आरोग्य

अकोला,दि.5 – निदान न झालेले कुष्ठरुग्णांचा तसेच नविन सांसर्गिक कुष्ठरुग्ण शोधून बहुविधी औषधोपचाराव्दारे संसर्गाची साखळी खंडीत करुन संसर्गाचा आटोक्यात आणण्याचे निर्देश अपर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे यांनी संबंधिताना दिले.

कुष्ठरुग्ण व क्षयरुग्णांकरीता शोध मोहिम राबवा;  अपर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे यांचे निर्देश

अपर जिल्हाधिकारी यांच्या दालनात कुष्ठरुग्ण व क्षयरुग्ण शोध मोहिम समन्वय समिती आढावा बैठकीचे आयोजन अपर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. मनिष शर्मा, जिल्हा मलेरीया अधिकारी डॉ. आदित्य महानकर, मनपाचे सहा.क्षयरोग अधिकारी डॉ. अस्मिता पाठक, आरोग्य सेवा कुष्ठरोग सहायक संचालक डॉ. संदीप बाबर आदि संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

जिल्हा समन्वय समिती सभेमध्ये अपर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे यांनी निर्देश दिले की, जिल्ह्यातील कुष्ठरोग व क्षयरोग रुग्णांचा शोध घेण्याकरीता 13 ते 30 सप्टेंबर 2022 या कालावधीत शोध मोहिम कार्यक्रम यशस्वी व प्रभावीपणे राबवा. या करीता जिल्हा व ग्रामस्तरावरील आशा व पुरुष स्वयंसेवक व विविध स्तरावरील पर्यवेक्षकांना प्रशिक्षीत करा. प्रशिक्षीत पथकाव्दारे गृहभेटी दरम्यान कुष्ठरुग्ण व क्षयरुग्णाबाबतची माहिती देऊन संशयीत रुग्णांची वेळेत तपासण्या करुन उपचार करण्या बाबत प्रोत्साहित करा. उपचाराने हा रोग बरा होतो याची खात्री करुन द्या. रुग्णांची माहिती गोपनीय राहिल यांची दक्षता संबंधितांनी घ्यावी. या शोध मोहिमेतून कुष्ठरोग व क्षयरोग रुग्ण सुटता कामा नये. याकरीता करीता सुक्ष्मकृती आराखड्यानुसार अभियानाचे नियोजन करा, असे निर्देश अपर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे यांनी यावेळी दिले.

यावेळी माहिती देण्यात आली की, जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील 2 लक्ष 76 हजार 659 घरांना भेटी देवून शहरी व ग्रामिण भागातील एकूण 13 लक्ष 83 हजार 294 लोकांच्या सर्व्हेव्दारे कुष्ठरोग व क्षयरोग रुग्णांचा शोध घेण्यात येईल. त्यासाठी 1042 चमू तयार करण्यात आले आहेत. हे चमू दि. 13 ते 30 सप्टेंबर या कालावधीत घरोघरी भेट देणार आहेत. या सर्वेक्षणाचे काम आशा सेविका व पुरुष स्वंयसेवक करणार आहे. या कालावधीत दररोज एका चमुमार्फत त्यांना नेमून दिलेल्या कार्यक्षेत्रातील ग्रामीण भागात 20 घरे व शहरी भागात 25 घरांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. घरातील सर्व सदस्यांची तपासणी करुन घराच्या दरवाजावर खूण करण्यात येणार आहे. क्षयरोग रोगाची लक्षणे आढळल्यास रुग्णांच्या थुंकीचे एक तासाच्या अंतराने दोन नमूने घेण्यात येतील. आवश्यकता वाटल्यास छातीचा एक्स-रे काढण्यात येईल. तसेच कुष्ठरोगाची लक्षणे आढळल्यास त्यांची प्राथमिक तपासणी करण्यात येईल. यासाठी सर्व नियोजन करण्यात आले असल्याची माहिती सहाय्यक संचालक कुष्ठरोग डॉ. संदीप बाबर यांनी दिली. या मोहिमेबाबत पथनाट्य, पोस्टर्स, बॅनर्स व ध्वनीक्षेपकाव्दारे जनजागृती करण्यात येणार आहे.

कुष्ठरुग्ण व क्षयरुग्णांकरीता शोध मोहिम राबवा; अपर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे यांचे निर्देश

कुष्ठरुग्ण व क्षयरुग्णांकरीता शोध मोहिम राबवा;  अपर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे यांचे निर्देश

कृष्ठरुग्ण शोध मोहिम व सक्रीय क्षयरुग्ण शोध मोहिम • कालावधी :- १३ ते ३० सप्टेंबर २०२२ • तालुका समन्वय समिती सभा

कृष्ठरुग्ण शोध मोहिम व सक्रीय क्षयरुग्ण शोध मोहिम • कालावधी :- १३ ते ३० सप्टेंबर २०२२ • तालुका समन्वय समिती सभा

लंपी स्कीन डिसीजचा संभाव्य प्रसार रोखण्यासाठी जिल्हा व तालुकास्तरीय नियंत्रण कक्ष • लंपी स्कीन आजाराची लक्षणे दिसताच पशुपालकांनी नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन

लंपी स्कीन डिसीजचा संभाव्य प्रसार रोखण्यासाठी जिल्हा व तालुकास्तरीय नियंत्रण कक्ष • लंपी स्कीन आजाराची लक्षणे दिसताच पशुपालकांनी नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन

डेंग्यू, मलेरिया, चिकनगुन्या आजाराला प्रतिबंध करण्यासाठी दक्षता घेण्याचे आवाहन…

डेंग्यू, मलेरिया, चिकनगुन्या आजाराला प्रतिबंध करण्यासाठी दक्षता घेण्याचे आवाहन...

1 ते 30 सप्टेंबरपर्यंत राष्ट्रीय पोषण महिना : विविध उपक्रमांचे आयोजन

1 ते 30 सप्टेंबरपर्यंत राष्ट्रीय पोषण महिना : विविध उपक्रमांचे आयोजन

जिल्हा सामान्य रुग्णालयात कायदे विषयक जनजागृती शिबीर संपन्न…

जिल्हा सामान्य रुग्णालयात कायदे विषयक जनजागृती शिबीर संपन्न...

पोषण महिन्यानिमित्त सप्टेंबरमध्ये विविध कार्यक्रम

पोषण महिन्यानिमित्त सप्टेंबरमध्ये विविध कार्यक्रम

राष्ट्रीय पोषण महिन्यानिमित्त विविध उपक्रमांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी – जिल्हाधिकारी

राष्ट्रीय पोषण महिन्यानिमित्त विविध उपक्रमांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी - जिल्हाधिकारी

पर्यावरणाला बाधा पोहोचविणाऱ्या मूर्ती विसर्जनासाठी संकलन केंद्राकडे सुर्पूद कराव्यात

पर्यावरणाला बाधा पोहोचविणाऱ्या मूर्ती विसर्जनासाठी संकलन केंद्राकडे सुर्पूद कराव्यात

मेळघाटात आरोग्य सुविधांबरोबरच जनजागृतीही करा – खासदार डॉ. अनिल बोंडे

मेळघाटात आरोग्य सुविधांबरोबरच जनजागृतीही करा - खासदार डॉ. अनिल बोंडे