महाराष्ट्र बातम्या

अकोला दि.27 – येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात दरवर्षीप्रमाणे यंदाही बैल पोळा हा सण उत्साहात साजरा झाला. या सोहळ्यास मध्यवर्ती संशोधन केंद्राचे प्रक्षेत्रावर संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे यांची प्रमुख उपस्थिती होती. या प्रसंगी विद्यापीठाचे अधिष्ठाता कृषी अभियांत्रिकी डॉ. सुधीर वडतकर, कुलसचिव डॉ. सुरेंद्र काळबांडे, विभाग प्रमुख पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभाग डॉ. शेषराव चव्हाण, मध्यवर्ती संशोधन केंद्राचे संचालक डॉ. हरमनसिंग सेठी, डॉ. गोविंद जाधव, डॉ. एस. एस. तायडे, उपकुलसचिव राजीव कटारे, डॉ. सतीश ठाकरे, डॉ. जयंत देशमुख, कुलगुरू कार्यालयाचे तांत्रिक सचिव डॉ. नितीन कोष्टी, तांत्रिक अधिकारी डॉ. नीरज सातपुते, सुहास कोळेश्वर, विद्यापीठ जनसंपर्क अधिकारी डॉ. किशोर बिडवे, यांचे सर्व यांचेसह सर्व प्रक्षेत्र प्रभारी, अधिकारी, कर्मचारी, कामगार वृंद उपस्थित होते.

उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बैलांची मनोभावे पूजा करण्यात आली व ठोंबरा पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण करण्यात आला. याप्रसंगी पशु संवर्धन व दुग्धशास्त्र विभागाचे डॉ. राजेश्वर शेळके, डॉ. संजय शेगोकार, डॉ. संजीव नागे, डॉ. प्रकाश कहाते, राजेश ढगे, रवि पवार, शशिकांत गोटे ,सतीश मुन्नरवार,जगदीश राठोड, गिरीश बानोकार आदींची उपस्थिती होती.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात पोळा उत्साहात साजरा

तर विद्यापीठाच्या सेंद्रिय शेती संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे प्रक्षेत्रावर सुद्धा विभाग प्रमुख डॉ. आदिनाथ पसलावार यांचे प्रमुख उपस्थितीत बैलांची पूजा करण्यात आली. याप्रसंगी उद्यानविद्या विभागातील फुलशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. नितीन गुप्ता, कृषी विद्या विभागाचे डॉ. जयंत देशमुख, डॉ. नितीन पत्की, डॉ. नितीन राऊत, डॉ.मिलिंद गिरी, डॉ. इसाळ यांचे सह शास्त्रज्ञ, अधिकारी- कर्मचारी यांचेसह सेंद्रिय शेती संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे व विभागाचे सर्वच अधिकारी, कर्मचारी, कामगार वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात पोळा उत्साहात साजरा

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात पोळा उत्साहात साजरा

गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुखरुप होणार – सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण

गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुखरुप होणार - सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण

दिव्यांगांनी ऑनलाईन अर्ज केल्यावर संबंधित विशेषतज्ञाकडून तपासणी करावी बुधवार हा तपासणीचा दिवस निश्चित

दिव्यांगांनी ऑनलाईन अर्ज केल्यावर संबंधित विशेषतज्ञाकडून तपासणी करावी बुधवार हा तपासणीचा दिवस निश्चित

गणेशोत्सव साजरा करतांना नियमांचे पालन करावे – जिल्हाधिकारी

गणेशोत्सव साजरा करतांना नियमांचे पालन करावे - जिल्हाधिकारी मनीषा खत्री

क्रिडा दिनानिमित्त मॅरेथॉन स्पर्धाचे आयोजन…

क्रिडा दिनानिमित्त परभणीत मॅरेथॉन स्पर्धाचे आयोजन...

क्रेन ऑपरेटरच्या चुकीमुळे क्रेन स्लिप झाल्याने गर्डर कोसळला

क्रेन ऑपरेटरच्या चुकीमुळे क्रेन स्लिप झाल्याने गर्डर कोसळला

आरबीआयच्या मार्गदर्शक नियमांनुसार कामकाज करा जिल्हाधिकारी …बँकांच्या कामांचा, योजनांचा जिल्हाधिकारी यांनी घेतला आढावा

आरबीआयच्या मार्गदर्शक नियमांनुसार कामकाज करा –जिल्हाधिकारी सुनील चव्हाण...बँकांच्या कामांचा, योजनांचा जिल्हाधिकारी यांनी घेतला आढावा

महिला लोकशाही दिनी तक्रार दाखल करण्याचे आवाहन

महिला लोकशाही दिनी तक्रार दाखल करण्याचे आवाहन

शहरी भागात नियमित लसीकरणा सोबतच संबंधित सेवांची प्रभावी अंमलबजावणी करा – जिल्हाधिकारी

शहरी भागात नियमित लसीकरणासोबतच संबंधित सेवांची प्रभावी अंमलबजावणी करा - जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस.

रेल्वे स्टेशन परिसरातील मालधक्क्या वरून माल वाहतुकीसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

अकोला रेल्वे स्टेशन परिसरातील मालधक्क्यावरून माल वाहतुकीसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश