महाराष्ट्र शासन बातम्या

ज्येष्ठ नागरिकांसाठी राष्ट्रीय हेल्पलाईन । एल्डरलाईन 14567

दि. 21 जानेवारी २३ (आजचा साक्षीदार): गेल्या काही दशकांमध्ये भारतातील वृध्दांच्या संख्येमध्ये वेगाने वाढ नोंदवली गेली आहे सध्या देशामध्ये सुमारे 23 कोटी लोकसंख्या 60 वर्षांपेक्षा जास्त वयाची आहे. ज्याप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांची संख्या वेगाने वाढत आहे, त्या प्रमाणात ग्रामीण आणि शहरी भागातील ज्येष्ठांच्या अडचणींमध्ये वाढ होत आहे. आणि त्यांच्या अडचणी सोडविणे व गरजा भागविण्यासाठी सेवांचे नवीन मॉडेल विकसित करणे हे ही तितकेच आवश्यक आहे.याकरिता केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालयामार्फत देशभरातील ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्या निवारणासाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी राष्ट्रीय हेल्पलाईन(14567) सर्व राज्यात सुरु करण्यात आली आहे.

सामाजिक न्याय व विशेषसहाय्य विभाग, राष्ट्रीय समाज रक्षा संस्थान आणि जनसेवा फॉऊंडेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांची राष्ट्रीय हेल्पलाईन एल्डरलाईन-( 14567) जनसेवा फौंडेशन, पुणेतर्फे चालविण्यात येत आहे. 1 ऑगस्ट 2021 पासून महाराष्ट्र राज्यामध्ये एल्डरलाईन-14567 या हेल्पलाईनच्या कार्याची सुरुवात झाली. 1 ऑक्टोबर 2021 रोजी जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून उपराष्ट्रपती यांनी एल्डरलाईन- 14567 या ज्येष्ठांसाठीच्या राष्ट्रीय हेल्पलाईनचे लोकार्पण देशास केले आहे.

महाराष्ट्र शासकीय उपक्रम । सरकारी योजना । महाराष्ट्र शासन योजना ।
महाराष्ट्र शासकीय उपक्रम । सरकारी योजना । महाराष्ट्र शासन योजना ।

राज्यभरातून ज्येष्ठ नागरिकांसाठी पंचाहत्तर हजाराहून अधिक कॉल आले. त्यामधून ज्येष्ठ नागरिकांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष प्रकारे मदत हेल्पलाईनने केली आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी कनेक्ट सेंटरफिल्ड टीम, विविध शासकीय यंत्रणा, पोलीस प्रशासन, स्वयंसेवक आणि विविध सेवाभावी संस्था सातत्याने कार्यरत आहेत. हेल्पलाईन सकाळी 8 ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंत आठवड्यातील सर्व दिवस कार्यरत आहे.

एल्डरलाईन- 14567 मार्फत पुरविण्यात येणाऱ्या सेवाः –
माहिती: आरोग्य जागरूकता, निदान, उपचार निवारा, वृद्धाश्रम, डे-केअर सेंटर, पोषण विषयक, ज्येष्ठां संबंधी अनुकूलउत्पादने, सांस्कृतिक, आध्यात्मिक, कला, करमणूक आदी.
मार्गदर्शन: कायदेविषयक ( वैयक्तिक आणि कौटुंबिकस्तरावर दोन्ही), विवाद निराकरण (मालमत्ता, शेजारी) आर्थिक, पेन्शन संबंधित सरकारी योजना.
भावनिक आधार: समर्थन चिंता निराकरण नातेसंबंध विषयक व्यवस्थापन मृत्यूशी संबंधित शोक, जीवन व्यवस्थापन (वेळ, ताण, राग व्यवस्थापन; मृत्यूपूर्वीचे दस्तऐवजीकरण )
क्षेत्रीय पातळीवर मदत: बेघर, अत्याचारग्रस्त वृद्ध,ज्येष्ठा हरवलेले व्यक्तींची सेवा व काळजी घेणे.

ज्येष्ठ नागरिकांसाठी राष्ट्रीय हेल्पलाईन । एल्डरलाईन 14567

ज्येष्ठ नागरिकांसाठी राष्ट्रीय हेल्पलाईन । एल्डरलाईन 14567

गेल्या काही दशकांमध्ये भारतातील वृध्दांच्या संख्येमध्ये वेगाने वाढ नोंदवली गेली आहे सध्या देशामध्ये सुमारे 23 कोटी लोकसंख्या 60 वर्षांपेक्षा जास्त वयाची आहे. ज्याप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांची संख्या वेगाने वाढत आहे, त्या प्रमाणात ग्रामीण आणि शहरी भागातील ज्येष्ठांच्या अडचणींमध्ये वाढ होत आहे.

जिल्हा विधी सेवा प्राधिकणाच्यावतीने बांधकाम कामगारांसाठी विधी साक्षरता शिबिर संपन्न

जिल्हा विधी सेवा प्राधिकणाच्यावतीने बांधकाम कामगारांसाठी विधी साक्षरता शिबिर संपन्न

येरवडा येथे जिल्हा विधि सेवा प्राधिकरण आणि बांधकाम मजुरांच्या अडचणींवर काम करणाऱ्या सामाजिक संस्थेच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या योजनांच्या सार्वजनिक अंकेक्षणबाबत विधी साक्षरता शिबिर आयोजित करण्यात आले.

रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत 24 जानेवारी रोजी ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन

रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत 24 जानेवारी रोजी ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन

जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सातारा यांच्यावतीने पंडीत दीनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेहाळाव्याचे 24 जानेवारी 2023 रोजी आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त सुनिल पवार यांनी दिली आहे.

टॅब वाटपाबाबतच्या अपप्रचाराला विद्यार्थ्यांनी बळी पडू नये - महाज्योतीचे आवाहन

टॅब वाटपाबाबतच्या अपप्रचाराला विद्यार्थ्यांनी बळी पडू नये – महाज्योतीचे आवाहन

महाज्योतीने संबंधित जिल्ह्यातील समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्तांमार्फत टॅब वाटपाचे नियोजन पूर्ण केलेले असून नोंदणीकृत प्रत्येक विद्यार्थ्याला टॅब मिळेल याची दक्षता घेतलेली आहे. त्यामुळे टॅब वाटपाबाबत पसरविल्या जाणाऱ्या अपप्रचाराला विद्यार्थी व पालक यांनी बळी पडू नये, असे आवाहन महाज्योती मार्फत करण्यात आले आहे.

व्हिजन 2047: शिखर संमेलन। पर्यावरण संवर्धन अभियानाला जनचळवळीचे स्वरूप यावे :वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

व्हिजन 2047: शिखर संमेलन। पर्यावरण संवर्धन अभियानाला जनचळवळीचे स्वरूप यावे :वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

न‍िसर्गाचा समतोल राखण्यासाठी पर्यावरण आणि जल संवर्धन काळाची गरज असून याला जनचळवळीचे स्वरूप यावे, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

अटकावून ठेवलेली वाहने सोडवून घेण्याचे आवाहन

अटकावून ठेवलेली वाहने सोडवून घेण्याचे आवाहन

पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वायुवेग पथकाने वाहन कर न भरलेल्या व विविध मोटार वाहन कायद्यातील गुन्ह्यातंर्गत प्रादेशिक परिवहन कार्यालय, आळंदी रोड कार्यालय, वाघेश्वर वाहनतळाच्या आवारात अटकावून ठेवलेली वाहने वाहन मालकांनी मोटार वाहन कर व दंड भरुन सोडवून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजना । शेतकऱ्यांनी वैयक्तिक शेततळ्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन

मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजना । शेतकऱ्यांनी वैयक्तिक शेततळ्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन

ख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेंतर्गत जिल्ह्याला 220 शेततळ्याचे उद्दिष्ट प्राप्त झाले असून शेतक-यांना शेततळ्यासाठी कमाल 75 हजार रुपयाच्या मर्यादेत शेततळ्यासाठी अनुदान उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. यासाठी इच्छुक शेतक-यांनी महाडीबीटी पोर्टलवरुन ऑनलाईन अर्ज सादर करावे, असे आवाहन कृषि विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आपदा मित्र योजनेंतर्गत जिल्ह्यात 500 आपदा मित्र प्रशिक्षित होणार

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आपदा मित्र योजनेंतर्गत जिल्ह्यात 500 आपदा मित्र प्रशिक्षित होणार

जिल्ह्यात हमीदा एज्युकेशन सोसायटीज डॉन ॲकॅडमी (सिडनी पॉईंटरोड) पाचगणी ता.महाबळेश्वर येथे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आपदा मित्र योजनेंतर्गत जिल्ह्यातील एकूण 500 आपदा मित्र स्वयंसेवक यांना आपत्ती व्यवस्थापन या विषयाबाबत 12 दिवसांचे निवासी प्रशिक्षण देण्यात येत आहे. हे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या 5 आपदा मित्र स्वयंसेवकांना पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात मोफत आपत्कालीन प्रतिसाद किट देण्यात आले. शासनामार्फत या आपदा मित्रांचा सुरक्षा विमा उतरविला जाणार आहे. हे प्रशिक्षण सातारा जिल्ह्यातील दुर्घटना, संभाव्य धोके टाळण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी सांगितले.

पुणे-मिरज रेल्वेची दुसरी मार्गिकेसाठी भूसंपादन पूर्ण । रेल्वेलाईनचे कामही अंतिम टप्प्यात

पुणे-मिरज रेल्वेची दुसरी मार्गिकेसाठी भूसंपादन पूर्ण । रेल्वेलाईनचे कामही अंतिम टप्प्यात

जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे-मिरज रेल्वेमार्गाच्या दुसऱ्या मार्गिकेसाठी आवश्यक भूसंपादनाची १०० टक्के कार्यवाही पूर्ण करण्यात आली असून रेल्वेलाईनचे कामही अंतिम टप्प्यात आहे. दुहेरी मार्गावरुन रेल्वेवाहतूक सुरू झाल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांसह शेतकरी, व्यापारी, नोकरदारांसाठी गतीमान प्रवासाची सोय होणार असून परिसरातील अर्थविकासाला चालना मिळेल, असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी व्यक्त केला.

सामाजिक जाणीव आणि लोकसहभागातुन नद्यांचे पुनरुज्जीवन करावे - जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह

सामाजिक जाणीव आणि लोकसहभागातुन नद्यांचे पुनरुज्जीवन करावे – जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह

सामाजिक जाणिवेचे भान ठेऊन लोकसहभागातून अकोल्यातील मोरणा व संभाजीनगर च्या खाम नदीचे पुनरुज्जीवन केल्याबद्दल जलतज्ञ डॉ राजेंद्र सिंह यांनी जिल्हाधिकारी अस्तिक कुमार पाण्डेय व त्यांच्या सहकार्याच्या कामाचे कौतुक करत या उपक्रमाचा आदर्श महाराष्ट्रासह देशातील इतर राज्यांनी घ्यावा, असे गौरवोद्गार काढले.