ताज्या बातम्या

पुणे दि.३०– महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या पुणे जिल्हा समन्वय समितीतर्फे राज्य कार्यकारिणी आणि जिल्हा समन्वय समितीवर नव्याने नियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे यांची जिल्हा समन्वय समितीच्या कार्याध्यक्ष पदी निवड करण्यात आली.

महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार

मध्यवर्ती इमारत परिसरातील जिल्हा समन्वय समितीच्या कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला राज्य संघटक विनायक लहाडे, नृसिंह मित्रगोत्री, इंजि. विठ्ठल वाघमारे, पशुधन विकास अधिकारी दिपक अवताडे, योगेश शेळके, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या प्रिया शिंदे, प्रादेशिक न्यायवैद्यक कार्यशाळेच्या कोमल काळे आदी उपस्थित होते.

यावेळी राज्य कार्यकरिणीवर निवड झालेल्या उपाध्यक्ष आनंद कटके, राज्य संघटक विनायक लहाडे,मोहन साळवी, विलास हांडे, अशोक मोहिते, विठ्ठल वाघमारे, शिवाजी ठोंम्बरे यांचा सत्कार करण्यात आला. पुणे जिल्हा समन्वय समितीची पुनर्रचना करून नव्याने नियुक्त सदस्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.

यावेळी बोलताना चंद्रकांत वाघमारे म्हणाले, पुणे जिल्हा समन्वय समितीच्या माध्यमातून अधिकाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. सर्वांना सोबत घेवून संघटनेत काम करुन समान न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात येईल असेही ते म्हणाले.

श्री. लहाडे यांनी मुंबई येथे झालेल्या त्रैवार्षिक अधिवेशनबाबत माहिती दिली. नवीन सहकाऱ्यांच्या समावेशाने अधिकारी महासंघाचे काम अधिक प्रभावी होईल. महासंघाच्या वतीने विधायक मार्गाने अधिकाऱ्यांच्या समस्या शासनापर्यंत पोहोचवून त्याचा सातत्याने पाठपुरावा करण्यात येतो. महासंघाच्या पुणे शाखेने आतापर्यंत राज्यस्तरावर चांगले योगदान दिले आहे, असे त्यांनी सांगितले.

प्रास्ताविकात विठ्ठल वाघमारे यांनी मुंबई येथे झालेल्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीची माहिती दिली. जिल्हा समन्वय समितीच्या नवनियुक्त सदस्यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. यावेळी महासंघाचे पदाधिकारी उपस्थितीत होते.

महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार

महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार

जिल्हाधिकाऱ्यांची काटा येथील मतदान बुथ व सीएससी केंद्राला भेट

जिल्हाधिकाऱ्यांची काटा येथील मतदान बुथ व सीएससी केंद्राला भेट

जिल्हयात व्यापक मोहिम राबवून कुष्ठरुग्ण व सक्रीय क्षयरुग्णांचा शोध घ्यावा – षण्मुगराजन एस.

जिल्हयात व्यापक मोहिम राबवून कुष्ठरुग्ण व सक्रीय क्षयरुग्णांचा शोध घ्यावा - षण्मुगराजन एस.

राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला जिल्हा वार्षिक योजनेचा आढावा

राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला जिल्हा वार्षिक योजनेचा आढावा

अभ्यासातील सातत्य व नियोजनाने भारतीय प्रशासकीय सेवेतील प्रवेशाचा मार्ग सुकर होतो – जिल्हाधिकारी संदीप कदम

अभ्यासातील सातत्य व नियोजनाने भारतीय प्रशासकीय सेवेतील प्रवेशाचा मार्ग सुकर होतो - जिल्हाधिकारी संदीप कदम

मेट्रोसह इतर पायाभूत सुविधांची कामे कालबद्धरितीने युद्ध पातळीवर करा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वॉर रुम बैठकीत निर्देश

मेट्रोसह इतर पायाभूत सुविधांची कामे कालबद्धरितीने युद्ध पातळीवर करा - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वॉर रुम बैठकीत निर्देश

केंद्राच्या योजनांची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करा – केंद्रीय वाणिज्य व उद्योग राज्यमंत्री सोम प्रकाश

केंद्राच्या योजनांची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करा - केंद्रीय वाणिज्य व उद्योग राज्यमंत्री सोम प्रकाश

गणेश मंडळाना प्रसादाबाबत नियमांचे पालन करण्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाचे निर्देश

गणेश मंडळाना प्रसादाबाबत नियमांचे पालन करण्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाचे निर्देश

तालुकास्तरावर दक्षता व नियंत्रणकेल्या समित्यांची दरमहा बैठक घ्या – डॉ. अनंत गव्हाणे

तालुकास्तरावर दक्षता व नियंत्रणकेल्या समित्यांची दरमहा बैठक घ्या - डॉ. अनंत गव्हाणे

स्वयंसहायता समूहाने उत्पादित केलेल्या विविध वस्तूंसह गणपती सजावट व गौरी फराळ विक्री व प्रदर्शन |सातारकरांनी लाभ घेण्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांचे आवाहन

स्वयंसहायता समूहाने उत्पादित केलेल्या विविध वस्तूंसह गणपती सजावट व गौरी फराळ विक्री व प्रदर्शन |सातारकरांनी लाभ घेण्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांचे आवाहन