महाराष्ट्र बातम्या

जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचा शिवसेनेत प्रवेश || MLA Shankarrav Gadakh Join Shivsena

जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचा शिवसेनेत प्रवेश || MLA Shankarrav Gadakh Join Shivsena 

2019 विधानसभा च्या निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडून आलेले आमदार शंकरराव गडाख यांनी महाआघाडीला सरकार स्थापन करताना शिवसेनेला पाठिंबा दिला होता. अखेर आज आमदार शंकरराव गडाख यांनी हाती शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला. मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्री या आपल्या निवास स्थानी राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या हातात शिवबंधन बांधलं. यावेळी शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर उपस्थित होते. 

याबाबत शिवसेनेच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन ही माहिती देण्यात आली.

महाराष्ट्र राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री @GadakhShankarao जी यांनी आज मातोश्री निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी शिवसेनेचे सचिव @NarvekarMilind_ जी उपस्थित होते. pic.twitter.com/0obIZOPVhF

— ShivSena – शिवसेना (@ShivSena) August 11, 2020

2019 च्या विधानसभा निवडणुकीत शंकरराव गडाख हे नगर जिल्ह्यातील नेवासा मतदार संघातून क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवली होती आणि आमदार म्हणून अपक्ष  निवडून आलेल्या गडाख यांनी शिवसेनेला सरकार स्थापनेसाठी पाठिंबा दिला होता. 

माजी दिवंगत आमदार अनिल भैय्या राठोड यांच्या निधना नंतर पोकळी नगर जिल्ह्यातील भरुन काढण्यासाठी शंकरराव गडाख यांचा शिवसेना पक्षप्रवेश नगर मध्ये शिवसेनेला नवसंजिवनी देणारा आहे. आमदार शंकरराव गडाख यांच्या पक्षप्रवेशाने नगरमध्ये शिवसेने ची ताकद वाढणार आहे याकरिता शिवसेनेने शंकरराव गडाख यांच्यावर नगरची जबाबदारी सोपवली आहे.

जनतेच्या हितासाठी सदैव कार्यरत राहिन : जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख Shankarrav Gadakh Join Shivsena

“शिवसेना पक्ष हा कष्टकरी शेतकरी, गोरगरीब जनतेच्या प्रश्नांची जाण असणारा पक्ष आहे. त्यामुळे शिवसेना पक्षाच्या विचारधारेशी आमचे विचार जुळत असल्यामुळे व सन्माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या प्रति असलेल्या निष्ठा व विश्वासामुळे शिवसेना पक्षात प्रवेश करुन यापुढे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या नेतृत्त्वाखाली माझ्या शेतकरी बांधव व गोरगरीब जनतेच्या हितासाठी सदैव कार्यरत राहिल,” अशी प्रतिक्रिया आमदार शंकरराव गडाख यांनी व्यक्त केली.

शिवसेना पक्ष हा कष्टकरी शेतकरी,गोरगरीब जनतेच्या प्रश्नांची जाण असणारा पक्ष आहे त्यामुळे शिवसेना पक्षाच्या विचारधारेशी आमचे विचार जुळत असल्यामुळे व सन्माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या प्रति असलेल्या निष्ठा व विश्वासामुळे शिवसेना पक्षात प्रवेश करून

— Shankarrao Gadakh Patil (@GadakhShankarao) August 11, 2020

जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्याबाबत …About MLA Shankarrav Gadakh 

शंकरराव गडाख हे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांचे पुत्र आहेत.नगर जिल्ह्यातील नेवासा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. आमदार शंकरराव गडाख यांनी शेतकरी क्रांतिकारक पक्षाकडून विधानसभेची निवडणूक लढवली होती आणि सत्तास्थापने साठी त्यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला होता. सध्या ते उस्मानाबादचे पालकमंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे मृदा आणि जलसंधारण मंत्री आहेत. 

जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचा शिवसेनेत प्रवेश || MLA Shankarrav Gadakh Join Shivsena

जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचा शिवसेनेत प्रवेश || MLA Shankarrav Gadakh Join Shivsena  2019 विधानसभा च्या निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडून आलेले आमदार शंकरराव गडाख ...

महालक्ष्मी हिवरा येथे बिबट्याचा आठ वर्ष मुलीवर हल्ला…|| Newasa Bibtya News Batmi

(संग्रहित छायाचित्र) महालक्ष्मी हिवरा येथे बिबट्याचा आठ वर्ष मुलीवर हल्ला…|| Newasa Bibtya News  नेवासा तालुक्यातील महालक्ष्मीहिवरा येथील केदारवस्ती या परीसरात घराच्या अंगणात खेळत असलेल्या ...

नगर जिल्ह्यात तब्बल सात हजाराहून अधिक रुग्ण बरे होऊन परतले || Nagar Corona updates

  नगर जिल्ह्यात तब्बल सात हजाराहून अधिक रुग्ण बरे होऊन परतले घरी बाधीत रूग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रूग्णांची संख्या आजही अधिक…  अहमदनगर: (दिनांक: ११ ऑगस्ट, रात्री ...

महावितरण वाढीव विद्युत बिलाच्या शंकांचे निरसन आणि समाधान विडिओ || MSEDCL Video for Customer Satisfaction

Shrirampur 24Tass: MSEDCL (महावितरण) ने वाढीव विद्युत बिलाच्या शंकांचे निरसन आणि समाधान करण्यासाठी खालील विडिओ प्रसारित केला आहे. सदरील विडिओ आपणास आपल्या विद्युत बिलाच्या शंकांचे ...

कर्नाटक सरकार 8 दिवसात बसवणार छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा || Chatrapati Shivaji Maharaj statue in Karnataka

कर्नाटक सरकार 8 दिवसात बसवणार छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा  || Chatrapati Shivaji Maharaj statue in Karnataka Shrirampur 24Tass : कर्नाटक प्रशासनाकडून 8 दिवसात परवानगी ...

जिल्हा परिषद, समाजकल्याण विभागाच्या वतीने आदिवासी तरूणांना आदिवासी दिनानिमित्त बॅटरीवरील रिक्षांचे वितरण || Battery Rickshaw Distributed to Tribal by ZP

Shrirampur 24Tass : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री ना.बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा परिषद, समाजकल्याण विभागाच्या वतीने आदिवासी तरूणांना आदिवासी दिनानिमित्त बॅटरीवरील रिक्षांचे ...

नगर जिल्ह्यात ६ हजारहून अधिक रुग्ण आतापर्यंत बरे होऊन गेले घरी… आज एकूण३८४ रुग्णांना डिस्चार्ज || Nagar Corona Discharge

Shrirampur 24Tass : नगर जिल्ह्यात आज ३८४ रुग्ण बरे होऊन घरी परतले. त्यामुळे बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या आता सहा हजारांच्या वर गेली आहे. आजपर्यंत ...

नगर जिल्ह्यातील धरण व पाणीसाठ्याबाबत आढावा || Dam Available Water in Nagar District – 08 Aug 2020

नगर जिल्ह्यातील धरण व पाणीसाठ्याबाबत आढावा || Dam Available Water in Nagar District – 08 Aug 2020  घाटघर शिखर व कळसुबाई शिखराच्या पर्वतरांगांमध्ये जोरदार ...

Shrirampur 24Tass || सार्वमत बुलेटिन || Daily Sarvmat || Ahmednagar || Shrirampur – 09 Aug 2020

Shrirampur 24Tass || सार्वमत बुलेटिन || Daily Sarvmat || Ahmednagar || Shrirampur – 09 Aug 2020 #Shrirampur, #Shrirampur24Taas, #ShrirampurNews, #Sarvamat, #MazeShrirampur #Sakshidar #Mind4Talk ==================================================== ...

कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर (देशमुख) महाराजांना तात्पुरता दिलासा || Indorikar Maharaj Court Case

कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर (देशमुख) महाराजांना तात्पुरता दिलासा || Indorikar Maharaj Court Case Indorikar Maharaj Court Case न्यायालयाने कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर (देशमुख) यांच्याविरुद्ध ...