पुनरुज्जीवनासाठी प्रशासनाचे सवतोपरी सहकार्य - जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड

कंत्राटी पदासाठी माजी सैनिकांची निवड चाचणी . ..

कंत्राटी पदासाठी माजी सैनिकांची निवड चाचणी . ..

दुचाकींसाठी नोंदणी क्रमांकाची नवीन मालिका….

नोंदणी क्रमांक मालिकेतील आकर्षक क्रमांक लिलाव पद्धतीने चारचाकींसाठी राखून ठेवता येणार

सेवायोजन कार्डसाठी ऑनलाईन नोंदणी सुरू; विद्यार्थ्यांसाठी अनिवार्य

बेरोजगारांच्या सेवा सोसायट्यांना कामाचे वाटप प्रस्ताव सादर करण्यास 30 ऑगस्ट पर्यंत मुदत…

बेरोजगारांच्या सेवा सोसायट्यांना कामाचे वाटप  प्रस्ताव सादर करण्यास 30 ऑगस्ट पर्यंत मुदत...

कोविडमुळे निराधार झालेली बालके शाळाबाह्य होणार नाहित याची काळजी घ्या – जिल्हाधिकारी यांच्या सुचना

कोविडमुळे निराधार झालेली बालके शाळाबाह्य होणार नाहित याची काळजी घ्या -  जिल्हाधिकारी यांच्या सुचना 

अल्पसंख्याक विद्यार्थी बहुल संस्थांना अनुदान; 31 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

अल्पसंख्याक विद्यार्थी बहुल संस्थांना अनुदान; 31 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

सेंद्रीय शेतमालाच्या बाजारावर पकड निर्माण कराकेले – जिल्हाधिकारी

सेंद्रीय शेतमालाच्या बाजारावर पकड निर्माण कराकेले - जिल्हाधिकारी अमोल येडगे