करिअर | नोकरी संधर्भ

पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यात 120 उमेदवारांची प्राथमिक निवड

जालना, दि. 30 ((आजचा साक्षीदार)) :- तरुण-तरुणी देशाचे भवितव्य आहे व आजच्या तरुणांना कौशल्य मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत रोजगाराची संधी मिळाली पाहिजे तरच देशातील तरुण स्वतःचा विकास करून देशाचाही विकास करेल. अद्यापपर्यंत आपण जे शिक्षण आत्मसात केले आहे, त्याचे आज जीवनातील चीज म्हणजेच नोकरी मिळणार आहे, असे प्रतिपादन जे.ई.एस. कॉलेज उपप्राचार्य डॉ. महावीर सदावर्ते यांनी केले.

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व जे.ई.एस. महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने दि 29 जानेवारी, 2025 रोजी बेरोजगार तरुणांसाठी जालना येथील जे.ई.एस. कॉलेज येथे “पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे” आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.

पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यात 120 उमेदवारांची प्राथमिक निवड
पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यात 120 उमेदवारांची प्राथमिक निवड

प्रास्ताविकात जिल्हा कौशल्य विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त गणेश चिमणकर यांनी कार्यालयामार्फत तरुणांना विविध रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येत असतात. आज रोजगार मेळाव्यामध्ये 241 जागा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत आणि उद्योजकांना कुशल मनुष्यबळाची आवश्यकता भासत असते त्यासाठी बेरोजगार तरुणांसाठी शासनामार्फत हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्यात आला आहे. या प्लॅटफॉर्म अंतर्गत जिल्ह्यातील अनेक युवक-युवतींना रोजगार प्राप्त होतो आहे. असेही सांगितले.

रोजगार मेळाव्यात 10 नामांकित कंपनीचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. त्यांनी मुलाखतीतून 120 उमेदवारांची विविध पदाकरिता प्राथमिक निवड केली. यात एस आर जे स्ट्रिप्स अँड पाईप्स 7, कृषिधन सीड्स 28, मातोश्री स्किल डेव्हलपमेंट सेंटर जालना 7, आई इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट जालना 17, मोदी पाईप्स प्रा. लि. जालना 10, प्राईम सोल्युशन लिमिटेड (सलाम किसान) जालना 25, विक्रम टी प्रोसेसर प्रा. लि. जालना 14, देवअश्व होंडा शोरूम जालना 6, स्पंदना स्फूर्ति फायनान्शियल जालना 4, भुवन हुंदाई जालना 2 अशी उमेदवारांची निवड केली गेली.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अमोल परिहार यांनी केले आणि आभार सुरेश बहुरे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाचे कौशल्य विकास अधिकारी भुजंग रिठे तसेच अमोल बोरकर, कैलास काळे, रविंद्र पाडमुख, विशाल जगरवाल, दिनेश उढाण, सोमेश शिंदे, अमर तुपे, शालिकराम वाघ आणि जे.ई.एस.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश अग्निहोत्री, डॉ. सुनिल इंदुरकर, डॉ. सुशांत देशमुख व कर्मचाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. असे कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यात 120 उमेदवारांची प्राथमिक निवड

पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यात 120 उमेदवारांची प्राथमिक निवड

पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यात 120 उमेदवारांची प्राथमिक निवड

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत आरोग्य क्षेत्रात इस्राईल येथे रोजगाराच्या संधी शिबीराचे आयोजन

नर्सिंग GNM, ANM पात्रता धारकांना इस्राईलमध्ये रोजगाराची सुवर्णसंधी; उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन

विज्ञान प्रदर्शनीतील बक्षिसाची रक्कम वाढविणार - राज्यमंत्री पंकज भोयर

विज्ञान प्रदर्शनीतील बक्षिसाची रक्कम वाढविणार – राज्यमंत्री पंकज भोयर

विज्ञान प्रदर्शनीतील बक्षिसाची रक्कम वाढविणार - राज्यमंत्री पंकज भोयर

दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या ताण- तणाव निवारणासाठी ऑनलाईन समुपदेशक उपलब्ध ; विभागाने त्यांचे संपर्क क्रमांक केले जारी

गडचिरोलीत विभागस्तरीय ‘सरस’ प्रदर्शनीचे आयोजन

गडचिरोलीत विभागस्तरीय ‘सरस’ प्रदर्शनीचे आयोजन आजचा साक्षीदार दि.२९ : जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा गडचिरोली अंतर्गत नागपूर विभागातील ग्रामीण महिला स्वयंसहायता गटांनी तयार केलेल्या विविध ...

गडचिरोलीत लोह आधारित पूरक उद्योगांना मोठा वाव – जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा

गडचिरोलीत लोह आधारित पूरक उद्योगांना मोठा वाव – जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा आजचा साक्षीदार : जिल्ह्यातील लोह उद्योगात वाढ होत असल्याने येत्या काळात लोह उत्पादनावर ...

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत आरोग्य क्षेत्रात इस्राईल येथे रोजगाराच्या संधी शिबीराचे आयोजन

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत आरोग्य क्षेत्रात इस्राईल येथे रोजगाराच्या संधी शिबीराचे आयोजन

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत आरोग्य क्षेत्रात इस्राईल येथे रोजगाराच्या संधी शिबीराचे आयोजन

इयत्ता 12 वी व इयत्ता 10 वी परीक्षा कॉपीमुक्त अभियानाच्या कार्यवाहीत अंशत: बदल

तरुणाने ५० हजारांत सुरू केले मिलेट इडली, आता महिन्याची कमाई ७.५ लाख!

भारतीय डाक विभागात विमा प्रतिनिधी पदाची भरती; 05 फेब्रुवारी रोजी होणार मुलाखत

12323 Next