महाराष्ट्र बातम्या

राज्य शैक्षणिक व संशोधन प्रशिक्षण परिषदेने म्हणजेच SCERT (State Council of Educational Reserch & Training) ने चार युट्यूब वाहिन्या सुरू केल्या

राज्य शैक्षणिक व संशोधन प्रशिक्षण परिषदेने म्हणजेच SCERT (State Council of Educational Reserch & Training) ने चार युट्यूब वाहिन्या सुरू केल्या

मराठी आणि ऊर्दू माध्यमाच्या पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी राज्य शैक्षणिक व संशोधन प्रशिक्षण परिषदेने म्हणजेच SCERT (State Council of Educational Reserch & Training)  ने चार युट्यूब वाहिन्या सुरू केल्या आहेत. राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली आहे. लवकरच हिंदी आणि इंग्रजी माध्यमांसाठी देखील युट्यूब चॅनेल्स सुरू होणार आहेत.
अशा पद्धतीने मराठी, ऊर्दू,  हिंदी आणि इंग्रजी या चार माध्यमांमध्ये शैक्षणिक चॅनेल सुरू करणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य असल्याचे राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले आहे. त्यांनी ट्विट करून याची माहिती दिली आहे. त्यांनी आपल्या ट्विट मध्ये लिहिले आहे कि, ‘इयत्ता पहिली ते दहावीच्या मराठी व उर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने चार युट्यूब चॅनेल सुरु केले आहेत. लवकरच हिंदी आणि इंग्रजी माध्यमांसाठी सुद्धा सुरु होणार आहेत. इयत्ता तिसरी ते बारावीसाठी आता जिओ टीव्हीवर एकूण १२ चॅनेल सुरु करण्यात आले आहेत. महाराष्ट्र राज्य हे एकमेव असे राज्य आहे कि ज्याने चार माध्यमांमध्ये शैक्षणिक चॅनेल सुरु केले आहेत.’

पहिली ते दहावीच्या अभ्यासाकरिता SCERT चे चार YouTube चॅनेल || महाराष्ट्र हे पहिले राज्य

इ.१ ली ते इ.१० वीच्या मराठी व उर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने ४ YouTube Channel सुरु केले आहेत. लवकरच हिंदी आणि इंग्रजी माध्यमांसाठी सुद्धा सुरु होणार आहेत. @scertmaha

— Varsha Gaikwad (@VarshaEGaikwad) July 24, 2020


Credit : Varsha Gaikwad Twitter Account
करोना या महामारीच्या काळात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून राज्य सरकारने १५ जूनपासून शैक्षणिक वर्ष सुरू केले आहे मात्र, प्रत्यक्ष शाळा सुरू करणे शक्य नसल्याने राज्य सरकारने ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय स्वीकारला. दरम्यान, जिओ टीव्हीवर देखील राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागामार्फत इयत्ता तिसरी ते बारावीसाठी एकूण १२ वाहिन्या सुरू झाल्या आहेत. त्यासंदर्भातही शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विट केले होते.
राज्यातील सर्व शालेय विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. पूर्व प्राथमिक वर्गांसाठीही ऑनलाइन वर्ग सुरू करण्याचे आदेश जारी झाले आहेत. तसेच या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन वर्गाची वेळेची मर्यादाही निश्चित करण्यात आली आहे.

पहिली ते दहावीच्या अभ्यासाकरिता SCERT चे चार YouTube चॅनेल || महाराष्ट्र हे पहिले राज्य

राज्य शैक्षणिक व संशोधन प्रशिक्षण परिषदेने म्हणजेच SCERT (State Council of Educational Reserch & Training) ने चार युट्यूब वाहिन्या सुरू केल्या मराठी आणि ऊर्दू ...

खा. छत्रपती उदयनराजे भोसले || शरद पवार || भाजयुमो व राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचं पाठवणार पत्रे …|| Sending Letters

भाजयुमो व राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचं पाठवणार पत्रे … काय आहे प्रकरण –  राष्ट्रवादी काँग्रेस चे नेते शरद पवार यांनी राम मंदिराबाबत केलेल्या “आम्हाला वाटतं ...

श्रीरामपुरात पुन्हा आज १५ करोनाबाधित रुग्ण, कोरोना बाधितांची संख्या १०१ वर || Shrirampur Corona Updates

श्रीरामपुरात पुन्हा आज १५ करोनाबाधित रुग्ण, कोरोना बाधितांची  संख्या १०१ वर श्रीरामपूर (Shrirampur) शहरातील आज १५ रुग्णांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले असून कोरोना बाधितांची ...

नगर जिल्ह्यात १ हजार अँटीजेन चाचण्या; १५८ जणांना कोरोना || 1000 Antigen Test in Nagar District

नगर जिल्ह्यात १ हजार अँटीजेन चाचण्या; १५८ जणांना कोरोना नगर जिल्ह्यात आज कोरोना टेस्ट लॅबमध्ये १० रुग्ण बाधित आढळून आले तर खाजगी प्रयोगशाळेत बाधित ...

श्रीरामपूरात आज ७ जण कोरोना पॉझिटिव…बाधितांचा आकडा ७२ वर

श्रीरामपूरात आज ७ जण कोरोना पॉझिटिव…बाधितांचा आकडा ७२ वर आज श्रीरामपूर तालुक्यामध्ये कोरोना रुग्णांनामध्ये ७ रुग्णांची वाढ झाली आहे यामध्ये चार पुरुष व तीन महिला असून बेलापूर ...

अहमदनगर: कोरोना रुग्ण संख्यावाढीची नुसतीच चर्चा! चुकीचे संदेश पसरविल्यास गुन्हे! जिल्हाधिकारी व्दिवेदींचा इशारा!

अहमदनगरमध्येकोरोनानेचांगलाचधुमाकूळघातला आहे. ग्रामीणभागात कोरोनानेशिरकाव केल्यानेप्रशासनाचीडोकेदुखीवाढली आहे. पाथर्डीतालुक्यातहीरुग्णसंख्याझपाट्यानेवाढत चालली आहे. राज्याचेमहसूलमंत्रीबाळासाहेबथोरात यांचा मतदारसंघअसलेल्यासंगमनेरतालुक्यातसुरुवातीपासूनचकरोनाचाकहर सुरू आहे. जिल्ह्यातनगर शहराच्यापाठोपाठसर्वात जास्त करोनाचेरुग्ण हे संगमनेरतालुक्यातआहेत. त्यामुळेमागील आठवड्यातजिल्ह्याचेपालकमंत्रीहसन मुश्रीफयांनीहीसंगमनेरयेथे भेट ...