महाराष्ट्र शासन बातम्या

पुणे, दि. ५ : अन्न व औषध प्रशासन कार्यालयाच्यावतीने मंचर येथील महावीर डेअरी अॅन्ड स्वीट मार्टने अस्वच्छ परिस्थितीत खवा व गुजरात बर्फी साठविल्यामुळे तसेच चाकण येथील दोन मिठाई विक्रेत्यांनी मिठाई ट्रे वर ‘बेस्ट बिफोर’ दिनांक नमूद केले नसल्याचे आढळून आल्याने त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.

अन्न व औषध प्रशासन कार्यालयाच्या वतीने मंचर व चाकण येथील मिठाई विक्रेत्यांवर कारवाई

अन्न व औषध प्रशासन कार्यालयाच्यावतीने महावीर डेअरी अॅन्ड स्वीट मार्ट, मंचर या स्वीट मार्टवर धाड टाकून अस्वच्छ परिस्थितीत साठविलेला खवा व स्वीट खव्याचे (गुजरात बर्फी) दोन नमुने घेऊन उर्वरित २३ हजार ८०० रुपये किंमतीचा ११९ किलो खवा आणि ५ हजार ६०० रुपये किंमतीचा २८ किलो स्वीट खवा (गुजरात बर्फी) असा एकूण २९ हजार ४०० किंमतीचा साठा जप्त केला. स्वीट खवा आणि गुजरात बर्फी ही साखर, दूध पावडर, खाद्यतेल आदी घटक पदार्थांपासून बनविण्यात आल्याचे लेबलवरुन स्पष्ट होते.

सर्व मिठाई विक्रेत्यांनी दुकानात विक्रीसाठी ठेवलेल्या मिठाईच्या ट्रे वरती ‘बेस्ट बिफोर’ दिनांक नमूद करावा व मिठाई बनविण्यासाठी भेसळयुक्त स्वीट खवा (गुजरात बर्फी) चा वापर करु नये, दुधापासून बनविलेल्या चांगल्या दर्जाच्या खव्याचा वापर करावा. स्वीट खवा(गुजरात बर्फी) चा वापर करुन मिठाई बनवित असल्याचे आढळल्यास मिठाई विक्रेत्यावर कारवाई करण्यात येईल, असे अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहआयुक्त संजय नारागुडे यांनी कळविले आहे.

अन्न व औषध प्रशासन कार्यालयाच्या वतीने मंचर व चाकण येथील मिठाई विक्रेत्यांवर कारवाई

अन्न व औषध प्रशासन कार्यालयाच्या वतीने मंचर व चाकण येथील मिठाई विक्रेत्यांवर कारवाई

गुलाबी बोंडअळी व्यवस्थापनासाठी बंधन प्रकल्पावर मार्गदर्शन

गुलाबी बोंडअळी व्यवस्थापनासाठी बंधन प्रकल्पावर मार्गदर्शन

शिक्षक दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांनी साधला राज्यातील शिक्षकांशी संवाद • सरकारी शाळांचे सक्षमीकरण, आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण यावर भर देणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

शिक्षक दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांनी साधला राज्यातील शिक्षकांशी संवाद • सरकारी शाळांचे सक्षमीकरण, आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण यावर भर देणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

कुष्ठरुग्ण व क्षयरुग्णांकरीता शोध मोहिम राबवा; अपर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे यांचे निर्देश

कुष्ठरुग्ण व क्षयरुग्णांकरीता शोध मोहिम राबवा;  अपर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे यांचे निर्देश

शिक्षक दिनाचे औचित्य साधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जिल्हयातील शिक्षकांशी संवाद
ज्ञानदानाची शिक्षकांची भूमिका आजही कायम – मुख्यमंत्री श्री. शिंदे

शिक्षक दिनाचे औचित्य साधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जिल्हयातील शिक्षकांशी संवाद ज्ञानदानाची शिक्षकांची भूमिका आजही कायम                                                                      मुख्यमंत्री श्री. शिंदे

राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला
जलसंपदा व सार्वजनिक बांधकाम विभागाकडील कामांचा आढावा

राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला जलसंपदा व सार्वजनिक बांधकाम विभागाकडील कामांचा आढावा 

‘लम्पि स्किन डिसीज’ प्रादुर्भाव; पशुसंवर्धन आयुक्त संचिन्द्र प्रताप सिंह यांनी घेतला आढावा: अकोट तालुक्यात दिली भेट

‘लम्पि स्किन डिसीज’प्रादुर्भाव; पशुसंवर्धन आयुक्त संचिन्द्र प्रताप सिंह यांनी घेतला आढावा: अकोट तालुक्यात दिली भेट

जनकल्याणाच्या योजना – ग्रामीण कुक्कुटपालन प्रजाती विकास योजनेद्वारे उद्योजकता विकास

जनकल्याणाच्या योजना - ग्रामीण कुक्कुटपालन प्रजाती विकास योजनेद्वारे उद्योजकता विकास

पी.एम. किसान लाभार्थ्यांना किसान क्रेडीट कार्ड सुविधा देण्यासाठी जिल्ह्यात 1 ते 30 सप्टेंबर कालावधीत विशेष मोहिम – जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

पी.एम. किसान लाभार्थ्यांना किसान क्रेडीट कार्ड सुविधा देण्यासाठी जिल्ह्यात 1 ते 30 सप्टेंबर कालावधीत विशेष मोहिम - जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

मतदान ओळखपत्राशी आधार कार्ड जोडणी मोहिमेत धोंडगेवाडी गावाचे शंभर टक्के काम – बीएलओ सविता माने यांचा जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केला सन्मान

मतदान ओळखपत्राशी आधार कार्ड जोडणी मोहिमेत धोंडगेवाडी गावाचे शंभर टक्के काम - बीएलओ सविता माने यांचा जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केला सन्मान