कोल्हापूर, दि. 2 : दानोळी, ता. शिरोळ येथील 14 वर्षीय अल्पवयीन मुलीचा बाल विवाह दरीबडची, ता. जत, जि. सांगली येथील 22 वर्षीय सचिन माने यांच्या सोबत दिनांक 25 ऑगस्ट 2022 रोजी होणार असल्याची माहिती जिल्हा महिला व बाल विकास कार्यालयास मिळाली होती. जिल्हा बाल संरक्षण कक्षातील महेंद्र कांबळे व चाईल्ड लाईनचे प्रतिनिधी यांच्यासोबत घटनास्थळी भेट देण्यात आली व बाल विवाह रोखण्यात आला असल्याचे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी शिल्पा पाटील, यांनी कळविले आहे.

अल्पवयीन मुलीला बाल कल्याण समिती समोर सादर करुन मुलीस बालगृहात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी जिल्हा बाल संरक्षण अधिकारी एस. एन. दाते, जयसिंगपूर पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस कर्मचारी प्रभावती सावंत, के. आर. बागूल, ग्रामसेवक व सरपंच सुनिता बाळ यांनी सहकार्य केले.















