ताज्या बातम्या

संभाजीनगर, दिनांक 27 : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय)च्या मार्गदर्शक नियमांनुसार बँकांनी कामकाज करणे अपेक्षित आहे. त्यानुसार त्यांनी कामकाज करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी बँकांना दिल्या. यासह जिल्ह्यातील बँकांमध्ये असलेले विविध योजनांमधील प्रलंबित प्रस्ताव तत्काळ निकाली काढावेत, असे आदेशही बँक अधिकाऱ्यांना त्यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हास्तरीय सल्लागार समितीची बैठक श्री. चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीस बँक ऑफ महाराष्ट्रचे क्षेत्रीय व्यवस्थापक महेश डांगे, आरबीआयचे विश्वजीत करजंकर, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक मंगेश केदार, नाबार्डचे सुरेश पटवेकर, प्र. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख, जिल्हा उपनिबंधक अनिलकुमार दाबशेडे आदीसंह जिल्ह्यातील बँकांचे व्यवस्थापक, समन्वयक अधिकारी उपस्थित होते.

आरबीआयच्या मार्गदर्शक नियमांनुसार कामकाज करा
–जिल्हाधिकारी सुनील चव्हाण
…बँकांच्या कामांचा, योजनांचा जिल्हाधिकारी यांनी घेतला आढावा

प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागासविकास महामंडळांतर्गत वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना, गट कर्ज परतावा योजना, गट प्रकल्प योजना, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, राज्य इतर मागासवर्गीय वित्त् आणि विकास महामंडळ, संत रोहिदास चर्मोद्योग आणि चर्मकार विकास महामंडळ, वसंतराव नाईक विमुक्त आणि भटक्या जमाती विकास महामंडळ, राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान, पीएमस्वनिधी आदींचा सविस्तर आढावा श्री. चव्हाण घेतला. आढावाप्रसंगी आवश्यक त्या सूचना करतानाच बँकांमधील प्रस्तावांवर तत्काळ कार्यवाही करावी, असे श्री.चव्हाण म्हणाले. श्री.केदार यांनी सादरीकरणाद्वारे माहिती दिली. बैठकीत श्री.डांगे व श्री करंजकर यांनीही बँक अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना केल्या.

आरबीआयच्या मार्गदर्शक नियमांनुसार कामकाज करा जिल्हाधिकारी …बँकांच्या कामांचा, योजनांचा जिल्हाधिकारी यांनी घेतला आढावा

आरबीआयच्या मार्गदर्शक नियमांनुसार कामकाज करा –जिल्हाधिकारी सुनील चव्हाण...बँकांच्या कामांचा, योजनांचा जिल्हाधिकारी यांनी घेतला आढावा

महिला लोकशाही दिनी तक्रार दाखल करण्याचे आवाहन

महिला लोकशाही दिनी तक्रार दाखल करण्याचे आवाहन

कोविडमुळे पालक गमावलेल्या 180 बालकांच्या शैक्षणिक साहित्यासाठी बँक खात्यावर 12 लाख 73 हजार रुपये होणार जमा – जिल्हाधिकारी

कोविडमुळे पालक गमावलेल्या 180 बालकांच्या शैक्षणिक साहित्यासाठी बँक खात्यावर 12 लाख 73 हजार रुपये होणार जमा - जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांचा निर्णय

जिल्ह्यात 31 ऑगस्ट रोजी दारु दुकाने बंद . …

जिल्ह्यात 31 ऑगस्ट रोजी दारु दुकाने बंद . ...

शहीद जवान गजानन मोरे यांना पुष्पचक्र अर्पण करुन शंभूराज देसाई यांनी केले अभिवादन

शहीद जवान गजानन मोरे यांना पुष्पचक्र अर्पण करुन शंभूराज देसाई  यांनी केले अभिवादन

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत आयोजित बैठकीत मराठा आरक्षणासह विविध मागण्यांवर चर्चा

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत आयोजित बैठकीत मराठा आरक्षणासह विविध मागण्यांवर चर्चा

प्रसाद योजनेंतर्गत जिल्ह्यातील तीर्थस्थळांचा होणार विकास – खासदार प्रताप चिखलीकर

जिल्हाधिकारी कार्यालयात तीर्थक्षेत्राच्या विकासाबाबत आढावा बैठक

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना जनजागृती पंधरवाडा….

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना जनजागृती पंधरवाडा....

प्रशासन आणि सार्वजनिक मंडळांची बैठक गणेशोत्सवःसद्भाव, सुरक्षा आणि सामंजस्याचा …

प्रशासन आणि सार्वजनिक मंडळांची बैठक गणेशोत्सवःसद्भाव, सुरक्षा आणि सामंजस्याचा ...

बाल न्याय मंडळात परिसंवाद कार्यक्रम संपन्न…

बाल न्याय मंडळात परिसंवाद कार्यक्रम संपन्न...