महाराष्ट्र शासन बातम्या

वर्धा, दि.03 : नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांनी खचून न जाता शेतीशी निगडीत विविध जोडधंदे करावेत, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले.

शेतकऱ्यांनी शेतीनिगडीत विविध जोडधंदे करावे – जिल्हाधिकारी
 जिल्हाधिका-यांची नैसर्गिक शेती कार्यशाळेस भेट

कृषि विज्ञान केंद्र, सेलसुराच्यावतीने नैसर्गिक शेती या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेस जिल्हाधिकाऱ्यांनी भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सचिन ओम्बासे, कृषि विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ.जीवन कतोरे, तहसीलदार रमेश कोळपे, उपविभागीय कृषि अधिकारी अजय राऊत आदी उपस्थित होते.

जिल्ह्यात हळद उत्पादन मुख्यत: सेंद्रिय पद्धतीने घेतल्या जात असल्यामुळे शेतकऱ्यांनी वायगाव हळदीची जास्तीत जास्त प्रमाणात लागवड करावी, त्याबरोबरच शेतकऱ्यांनी पिक पद्धतीत काळानुरूप बदल करणे गरजेचे असल्याचे जिल्हाधिकारी पुढे म्हणाले. पिकांची लागवड ही रुंद वरंबा सरी पद्धतीने करावी, उद्यमशिलतेवर भर द्यावा. सेंद्रिय पद्धतीने फळपिके व भाजीपाला पिके घ्यावी. रबी हंगामामध्ये तेलबिया पिकांची लागवड, पडलेल्या पावसाच्या पाण्याचे मुलस्थानी जलसंधारण करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन ओंम्बासे यांनी आपल्या शेती बरोबरच अधिक उत्पन्नाचे स्त्रोत म्हणून पशुपालन, दुग्धव्यवसाय यासारखे जोडधंदे सोबतच चारापिके लावण्यावर भर द्यावा, असे सांगितले. डॉ.जीवन कतोरे यांनी नैसर्गिक शेती करण्यामागील उद्दिष्टे व महत्व शेतक-यांसमोर विषद केले. सध्याची जिल्ह्यामधील पावसाची तसेच खरीप पिकांची एकूण परिस्थिती बघता बदलत्या हवामानानुसार शेतकऱ्यांनी कोणकोणत्या उपाययोजना करायला पाहिजेत, याविषयी सखोल मार्गदर्शन केले. या कार्यशाळेस शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेतकऱ्यांनी शेतीनिगडीत विविध जोडधंदे करावे – जिल्हाधिकारी
 जिल्हाधिका-यांची नैसर्गिक शेती कार्यशाळेस भेट

शेतकऱ्यांनी शेतीनिगडीत विविध जोडधंदे करावे - जिल्हाधिकारी  जिल्हाधिका-यांची नैसर्गिक शेती कार्यशाळेस भेट

जनावरांमधील रोगनियंत्रणासाठी ग्रामस्तरावर कार्यकारी समित्या  जनावरांमध्ये थायलेरियासिस व लेप्टोस्पायरोसिसची लक्षणे  पशुसंवर्धन विभागाच्यावतीने जनावरांवर औषधोपचार

जनावरांमधील रोगनियंत्रणासाठी ग्रामस्तरावर कार्यकारी समित्या  जनावरांमध्ये थायलेरियासिस व लेप्टोस्पायरोसिसची लक्षणे  पशुसंवर्धन विभागाच्यावतीने जनावरांवर औषधोपचार

शेतकरी उत्पादक प्रकल्पांना जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी दिली भेट

शेतकरी उत्पादक प्रकल्पांना जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी दिली भेट

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ येथील आढावा बैठक • विद्यापीठांचे कार्य शेतकऱ्यांना संजिवनी देण्याचे- कृषीमंत्री अब्दुल सत्तार

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ येथील आढावा बैठक • विद्यापीठांचे कार्य शेतकऱ्यांना संजिवनी देण्याचे- कृषीमंत्री अब्दुल सत्तार

ऑटोरिक्षा मीटर तपासणीचे कामकाज ९ सप्टेंबर रोजी बंद

ऑटोरिक्षा मीटर तपासणीचे कामकाज  ९ सप्टेंबर रोजी बंद

जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू

जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू 

लंपी स्कीन डिसीजचा संभाव्य प्रसार रोखण्यासाठी जिल्हा व तालुकास्तरीय नियंत्रण कक्ष • लंपी स्कीन आजाराची लक्षणे दिसताच पशुपालकांनी नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन

लंपी स्कीन डिसीजचा संभाव्य प्रसार रोखण्यासाठी जिल्हा व तालुकास्तरीय नियंत्रण कक्ष • लंपी स्कीन आजाराची लक्षणे दिसताच पशुपालकांनी नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन

महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते राष्ट्रीय पोषण महिना कार्यक्रमाचा शुभारंभ • अंगणवाडी सेविकांच्या मानधन वाढीसंदर्भात राज्यशासन सकारात्मक निर्णय घेणार – मंगलप्रभात लोढा

महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते राष्ट्रीय पोषण महिना कार्यक्रमाचा शुभारंभ • अंगणवाडी सेविकांच्या मानधन वाढीसंदर्भात राज्यशासन सकारात्मक निर्णय घेणार - मंगलप्रभात लोढा

जिल्हा महिला व बाल‍ विकास कार्यालयास बाल विवाह रोखण्यात यश

जिल्हा महिला व बाल‍ विकास कार्यालयास बाल विवाह रोखण्यात यश

पुणे फेस्टिवल देशाच्या सांस्कृतिक इतिहासातील सोनेरी पान – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

पुणे फेस्टिवल देशाच्या सांस्कृतिक इतिहासातील सोनेरी पान - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी