ओबीसी महामंडाळाची एक रक्कमी परतावा योजना
अमरावती, दि. 29 (आजचा साक्षीदार): ओबीसी महामंडाळाच्या थकीत कर्जप्रकरणी संपूर्ण थकीत कर्ज रक्कमेचा एक रक्कमी भरणा करणाऱ्या लाभार्थ्यांना थकीत व्याज रक्कमेत 50 टक्के सवलत देण्यासाठी एक रक्कमी परतावा योजना दि. 31 मार्च 2025 पर्यंत राबविण्यात येत आहे. महामंडाळाच्या थकबाकीदार लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक व्ही. एस. खोडे यांनी केले आहे.