आरोग्य

खाद्यपदार्थ वर्तमानपत्राच्या कागदातुन दिल्यास विक्रेत्यांवर होणार कारवाई…तपासणीसाठी अन्न सुरक्षा अधिकारी यांची पथके तैनात


कोल्हापूर : विविध खाद्यपदार्थ उदा. बटाटे वडे, भजी, समोसे, कचोरी, भेळ, इडली, पोहे, कच्छी दाबेली, पॅटीस, मसाला टोस्ट तसेच जिलेबी वैगेरे तयार करून विकणारे अन्न व्यावसायिक हे खाद्यपदार्थ तयार करून ग्राहकांना वर्तमानपत्राच्या अथवा मासिकांच्या पानांमधून देताना आढळल्यास त्यांच्यावर अन्न सुरक्षा व मानदे कायदा, २००६ अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. अशा प्रकारच्या कागदांच्या वापरास कायद्यानुसार बंदी आहे. याप्रकारच्या खाद्यपदार्थांचे व्यावसायिक हे तरतुदींचे पालन करत असल्याची शहानिशा करण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाने अन्न सुरक्षा अधिकारी यांची पथके तैनात केली असून सध्या त्यांच्या मार्फत वरील प्रकारच्या विविध अन्न व्यावसायिकांची तपासणीची मोहीम सुरू आहे, अशी माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त मोहन केंबळकर यांनी दिली.


हातगाडीवर किंवा एखादा खाद्यपदार्थ तयार करून विकणाऱ्या, स्नॅक सेंटर, मिठाई दुकानातून, हॉटेल अथवा उपहारगृहामध्ये बटाटे वडे, भजी, समोसे, कचोरी, भेळ, इडली, पोहे, कच्छी दाबेली, पॅटीस, मसाला टोस्ट अथवा जिलेबी यासारखे खाद्यपदार्थ तयार करून ते ग्राहकांना विकताना जर वर्तमानपत्रातून किंवा मासिकांच्या पानामधून देताना आढळल्यास अशा अन्न व्यावसायिकांवर अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत कडक कारवाई करण्यात येणार आहे. हे कृत्य नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक ठरू शकते.
वर्तमानपत्रासाठी वापरण्यात येणारी छपाईची शाई ही डायआयसो ब्युटाईल फ्थालेट, डायमिथाईल सल्फोक्साइड, न्याफ्थाईल अमाईन अॅरोमॅटिक हायड्रोकार्बन, मिनरल ऑईल, रेसीन्स व लेड यासारख्या केमिकलयुक्त रासायनिक पदार्थांपासून बनवलेली असल्याने व ही केमिकल्स तेलामध्ये विरघळणारे असल्याने छपाईची शाई ही खाद्यपदार्थांचे सेवन करताना आपल्या पोटामध्ये जाऊन त्यामुळे आतड्यांना ईजा होऊ शकते. त्यामुळे खाद्यपदार्थ जरी चांगला असला तरी तो याप्रकारचा कागद वापरल्याने विषारी शाईमुळे दूषित होतो व अशा दूषित पदार्थाच्या वारंवार सेवनामुळे त्वचारोग होण्याची शक्यता असते. तसेच किडनीचे आजार अथवा विविध कॅन्सर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.


त्यामुळे वरील व्यवसाय करणाऱ्या अन्न व्यावसायिकांनी ग्राहकांना खाद्यपदार्थ देताना ते वर्तमानपत्र अथवा मासिकांच्या पानामधून गुंडाळून अथवा पार्सल स्वरुपात न देता कोणतीही छपाई नसलेल्या कोऱ्या पेपरमधून अथवा खाकी कागदातून द्यावेत, ज्यामुळे खाद्यपदार्थ दूषित होणार नाहीत.


गृहीणींनीही चपाती ठेवण्याच्या बुट्टी/भांड्यामध्ये वर्तमानपत्राचा अथवा मासिकाचा कागद वापरू नये त्या ऐवजी स्वच्छ कापडाचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

खाद्यपदार्थ वर्तमानपत्राच्या कागदातुन दिल्यास विक्रेत्यांवर होणार कारवाई…तपासणीसाठी अन्न सुरक्षा अधिकारी यांची पथके तैनात

खाद्यपदार्थ वर्तमानपत्राच्या कागदातुन दिल्यास विक्रेत्यांवर होणार कारवाई...तपासणीसाठी अन्न सुरक्षा अधिकारी यांची पथके तैनात

आता काळजी घ्याल तरच पुढे एकमेकांना सावरू – जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर

आता काळजी घ्याल तरच पुढे एकमेकांना सावरू - जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर

पुणे शहरात दिवसभरात विक्रमी लसीकरण !|Pmcvaccination

लसीकरण प्रमाणपत्राशिवाय प्रवाशांच्या वाहतुकीला मनाई…

लसीकरण प्रमाणपत्राशिवाय प्रवाशांच्या वाहतुकीला मनाई...

पुणे शहरात दिवसभरात विक्रमी लसीकरण !|Pmcvaccination

जिल्ह्यातील प्रत्येक गावात आज कोविड-19 लसीकरणाची विशेष मोहिम… शासनातील प्रत्येक अधिकारी-कर्मचारी लसीकरणासाठी आपआपल्या गावी…

जिल्ह्यातील प्रत्येक गावात आज कोविड-19 लसीकरणाची विशेष मोहिम... शासनातील प्रत्येक अधिकारी-कर्मचारी लसीकरणासाठी आपआपल्या गावी...

लग्नानिमित्त जेवणाचा ठेका देताना नागरिकांनी खबरदारी बाळगावी अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त विवेक पाटील यांचे आवाहन…

लग्नानिमित्त जेवणाचा ठेका देताना नागरिकांनी खबरदारी बाळगावी अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त विवेक पाटील यांचे आवाहन...

जळगाव जिल्हा #कोरोना अपडेटस

जळगाव जिल्हा #कोरोना अपडेटस

आज नगर जिल्ह्यात ५४६ रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या ६३० बाधितांची रुग्ण संख्येत भर… रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.५६ टक्के…. आजचा साक्षीदार | Sakshidar

आज नगर जिल्ह्यात ५४६ रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या ६३० बाधितांची रुग्ण संख्येत भर… रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.५६ टक्के.... आजचा साक्षीदार | Sakshidar

अतिवृष्टी व वीजा चमकत असल्यास काय दक्षता घ्यावी…आजचा साक्षीदार |Sakshidar

अतिवृष्टी व वीजा चमकत असल्यास काय दक्षता घ्यावी…

वाशिम जिल्ह्यात आणखी १ कोरोना बाधित… कोरोना_अलर्ट

वाशिम जिल्ह्यात आणखी १ कोरोना बाधित... कोरोना_अलर्ट

सिक्स पॅक एब्स बनविण्यासाठी दररोज या योग आसनांचा सराव करा…Yoga Asanas For Getting Six Pack Abs

सिक्स पॅक एब्स बनविण्यासाठी दररोज या योग आसनांचा सराव करा…Yoga Asanas For Getting Six Pack Abs

सिक्स पॅक एब्स बनविण्यासाठी दररोज या योग आसनांचा सराव करा…Yoga Asanas For Getting Six Pack Abs