महाराष्ट्र बातम्या

नांदेड (आजचा साक्षीदार) दि. 30 :- भारतीय स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही निजामशाहीमुळे पारतंत्र्यात असलेल्या मराठवाड्याला मुक्तीसाठी जे आंदोलन करावे लागले त्यात उमरी येथील ऐतिहासिक संदर्भही अधिक महत्त्वाचे आहेत. येथील हैद्राबाद स्टेट बँक,पोलीस स्टेशनवरील हल्ला, रेल्वे रूळ उखडून टाकणे याला आज 30 जानेवारी रोजी बरोबर 75 वर्षे पूर्ण होत आहेत. ज्या बँकेवर हल्ला झाला ती बँक खाजगी जागेत असल्याने आज त्या जागेचे स्वरूप बदलले आहे. मात्र निजामाच्या पोलीसाची ज्या पोलीस चौकीवर हल्ला झाला ती इमारत आज त्या काळातील हैद्राबाद मुक्तीच्या आठवणी आपल्या प्रत्येक शिळेवर घेऊन उभी आहे. या उमरी पोलीस स्टेशनच्या भिंती त्या काळातील तिजोरीसह मुक्तीच्या या लढ्याला पुढच्या पिढीसाठी वाहते करण्यास सज्ज आहेत.

पोलीस विभागाने हे पोलीस स्टेशन आहे त्या स्थितीत आजवर व्यवस्थीत जपले असून ऐतिहासिक साक्षीसह उमरीतील शांतता व सुव्यवस्थेसाठी येथून कामकाज पाहिले जाते. दि. 30 जानेवारी 1948 ला निजामाच्या जोखडातून मुक्तीसाठी हा हल्ला व बँकेची लूट करण्यात आली. हल्ल्यापूर्वी एक दिवस अगोदार म्हणजेच 29 जानेवारी रोजी उमरखेडचे स्वातंत्र्य सैनिक देवसरी या गावी जमले. चार गटात विभागालेल्या या स्वातंत्र्य सैनिकांनी 30 जानेवारी रोजी हल्ला करून निजामाला धास्तावून सोडले. रेल्वेचे रूळ व तारा तोडण्यासाठी बारडचे राजाराम देशमुख, थेरबनचे अमृतराव व 35 सैनिक रवाना झाले. नागनाथ परांजपे यांच्या नेतृत्वाखाली 15 जणांच्या तुकडीने पोलीस स्टेशनवर हल्ल्यासाठी धाव घेतली. यात लहानचे भिमराव देशमुख व इतर मंडळी होती. रेल्वे स्टेशनवर हल्ल्यासाठी उमरीचे मोहन शर्मा, जगदीश, बाबुराव कुटूंरकर व इतर मंडळी होती.

▪️“मराठवाडा मुक्तीची ही गाथा नव्या पिढीपर्यंत पोहचावी यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे आम्ही विविध उपक्रम हाती घेतले आहेत. त्यादृष्टिने लवकरच उमरी आणि बारड येथे ज्येष्ठ इतिहास तज्ज्ञांना नव्या पिढीसमवेत आम्ही संवाद घडवून आणत आहोत.” – जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

उमरीच्या मोंढ्यातील हैद्राबाद स्टेट बँकेच्या शाखेवर 21 जणांच्या तुकडीने हल्ला केला. यात अनंत भालेराव, आबासाहेब लहानकर, साहेबराव देशमुख-बारडकर, बन्सीलाल तोष्णीवाल, किशोर शहाणे, दिंगबरराव उत्तरवार, शंकरलाल शर्मा, बन्सीलाल मालाणी, धनराज पुरोहित, रघुनाथ पंडीत, काशिनाथ शेट्टी हे स्थानिक उमरीचे कार्यकर्ते होते. सायंकाळी 4.30 वा. तीनही ठिकाणी हे मुक्तीसाठी हल्ले करण्यात आले.

काळ झपाट्याने पुढे जरी गेला असला तरी इतिहासातील अखंड भारताच्या व स्वातंत्र्याच्या लढ्यातील हे ऐतिहासिक संदर्भ नव्या पिढीपर्यंत पोहचणे तेवढेच महत्वाचे आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवासमवेत मराठवाडा मुक्तीचा हा अमृत महोत्सव आता सुरू असून शासनाने यासाठी विविध उपक्रम हाती घेतले आहेत.

▪️“उमरी पोलीस स्टेशन आज ज्या वास्तुत आहे त्या वास्तुचा ऐतिहासिक संदर्भ लाखमोलाचा आहे. पोलीस प्रशासनाच्यावतीने आम्ही ही जागा आहे त्या स्थितीत आजवर त्याच इमारतीतून शांतता व सुव्यवस्थेसाठी सांभाळून ठेवली आहे. या इतिहासाला प्रवाहित करण्यासाठी प्रयत्नरत राहू” – जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे

अमृतवाहिनी प्रवरेकाठी वसलेल्या नेवासे (पूर्वीचे निधीनिवास) गावात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांनी शके १२१२ मध्ये ज्ञानेश्वरी कथन केली. ज्ञानेश्वरी लिहून घेणारे सच्चिदानंद बाबा नेवासे परिसरातलेच. करविरेश्वराच्या मंदिरात ज्या खांबाला टेकून ज्ञानेश्वर बसत असत, तो १.५ मीटर उंचीचा दगडी पैस खांबावर आज भाविकांचे श्रद्धास्थान बनला आहे.

उमरी पोलीस स्टेशनच्या भिंतीही देतात स्वातंत्र्यासाठी केलेल्या हल्ल्याची साक्ष • निजामाच्या जोखडातून मुक्तीसाठी उमरी बँक, पोलीस स्टेशन हल्ल्याच्या घटनेला आज 75 वर्षे पूर्ण

उमरी पोलीस स्टेशनच्या भिंतीही देतात स्वातंत्र्यासाठी केलेल्या हल्ल्याची साक्ष • निजामाच्या जोखडातून मुक्तीसाठी उमरी बँक, पोलीस स्टेशन हल्ल्याच्या घटनेला आज 75 वर्षे पूर्ण

इंद्रायणी थडी जत्रेचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन | देशाच्या विकासासाठी महिलांना अर्थव्यवस्थेच्या प्रवाहात सहभागी करावे लागेल - उपमुख्यमंत्री

इंद्रायणी थडी जत्रेचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन | देशाच्या विकासासाठी महिलांना अर्थव्यवस्थेच्या प्रवाहात सहभागी करावे लागेल – उपमुख्यमंत्री

इंद्रायणी थडी जत्रेचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन | देशाच्या विकासासाठी महिलांना अर्थव्यवस्थेच्या प्रवाहात सहभागी करावे लागेल - उपमुख्यमंत्री

देव आहे पण देऊळ नाही, घर आहे पण दारे नाहीत, झाड आहे पण सावली नाही... ही आगळी-वेगळी वैशिष्ट्ये असलेले शनींचे जागृत देवस्थान शनिशिंगणापूर भाविकांचे श्रद्धास्थान बनले आहे. उघड्या चौथऱ्यावर पाच फूट नऊ इंच उंचीची दगडी शिळा असून तेथे अखंड तेलाचा अभिषेक केला जातो.

शेतजमिनीचा वाद मिटविण्यासाठी शेतकऱ्यांच्या फायद्याची ‘सलोखा योजना’

शेतजमिनीचा वाद मिटविण्यासाठी शेतकऱ्यांच्या फायद्याची ‘सलोखा योजना’

अहमदनगर औरंगाबाद रस्त्यावर अहमदनगरपासून सुमारे ६६ कि. मी. वर श्रीक्षेत्र देवगड आहे. हे पवित्र क्षेत्र म्हणजे भूलोकावरील स्वर्गच म्हणता येईल. सदर मंदीर हे अत्यंत सर्वांगसुंदर व पवित्र क्षेत्र नेवासेपासून जवळच आहे. सदर देवस्थान किसनगिरीजी महाराज यांनी स्थापन केलेले आहे. देवगड या क्षेत्राचा विकास भास्करगिरी महाराजांनी केला.

प्रजासत्ताक दिनी २५ वर्ष सुरक्षित सेवा बजावणाऱ्या जिल्ह्यातील ४२ एसटी चालकांचा सत्कार

प्रजासत्ताक दिनी २५ वर्ष सुरक्षित सेवा बजावणाऱ्या जिल्ह्यातील ४२ एसटी चालकांचा सत्कार

जलयुक्त शिवार अभियानासाठी जिल्हास्तरीय समिती स्थापन

जलयुक्त शिवार अभियानासाठी जिल्हास्तरीय समिती स्थापन

जलयुक्त शिवार अभियानासाठी जिल्हास्तरीय समिती स्थापन

महाराष्ट्र-शासन-उपक्रम-महाराष्ट्र-शासन-योजना-सरकारी-योजना (2)

प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हा माहिती कार्यालयात तंबाखू व ई- सिगारेट मुक्तीची शपथ

प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हा माहिती कार्यालयात तंबाखू व ई- सिगारेट मुक्तीची शपथ

जलयुक्त शिवार अभियानासाठी जिल्हास्तरीय समिती स्थापन

साखर कारखानदारांनी इथेनॉल निर्मिती करावी. -केद्रीय मंत्री नितीन गडकरी

साखर कारखानदारांनी इथेनॉल निर्मिती करावी. -केद्रीय मंत्री नितीन गडकरी

सर्व शासकीय यंत्रणांनी पंचमहाभूत महोत्सव यशस्वी करण्यासाठी परस्परांत समन्वय ठेवावा -प्रधान सचिव प्रवीण दराडे

सर्व शासकीय यंत्रणांनी पंचमहाभूत महोत्सव यशस्वी करण्यासाठी परस्परांत समन्वय ठेवावा -प्रधान सचिव प्रवीण दराडे

सर्व शासकीय यंत्रणांनी पंचमहाभूत महोत्सव यशस्वी करण्यासाठी परस्परांत समन्वय ठेवावा -प्रधान सचिव प्रवीण दराडे

अमृतवाहिनी प्रवरेकाठी वसलेल्या नेवासे (पूर्वीचे निधीनिवास) गावात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांनी शके १२१२ मध्ये ज्ञानेश्वरी कथन केली. ज्ञानेश्वरी लिहून घेणारे सच्चिदानंद बाबा नेवासे परिसरातलेच. करविरेश्वराच्या मंदिरात ज्या खांबाला टेकून ज्ञानेश्वर बसत असत, तो १.५ मीटर उंचीचा दगडी पैस खांबावर आज भाविकांचे श्रद्धास्थान बनला आहे.

विद्यार्थ्यांना आवश्यक त्या सर्व सुविधा देणार – पालकमंत्री दीपक केसरकर

विद्यार्थ्यांना आवश्यक त्या सर्व सुविधा देणार - पालकमंत्री दीपक केसरकर

जिल्ह्यातील सर्व शेती खातेदारांना घरपोच सातबारा वितरण मोहिमेअंतर्गत 100 टक्के सातबाराचे वाटप - पालकमंत्री दीपक केसरकर

जिल्ह्यातील सर्व शेती खातेदारांना घरपोच सातबारा वितरण मोहिमेअंतर्गत 100 टक्के सातबाराचे वाटप – पालकमंत्री दीपक केसरकर

जिल्ह्यातील सर्व शेती खातेदारांना घरपोच सातबारा वितरण मोहिमेअंतर्गत 100 टक्के सातबाराचे वाटप - पालकमंत्री दीपक केसरकर