ताज्या बातम्या

तालुका व जिल्हास्तरावर महिला लोकशाही दिनाचे आयोजन

जालना दि. 24 (आजचा साक्षीदार) :- महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल कल्याण विभागाने, समस्याग्रस्त व पिडित महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे, तसेच त्यांच्या हक्कांचे संरक्षण होऊन न्याय मिळावा या हेतूने शासन निर्णयान्वये जिल्हा तसेच तालुकास्तरावरर महिलांसाठी विशेष लोकशाही दिन पाळण्याचे ठरवले आहे. त्यानुसार तालुकास्तरावर प्रत्येक तहसिल कार्यालयात महिन्याचे चौथ्या सोमवारी आणि जिल्हाधिकारी कार्यालयात दर महिन्याचे तिसऱ्या सोमवारी महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात यावे असे नमुद करण्यात आले आहे.
राज्य शासनाने लोकशाही दिनाची अंमलबजावणी तालुकास्तर, जिल्हास्तर, विभागीय आयुक्तस्तरापासुन ते मंत्रालयीनस्तरापर्यंत होण्यासाठी वेळोवेळी शासन निर्णय, परिपत्रकानुसार विविध सुचना दिलेल्या आहेत.

महिलांच्या समस्यांचे निराकरण स्थानिक पातळीवरच झाल्यास त्यांना आपल्या न्याय हक्कांसाठी इतरत्र कोठेही जाण्याची आवश्यकता भासणार नाही. सबब जालना जिल्ह्यात तालुकास्तरावर व जिल्हास्तरावर घेण्यात येणाऱ्या लोकशाही दिनाची प्रचार प्रसिध्दी झाल्यास सर्वच स्तरातील महिलांचे प्रश्न लवकरात लवकर निकाली निघण्यास मदत होईल असे जिल्हाधिकारी यांनी असे आवाहन केले आहे.

अर्ज स्वीकृतीचे निकष पुढीलप्रमाणे तक्रार, निवेदन वैयक्तिक स्वरुपाचे असावेत, तक्रार, निवेदन दोन प्रतित सादर करावेत, सदरील प्रकरण न्याय प्रविष्ठ नसावे, अर्ज विहित नमुन्यात व आवश्यक त्या कागदपत्रासह सादर करावा, सेवा व आस्थापना विषयक बाबी विचारात घेतल्या जाणार नाहीत, निवडणुक आचार संहिता काळात त्या त्या स्तरावर, विधीमंडळ अधिवेशन काळात राज्यस्तरावर महिला लोकशाही दिन पाळण्यात येत नाही.

शासन निर्णयाप्रमाणे महिलांनी प्रथम संबंधीत तहसिलदार यांचेकडे महिला लोकशाही दिनाच्या पंधरा दिवस आधी दोन प्रतीत तक्रार दाखल करावी, तालुका महिला लोकशाही दिनात एक महिन्यांचे आत कार्यवाही न झाल्यास संबंधीत महिला जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनांत तक्रार दाखल करु शकतील. तालुकास्तरावरील लोकशाही दिनांत अर्जदार महिलेस अंतिम उत्तर शक्य तितक्या लवकर जास्तीत जास्त एक महिन्याच्या आत देण्याचे बंधन संबंधित अध्यक्ष तथा तहसिलदार व सदस्य सचिव तथा बाल विकास प्रकल्प अधिकारी यांची राहील.

तरी महिलांनी तक्रार अर्ज दाखल करण्यासाठी तालुकास्तरावर तहसिल कार्यालय व जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्याशी संपक्र करुन या उपक्रमाचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे अशी माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.

तालुका व जिल्हास्तरावर महिला लोकशाही दिनाचे आयोजन

तालुका व जिल्हास्तरावर महिला लोकशाही दिनाचे आयोजन

सर्वांच्या सहकार्यामुळेच चांगले काम करता आले – प्रेरणा देशभ्रतार

सर्वांच्या सहकार्यामुळेच चांगले काम करता आले - प्रेरणा देशभ्रतार

कॅच द रेन – जलशक्ती अभियान अंतर्गत अमृत सरोवरांचे शतक पूर्ण करा – जयप्रकाश पांडे

कॅच द रेन - जलशक्ती अभियान अंतर्गत अमृत सरोवरांचे शतक पूर्ण करा – जयप्रकाश पांडे

श्री गणेश उत्सव कालावधीत डॉल्बी सिस्टीम वापरास प्रतिबंध

श्री गणेश उत्सव कालावधीत डॉल्बी सिस्टीम वापरास प्रतिबंध

राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्याचे आवाहन…

राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्याचे आवाहन...

’महारेन’ प्रणालीवर दैनंदिन व प्रागतिक पावसाचा अहवाल उपलब्ध…

’महारेन’ प्रणालीवर दैनंदिन व प्रागतिक पावसाचा अहवाल उपलब्ध...

विधानसभेत नियम २९३ अन्वये झालेल्या चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेती क्षेत्रासाठी जाहीर केलेले महत्वाचे निर्णय

विधानसभेत नियम २९३ अन्वये झालेल्या चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेती क्षेत्रासाठी जाहीर केलेले महत्वाचे निर्णय

आणीबाणीच्या काळात लढा देणाऱ्यांसाठी सन्मान योजना…

आणीबाणीच्या काळात लढा देणाऱ्यांसाठी सन्मान योजना...

महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न मुळा एज्युकेशन सोसायटीचे कृषी महाविद्यालय सोनई आयोजित आंतर महाविद्यालयीन बास्केटबॉल स्पर्धा पारितोषिक वितरण समारंभ …

महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न मुळा एज्युकेशन सोसायटीचे कृषी महाविद्यालय सोनई आयोजित आंतर महाविद्यालयीन बास्केटबॉल स्पर्धा पारितोषिक वितरण समारंभ ...

शीघ्र ओळख व शीघ्र हस्तक्षेप विषयावर कार्यशाळेचे आयोजन….

शीघ्र ओळख व शीघ्र हस्तक्षेप विषयावर कार्यशाळेचे आयोजन