वाशिम, दि. 20 ऑगस्ट 2022 : १२ ऑगष्ट रोजी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि जिल्हा विधीज्ञ संघ वाशिम यांच्या संयुक्त विद्यमाने व आर. ए. कॉलेज व विधी महाविद्यालय, वाशिम यांच्या सहकार्याने आर.ए. महाविद्यालय येथे आंतरराष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून कायदेविषयक जनजागृती शिबीराचे आयोजन करण्यात आले.

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव व्ही. ए. टेकवाणी, आर.ए. कॉलेजचे प्राचार्य डॉ. आर. एफ. पगारीया, विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्री. एस. डी. चिमणे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमात अॅड. एस. व्ही. सावळे यांनी “ऍसिड अटॅक ” या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. ॲड. एस. व्ही. दिघोळे यांनी अंमली पदार्थामुळे पिडीत व्यक्तींना विधी सेवा आणि अंमली पदार्थाचे निर्मुलन (नालसा योजना २०१५) या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. प्रा.भाग्यश्री धुमाळे यांनी ” रॅगींग विरोधी कायदे ” या विषयावर मार्गदर्शन केले. विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.डी. चिमणे यांनी आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्य ” आंतरपिडी एकता सर्व वयोगटासाठी जग तयार करणे ” या विषयावर मार्गदर्शन केले. उपस्थित विद्यार्थी व विद्यार्थीनींना जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव व्ही. ए. टेकवाणी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये कायदेविषयक माहीतीबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.सुत्रसंचालन व आभार प्रा. विजय जाधव यांनी मानले.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अधिक्षक एस. एन. भुरे, कॉलेजचे सर्व प्राध्यापक, सर्व कर्मचारी आणि विद्यार्थी व विद्यार्थीनी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.