महाराष्ट्र शासन बातम्या

अटकावून ठेवलेली वाहने सोडवून नेण्याचे प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे आवाहन

पुणे दि.14: प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वायुवेग पथकाने थकीत कर वसुलीसाठी तसेच मोटार वाहन कायद्यातील अन्य गुन्ह्यांतर्गत कार्यालयाच्या आवारात अटकवून ठेवलेली वाहने मोटार वाहन कर व दंड भरून पुढील ७ दिवसांत सोडवून नेण्याचे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी चिंचवड यांनी केले आहे.

दुचाकींसाठी नोंदणी क्रमांकाची नवीन मालिका
अटकावून ठेवलेली वाहने सोडवून नेण्याचे प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे आवाहन

प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या आवारातील अशी वाहने मालक, चालक यांच्या जबाबदारीवर अटकावून ठेवलेली आहेत. ही वाहने सोडवून नेण्यासाठी वाहन मालकांनी परिवहन कार्यालयात वाहन कर, दंड भरलेला नाही अथवा वाहने नेण्यासाठी संपर्क केलेला नाही.

प्रादेशिक परिवहन कार्यालयाने मोटार वाहन थकीत कराच्या वसुलीसाठी अटकावून ठेवलेल्या वाहनांच्या जाहीर लिलावाची प्रक्रियादेखील सुरु केलेली आहे. त्यापैकी ४ वाहनांच्या मालकांना कार्यालयाने पाठविलेल्या नोटीस वाहन मालक नोंदणीकृत पत्त्यावर आढळून न आल्याने त्यांना पोच झालेल्या नाहीत. अशा वाहनांची यादी परिवहन कार्यालयाच्या सूचना फलकावर प्रदर्शित केलेली आहे.

मोटार वाहन कायद्यातील तरतुदीनुसार वाहन मालकांनी नोंदणी प्रमाणपत्रावर पत्ता बदलाची नोंद पत्ता बदल झाल्यास ७ दिवसात करावयाची आहे. परंतु, वाहन मालकांनी पत्ता बदल न केल्याने वाहन मालकाचे अद्ययावत पत्त्यावर पत्रव्यवहार करणे शक्य होत नाही व वाहन मालकासोबत संपर्क होऊ शकत नाही.

वाहन मालकांनी आपली वाहने मोटार वाहन कर व दंड भरून पुढील ७ दिवसांत सोडवुन न्यावीत, अन्यथा अशी वाहने बेवारस वाहने आहेत समजून सक्षम प्राधिकाऱ्यांच्या परवानगीने या वाहनांचा जाहीर ई लिलाव करण्यात येईल, असेही प्रादेशिक परिवहन अधिकारी, पिंपरी चिंचवड यांनी कळविले आहे.

दुचाकींसाठी नोंदणी क्रमांकाची नवीन मालिका

अटकावून ठेवलेली वाहने सोडवून नेण्याचे प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे आवाहन

अटकावून ठेवलेली वाहने सोडवून नेण्याचे प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे आवाहन

स्वाधार योजनेचा लाभ घेण्यासाठी 31 जानेवारीपर्यंत अर्ज करा – सहाय्यक आयुक्त जयंत चाचरकर

स्वाधार योजनेचा लाभ घेण्यासाठी 31 जानेवारीपर्यंत अर्ज करा - सहाय्यक आयुक्त जयंत चाचरकर

केंद्रीय मंत्री, नागरी हवाई वाहतूक व पोलाद यांच्याकडून कोल्हापूरच्या नवीन विमानतळ इमारतीची पाहणी | कोल्हापूरची संस्कृती दर्शविणारे आधूनिक विमानतळ लवकरच नागरिकांच्या सेवेत – जोतिरादित्य सिंधिया

केंद्रीय मंत्री, नागरी हवाई वाहतूक व पोलाद यांच्याकडून कोल्हापूरच्या नवीन विमानतळ इमारतीची पाहणी | कोल्हापूरची संस्कृती दर्शविणारे आधूनिक विमानतळ लवकरच नागरिकांच्या सेवेत - जोतिरादित्य सिंधिया

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत येवल्यातील २० कोटी ३९ लाखांच्या ३ रस्त्यांचे भूमिपूजन संपन्न

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत येवल्यातील २० कोटी ३९ लाखांच्या ३ रस्त्यांचे भूमिपूजन संपन्न

💁🏻‍♀️ अटल सेतू पुलावरून प्रवास करताना किती टोल भरावा लागणार? वाचा सविस्तर

💁🏻‍♀️ अटल सेतू पुलावरून प्रवास करताना किती टोल भरावा लागणार? वाचा सविस्तर

‘नमो ११ कलमी कार्यक्रम’ अंमलबजावणीचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा / विभागांनी गतीने कार्यवाही करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

‘नमो ११ कलमी कार्यक्रम’ अंमलबजावणीचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा / विभागांनी गतीने कार्यवाही करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

सागरी व्यापार क्षेत्रातील गुंतवणूकदारांना भारतात मोठी संधी: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी / तिसऱ्या ग्लोबल मेरीटाइम इंडिया समिट (GMIS) २०२३ चे उद्घाटन

सागरी व्यापार क्षेत्रातील गुंतवणूकदारांना भारतात मोठी संधी: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी / तिसऱ्या ग्लोबल मेरीटाइम इंडिया समिट (GMIS) २०२३ चे उद्घाटन

आसियान (ASEAN) राष्ट्रांच्या संघटनेतील देशांच्या राजदूतांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ‘वर्षा’ निवासस्थानी सदिच्छा भेट…

आसियान (ASEAN) राष्ट्रांच्या संघटनेतील देशांच्या राजदूतांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ‘वर्षा’ निवासस्थानी सदिच्छा भेट

मंत्रिमंडळ बैठक : मंगळवार, दि.१० ऑक्टोबर २०२३ – एकूण निर्णय-७

मंत्रिमंडळ बैठक : मंगळवार, दि.१० ऑक्टोबर २०२३ - एकूण निर्णय-७

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून तीर्थक्षेत्र विकासाचा आढावा – परळी वैजनाथ, घृष्णेश्वर आणि सप्तशृंगी देवी तीर्थक्षेत्रांच्या ५३१ कोटींच्या सुधारित आराखड्यास मान्यता

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून तीर्थक्षेत्र विकासाचा आढावा - परळी वैजनाथ, घृष्णेश्वर आणि सप्तशृंगी देवी तीर्थक्षेत्रांच्या ५३१ कोटींच्या सुधारित आराखड्यास मान्यता