मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून तीर्थक्षेत्र विकासाचा आढावा
परळी वैजनाथ, घृष्णेश्वर आणि सप्तशृंगी देवी तीर्थक्षेत्रांच्या ५३१ कोटींच्या सुधारित आराखड्यास मान्यता
भाविकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने दक्षता घ्यावी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई, दि. ९ : राज्यातील तीर्थक्षेत्रांच्या विकास आराखड्यास मान्यता देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीची आज बैठक झाली. या बैठकीत श्री क्षेत्र परळी वैजनाथ ज्योर्तिलिंग विकासाच्या २८६.६८ कोटी रुपयांच्या सुधारित विकास आराखड्यास तसेच श्री क्षेत्र घृष्णेश्वर तीर्थक्षेत्राच्या सुधारित १६३ कोटी आणि श्री क्षेत्र सप्तशृंगी देवी या तीर्थक्षेत्राच्या ८१.८६ कोटीच्या सुधारित आराखड्यास मान्यता देण्यात आली. तीर्थक्षेत्री येणाऱ्या भाविकांना चांगल्या सोयी- सुविधा देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने दक्षता घ्यावी आणि परिसरात पर्यटनवाढीसाठी देखील प्रयत्न करावेत, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
मंत्रालयात झालेल्या शिखर समितीच्या या बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषीमंत्री धनंजय मुंडे, आमदार प्रशांत बंब, मुख्य सचिव मनोज सौनिक, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव डॉ. गोविंदराज, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ आदी उपस्थित होते. छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संदिपान भुमरे, जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते.
श्री क्षेत्र परळी तीर्थक्षेत्र विकास आराखडा
श्री क्षेत्र परळी येथील तीर्थक्षेत्र विकास आराखड्यामध्ये ९२ कामांना नव्याने प्रशासकीय मान्यता देण्यात आली. यावेळी आराखड्यानुसार करण्यात येणाऱ्या कामांचे सादरीकरण करण्यात आले. मंदिराच्या मागील बाजूच्या जागेवर लाईट आणि साऊंड शो करण्यात येणार आहे. लेझर शो करताना नागरिकांच्या डोळ्यांना इजा होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी आवर्जून सांगितले.
श्री क्षेत्र घृष्णेश्वर विकास आराखडा
श्री क्षेत्र घृष्णेश्वर विकास आराखड्यामध्ये वळण रस्ता प्रस्तावित करण्यात आले आहे. लेणी क्रमांक एक ते महादेव मंदिर हा नविन रस्ता १.६५० कि.मी. लांबीचा असून त्यासाठी २७.५८ कोटी खर्च अपेक्षित असल्याचे यावेळी सांगितले. त्याचबरोबर बांधकामासाठी १६ कोटींची वाढीव निधी यानुसार १६३ कोटी रुपयांच्या सुधारित आराखड्यास मान्यता देण्यात आली.
याबैठकीत श्री सप्तशृंगी देवी विकास आराखड्याबाबत चर्चा झाली. नाशिक जिल्हाधिकाऱ्यांनी या तीर्थक्षेत्र विकासासाठी ८१.८६ कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर केला आहे. हा सुधारित आराखडा २५ कोटींपेक्षा अधिक असल्याने तो ग्रामविकास विभागाकडून नियोजन विभागाकडे हस्तांतरीत करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. सुधारित आराखड्यात स्वच्छतागृह बांधणे, डोम बसविणे, दरड कोसळण्यापासून संरक्षणात्मक जाळी बसविणे आदी विविध कामांचा समावेश आहे. याठिकाणी दोन दिवसांपूर्वीच भेट दिल्याचे उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी यावेळी सांगितले.
महाराष्ट्र पर्यटन
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून तीर्थक्षेत्र विकासाचा आढावा – परळी वैजनाथ, घृष्णेश्वर आणि सप्तशृंगी देवी तीर्थक्षेत्रांच्या ५३१ कोटींच्या सुधारित आराखड्यास मान्यता
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून तीर्थक्षेत्र विकासाचा आढावा - परळी वैजनाथ, घृष्णेश्वर आणि सप्तशृंगी देवी तीर्थक्षेत्रांच्या ५३१ कोटींच्या सुधारित आराखड्यास मान्यता
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मार्ग काढण्यासाठी राज्यस्तरीय समिती – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
शेतकऱ्यांचा उत्पादनखर्च कमी करण्यासाठी करावयाच्या उपाययोजना तसेच शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांवर मार्ग काढण्यासाठी राज्यस्तरीय समिती स्थापन करण्यात यावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांवर आयोजित बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते.
जिल्ह्याच्या औद्योगिक, पर्यटन विकासाची ‘ब्लू प्रिंट’ तयार करावी – पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील | आपत्ती व्यवस्थापन, शासन आपल्या दारी उपक्रम तसेच जिल्हा विकास, पर्यटन व औद्योगिक विकास आराखड्याचा घेतला आढावा
जिल्ह्याच्या औद्योगिक, पर्यटन विकासाची 'ब्लू प्रिंट' तयार करावी - पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील | आपत्ती व्यवस्थापन, शासन आपल्या दारी उपक्रम तसेच जिल्हा विकास, पर्यटन व औद्योगिक विकास आराखड्याचा घेतला आढावा
शिर्डी शहराचं रूप पालटणार ! | शिर्डी सौंदर्यकरणांचा ५२ कोटींचा आराखडा साईचरणी अर्पण ! महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची संकल्पना !
शिर्डी शहराचा कायापालट करणारा सौंदर्यकरणाचा पहिल्या टप्प्यातील ५२ कोटींच्या कामांचा प्रस्तावित विकास आराखडा राज्याचे महसूल तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज श्री.साईबाबा चरणी अर्पण केला. शिर्डी शहर व परिसराबद्दल देशभरातील भाविकांमध्ये आत्मीयता वृध्दींगत व्हावी, यासाठी शिर्डीचा येत्या काळात अंर्तबाह्य कायापालट करण्यात येणार आहे. ‘विकासशील शिर्डी, सुंदर शिर्डी, आनंददायी शिर्डी’ अशी प्रतिमा शिर्डीची होईल, यावर भर राहणार असल्याचा विश्वास पालकमंत्री श्री.विखे-पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.
नगर जिल्ह्याचा समृध्द वारसा | श्रध्दा आणि सबुरी | शिर्डीचे साईबाबा समाधी मंदिर
शिर्डीचे साईबाबा समाधी मंदिर हे आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र बनले आहे. श्रद्धा आणि सबुरीचा संदेश देणाऱ्या साईबाबांच्या वास्तव्याच्या अनेक खुणा शिर्डीत आहेत. गुरुस्थान द्वारकामाई, लेंडीबाग, चावडी, साईबाबांनी पेटवलेली धुनी ते बसत असलेला दगड, खंडोबा मंदिर तसेच त्यांनी वापरलेल्या अनेक वस्तू शिर्डीत पहावयास मिळतात.
नगर जिल्ह्यातील समृध्द वारसा | अमृतातेही पैजा जिंके | श्री ज्ञानेश्वर मंदिर – पैस खांब, नेवासे
अमृतवाहिनी प्रवरेकाठी वसलेल्या नेवासे (पूर्वीचे निधीनिवास) गावात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांनी शके १२१२ मध्ये ज्ञानेश्वरी कथन केली. ज्ञानेश्वरी लिहून घेणारे सच्चिदानंद बाबा नेवासे परिसरातलेच. करविरेश्वराच्या मंदिरात ज्या खांबाला टेकून ज्ञानेश्वर बसत असत, तो १.५ मीटर उंचीचा दगडी पैस खांबावर आज भाविकांचे श्रद्धास्थान बनला आहे.
नगर जिल्ह्याचा समृध्द वारसा | कृषी शिक्षणाची पंढरी – महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी
कृषी शिक्षण, संशोधन आणि विस्तार ही तीन प्रमुख उद्दिष्टे समोर ठेवून आज राहुरी कृषी विद्यापीठाचे कामकाज सुरू आहे. नगर, मनमाड या महामार्गावर अहमदनगरपासून ३५ कि.मी. अंतरावर असलेले हे विद्यापीठ आज महाराष्ट्रातीलच नव्हे, तर देशभरातील अनेक शेतकऱ्यांसाठी तीर्थक्षेत्र बनले आहे.
नगर जिल्ह्याचा समृध्द वारसा | महाराष्ट्राचे वैभव-कळसुबाई (KALSUBAI)
महाराष्ट्राचे एव्हरेस्ट समजले जाणारे सह्याद्रीच्या रांगेतील राज्यातील सर्वांत उंच असलेले कळसुबाईचे शिखर (उंची १६४६ मीटर) नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात आहे. या शिखरावर महाराष्ट्राची कुलस्वामिनी कळसुबाईंचे छोटे मंदिर आहे. मंदिराकडे जाण्यासाठी बारी गावाकडून पायवाट आहे. मंदिरातील मूर्ती गोलाकार, गंडकी शिळेची आहे. घटस्थापनेच्या वेळी नवरात्रामध्ये पाचव्या आणि सातव्या माळेला कळसुबाई शिखरावर ती खूप गर्दी असते म्हणून या माळेला ‘पाहुण्यांची माळ’ म्हणून ओळखले जाते.
नगर जिल्ह्याचा समृध्द वारसा | हरिश्चंद्रगडाचा कोकणकडा
हरिश्चंद्र गडाचा कोकणकडा हे निसर्गाचे अप्रतिम शिल्प आहे. तेथून माळशेज घाटाचे विहंगमदृश्य दिसते. अनेकदा वरून टाकलेली वस्तूही हवेच्या दाबाने परत वर येते. गडावरील मंदीरापासून सुमारे तीन किलोमीटरवर हा कडा आहे. पावसाळ्यात याठिकाणी सुंदर पुष्पोत्सव बहरतो. तो पाहण्यासाठी पुणे-मुंबईतून मोठ्या प्रमाणावर पर्यटक येथे येतात.
महाशिवरात्रिसाठी बाजारात आता सर्टिफाईड रुद्राक्ष व रत्ने ! आधुनिक पूजा सामुग्री
महाशिवरात्रिसाठी बाजारात आता सर्टिफाईड रुद्राक्ष व रत्ने ! आधुनिक पूजा सामुग्री