महाराष्ट्र बातम्या

देशाचा अमृत महोत्सव नवोपक्रमांनी साजरा करा…जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

‘स्वराज उत्सव’बाबत जागृती निर्माण करण्याचे आवाहन

संभाजीनगर : देशाला स्वातंत्र्य मिळवून 75 वर्ष झाले. हा अमृत महोत्सव विविध नवोपक्रमांनी उत्साहात साजरा करावा. प्रत्येक दिवशी नवनवीन संकल्पना राबविण्याचे आदेश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी अधिकाऱ्यांना दिले.

खुलताबाद तहसील कार्यालयात आझादी का अमृत महोत्सव उपक्रमांतर्गत 09 ते 17 मध्ये स्वराज उत्सव, 13 ते 15 कालावधीत घरोघरी तिरंगा ध्वज वंदन याबाबत चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. याप्रसंगी उपजिल्हाधिकारी संगीता सानप, उपविभागीय अधिकारी जनार्धन विधाते, तहसीलदार सुरेंद्र देशमुख, नंदकिशोर भोंबे आदींसह तालुक्याचे सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.

स्वराज उत्सव 09 ते 17 ऑगस्ट दरम्यान होत आहे. सामुदायिक राष्ट्रगान 09 ऑगस्ट रोजी मोठ्या उत्साहात तालुक्यात साजरा करण्यासाठी सर्व यंत्रणेने पुढाकार घ्यावा. देशाचा अमृत महोत्सव साजरा करताना इतिहासावर चित्र प्रदर्शन, शालेय, महाविद्यालयीन स्तरावर निबंध, चित्रकला, वक्तृत्व स्पर्धा, ऐतिहासिक वारशा स्थळांची स्वच्छता, बालगोपाळ पंगत, महिला मेळावा, बस स्थानकावर पथनाट्य, डिजिटल व्यवहार जागृती आदी प्रकारचे नवनवीन उपक्रम राबवावेत आदी प्रकारच्या सूचना जिल्हाधिकारी चव्हाण यांनी अधिकाऱ्यांना केल्या.

दैनंदिन कामकाजात गुणवत्ता वृद्धीवर भर द्यावा, असेही अधिकारी, कर्मचाऱ्यांना जिल्हाधिकारी चव्हाण यांनी मार्गदर्शन करताना सांगितले. बैठकीनंतर उपविभागीय अधिकारी विधाते यांनी आभार मानले.


देशाचा अमृत महोत्सव नवोपक्रमांनी साजरा करा…जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

देशाचा अमृत महोत्सव नवोपक्रमांनी साजरा करा…जिल्हाधिकारी सुनील चव्हाण ‘स्वराज उत्सव’बाबत जागृती निर्माण करण्याचे आवाहन संभाजीनगर : देशाला स्वातंत्र्य मिळवून 75 वर्ष झाले. हा अमृत ...

”घरोघरी तिरंगा” उपक्रमाच्‍या आयोजनाबाबत जिल्‍हाधिका-यांनी साधला लोकप्रतिनिधींशी संवाद…

अहमदनगर, 8 ऑगस्‍ट (सौजन्य – जिमाका वृत्तसेवा) – स्‍वातंत्र्याचा #अमृत महोत्‍सवा निमित्‍त 13 ते 15 ऑगस्‍ट 2022 या कालावधीत संपूर्ण राज्‍यासह जिल्‍ह्यात ”#घरोघरीतिरंगा” हा ...

नगर जिल्ह्यात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा… आतापर्यंत ३०६.० मि.मी मध्ये ६८.३ टक्के पाऊस…

नगर, ८ ऑगस्ट २०२२ – भारतीय हवामान विभागाने जिल्ह्यात ८ ते ११ ऑगस्ट या कालावधीत अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. जिल्ह्यातून वाहणाऱ्या गोदावरी नदीत नांदुरमधमेश्वर ...

अकोले नगरपंचायत द्वारे “आजादी का अमृत महोत्सव” उपक्रमाचे आयोजन

अकोले ०८ ऑगस्ट २०२२ : भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात व स्वातंत्र्य संग्रामातील घडलेल्या ...

प्रतीक पवार हल्लाप्रकरणी भाजप आमदार नितेश राणे व गोपीचंद पडळकर यांनी कर्जत येथील रूग्णालयात उपचार घेत असलेल्या प्रतीक पवारची भेट घेतली…

नगर ०८ ऑगस्ट २२ – प्रतीक पवार हल्लाप्रकरणी भाजप आमदार नितेश राणे व गोपीचंद पडळकर यांनी कर्जत येथील रूग्णालयात उपचार घेत असलेल्या प्रतीक पवारची ...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पिकांच्या नुकसानाची पाहणी करुन साधला शेतकऱ्यांशी संवाद…

दि.08 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज नांदेड आणि हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांनी आज नांदेड येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन केले. त्यानंतर हिंगोली ...

मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीतील
हिंगोलीच्या कावड यात्रेस उत्स्फूर्त प्रतिसाद | कळमनुरीच्या चिंचाळेश्वरपासून हिंगोलीच्या कयाधू अमृतेश्वर महादेव मंदिरापर्यंत कावड यात्रा | ‘हर हर महादेव’ च्या गजराने परिसर दुमदुमला…

दिनांक 08 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आयोजित कावड यात्रेमध्ये भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग होता. भाविकांच्या ‘हर हर महादेव’च्या जय घोषाने हा परिसर दुमदुमला. ...

दिवसभरातील महत्वाच्या बातम्या |Todays News - 12.08.2010

जिल्ह्यात 170 व्यक्ती कोरोना बाधित तर 45 कोरोना बाधित झाले बरे…

नांदेड जिल्ह्यात 170 व्यक्ती कोरोना बाधित तर 45 कोरोना बाधित झाले बरे...

खाद्यपदार्थ वर्तमानपत्राच्या कागदातुन दिल्यास विक्रेत्यांवर होणार कारवाई…तपासणीसाठी अन्न सुरक्षा अधिकारी यांची पथके तैनात

खाद्यपदार्थ वर्तमानपत्राच्या कागदातुन दिल्यास विक्रेत्यांवर होणार कारवाई...तपासणीसाठी अन्न सुरक्षा अधिकारी यांची पथके तैनात

12 जानेवारीपासून प्रतिबंधात्मक आदेश लागू

12 जानेवारीपासून प्रतिबंधात्मक आदेश लागू