‘एलआयसी’ची ‘ही’ पाॅलिसी म्हातारपणात होईल आधाराची काठी, जाणून घ्या..
नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन ही ‘एलआयसी’ नवनवीन विमा पॉलिसी आणत असते. अशीच एक योजना म्हणजे, ‘एलआयसी जीवन उमंग पॉलिसी’… ही एक ‘एंडोमेंट पॉलिसी’ (LIC Jeevan Umang Policy) आहे. त्यात सुरक्षेबरोबरच उत्पन्नाचाही लाभ मिळतो. या योजनेत 15, 20, 25 किंवा 30 वर्षांसाठी गुंतवणूक करता येते.
‘एलआयसी जीवन उमंग पॉलिसी’ (LIC Jeevan Umang Policy) बाबत…
‘एलआयसी’च्या या योजनेअंतर्गत, 90 दिवस ते 55 वर्षांपर्यंतची व्यक्ती लाभ घेऊ शकते. ‘लाइफ कव्हर’सह या योजनेत मॅच्युरिटीवर रक्कम मिळते. मॅच्युरिटी काळ पूर्ण झाल्यावर, तुमच्या बँक खात्यात निश्चित उत्पन्न येऊ लागते. पाॅलिसीधारकाचा मध्येच मृत्यू झाल्यास, त्याच्या वारसांना एकरकमी रक्कम दिली जाते.
‘एलआयसी जीवन उमंग पॉलिसी’ (LIC Jeevan Umang Policy) योजनेचे फायदे
‘एलआयसी’च्या ‘एलआयसी जीवन उमंग पॉलिसी’ या पॉलिसीचे वैशिष्ट्य म्हणजे, प्रीमियम भरल्याच्या मुदतीनंतर 100 वर्षांपर्यंत वार्षिक उत्पन्नाचा लाभ मिळतो. वार्षिक प्लॅनच्या 8 टक्के रक्कम दिली जाते.
समजा, तुमचे वय 26 वर्षे आहे. तुम्ही 4.5 लाखांच्या विमा संरक्षणासाठी ही पॉलिसी घेतली, तर 30 वर्षांसाठी प्रीमियम जमा करावा लागेल. तुम्ही 30 वर्ष पूर्ण प्रीमियम भरला, की तर 31 व्या वर्षापासून तुम्हाला 8 टक्के दराने वार्षिक 36,000 रुपये मिळण्यास सुरुवात होईल. तुमच्या वयाच्या 100 वर्षांपर्यंत हे पैसे मिळतील.
‘एलआयसी जीवन उमंग पॉलिसी (LIC Jeevan Umang Policy) धारकाच्या मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास, रायडर टर्म अंतर्गत कव्हर दिले जाते. पॉलिसीधारकाचा 100 वर्षे वयाआधी मृत्यू झाल्यास, सर्व पैसे नॉमिनीला दिले जातील. तुमच्या सोयीनुसार एकरकमी किंवा हप्त्यांमध्ये रक्कम घेऊ शकता. शिवाय, आयकर कलम 80C अंतर्गत या पॉलिसीमध्ये सूट मिळते. मात्र, किमान 2 लाख रुपयांचा विमा काढणं अनिवार्य आहे.