ज्येष्ठ नागरिकांसाठी राष्ट्रीय हेल्पलाईन
आजचा साक्षीदार दि. 03 फेब्रुवारी 2025: भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालयामार्फत देशभरातील ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्या निवारणासाठी ‘एल्डर लाईन १४५६७’ ही टोल फ्री हेल्पलाईन सर्व राज्यात सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांनी या सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त प्रवीण कोरगंटीवार यांनी केले आहे.

सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय, भारत सरकार, राष्ट्रीय समाज रक्षा संस्थान (NISD), सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन आणि जनसेवा फऊंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्यामध्ये ज्येष्ठांसाठीची ही राष्ट्रीय हेल्पलाईन जनसेवा फाऊंडेशनद्वारे चालवली जात आहे. भारतातील ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी एक विश्वासार्ह राष्ट्रीय हेल्पलाइन तयार करून ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडविणे तसेच अत्याचार ग्रस्त वृद्ध व्यक्तींची काळजी घेणे हा यामागचा याचा उद्देश आहे.