कृषि पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन
लातूर,दि.२३ जानेवारी २०२३ (आजचा साक्षीदार): राज्यात दरवर्षी शेती व पुरक क्षेत्रात अतिउल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी अथवा संस्थेस राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत पुरस्कार देण्यात येतात. तरी या पुरस्कारासाठी शेतकरी, शेतकरी गट, संस्थांनी आपले प्रस्ताव ३० जानेवारी २०२३ पर्यंत संबंधित तालुका कृषि अधिकारी कार्यालय येथे सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी केले आहे.
कृषि विभागाशी संबंधित पुरस्कारांमध्ये शेती क्षेत्राशी संबंधित उद्यान पंडीत, डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार, वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार, जिजामाता कृषिभूषण पुरस्कार, वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार, कृषिभूषण (सेंद्रीय शेती) पुरस्कार, पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषि सेवा रत्न पुरस्कार, युवा शेतकरी पुरस्कार आणि उत्कृष्ट कृषि संशोधक पुरस्कार इत्यादी पुरस्कारांचा समावेश आहे. यासाठी शेतकरी, शेतकरी गट, कृषि संलग्न संस्था पात्र आहेत.
कृषि पुरस्काराच्या मार्गदर्शक सुचना कृषि विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. अधिक माहीतीसाठी आपल्या गावचे कृषि सहायक, कृषि पर्यवेक्षक, तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन श्री. गावसाने यांनी केले आहे.
महाराष्ट्र शासन योजना
कृषि पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन
कृषि पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन..
25 जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिन
25 जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिन सातारा दि.23 जानेवारी २३ (आजचा साक्षीदार): जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी सातारा तसेच मतदार नोंदणी अधिकारी 262 सातारा ...
जलजीवन मिशनच्या विशेष ग्रामसभांचे प्रजासत्ताक दिनी आयोजन
जलजीवन मिशनच्या विशेष ग्रामसभांचे प्रजासत्ताक दिनी आयोजन
शासकीय तंत्रनिकेतनच्या मुलींच्या वसतीगृह रिक्त जागेकरीता प्रवेश सुरु
शासकीय तंत्रनिकेतनच्या मुलींच्या वसतीगृह रिक्त जागेकरीता प्रवेश सुरु
पदवीधर निवडणूकीच्या विविध परवानग्यांसाठी तहसील कार्यालयांमध्ये एक खिडकी सुविधा कक्ष
जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांचे आदेश
पदवीधर निवडणूकीच्या विविध परवानग्यांसाठी तहसील कार्यालयांमध्ये एक खिडकी सुविधा कक्ष जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांचे आदेश
जिल्ह्याला राज्यस्तरीय स्पर्धांचे यजमानपद मिळणे ही अभिमानाची बाब – जिल्हाधिकारी
जिल्हा क्रीडा संकुलाच्या माध्यमातून येणाऱ्या काळात आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार व्हावे यासाठी शासन प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचे प्रतिपादन पालघर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी केले प्रथमतःच पालघरला राज्यस्तरीय हँडबॉल व बॉक्सिंग स्पर्धांचे यजमानपद प्राप्त झाले आहे. या स्पर्धांच्या उद्घाटनावेळी जिल्हाधिकारी बोडके बोलत होते. पालघर जिल्ह्याला प्रथमतः या स्पर्धांचा मान मिळाल्याचा अभिमान असल्याचे जिल्हाधिकारी बोडके यांनी आवर्जून सांगितले.
महाराष्ट्रातील सागर परिक्रमेसाठी संपूर्ण सहकार्य मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थित आढावा बैठक
महाराष्ट्रातील सागर परिक्रमेसाठी संपूर्ण सहकार्य मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थित आढावा बैठक
म्हाडाच्या ऑनलाईन जाहिरीतीसाठी अद्ययावत एकात्मिक लॉटरी प्रणाली
म्हाडाच्या ऑनलाईन जाहिरीतीसाठी अद्ययावत एकात्मिक लॉटरी प्रणाली
अटल भूजल योजना । ‘चला जाणूया नदीला’ अभियानात अटल भूजल योजनेविषयी जनजागृती
अटल भूजल योजना । ‘चला जाणूया नदीला’ अभियानात अटल भूजल योजनेविषयी जनजागृती