महाराष्ट्र शासन योजना

मत्स्यपालन प्रादेशिक संशोधन केंद्र चंद्रपूरात उभारावे : मत्स्यपालन मंत्री सुधीर मुनगंटीवार

नवी दिल्ली, दि. २२ जानेवारी (आजचा साक्षीदार) : गोडया पाण्यातील मत्स्यपालन करण्यासाठी प्रशिक्षक मनुष्यबळ तयार व्हावा, यासाठी प्रादेशिक संशोधन केंद्र चंद्रपूर येथे उभारण्याची मागणी, राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री पुरूषोत्तम रूपाला यांच्याकडे केली.

महाराष्ट्राला 720 किलो मिटरचा सागरी किनारा लाभला आहे. यासह राज्यात गोडया पाण्यातील अंतर्देशीय मासेमारी मोठया प्रमाणात होते. विदर्भात सर्वाधिक गोडया पाण्यात मासेमारी केली जाते. सद्या विदर्भात एकही संशोधन केंद्र नाही. त्यासाठी चंद्रपूर येथे प्रादेशिक संशोधन केंद्र उभारावे, अशी मागणी श्री मुनगंटीवार यांनी केली. केंद्रीय मंत्री श्री रूपाला यांच्या अध्यक्षतेत सागर परीक्रमा योजनेची आढावा बैठक सोमवारी घेण्यात आली. त्या बैठकीत श्री मुनगंटीवार यांनी केंद्रीय मंत्र्यांना निवेदन देऊन मागणी केली.

महाराष्ट्र शासकीय उपक्रम । सरकारी योजना । महाराष्ट्र शासन योजना ।
महाराष्ट्र शासकीय उपक्रम । सरकारी योजना । महाराष्ट्र शासन योजना ।

विदर्भात तळी, मालगुजरी तळी, शेत तळी आदी असे एकूण 30,650 तळी आहेत. यात 1, लाख 87 हजार 249 हेक्टर पाण्याचे क्षेत्र आहे. यातील 50 % टक्के तळयात मासेमारी केली जाते.

चंद्रपूर जिल्ह्यातील पूर्व आणि दक्षिण सीमेला वैनगंगा लागून आहे तर पश्चिम सीमेला वर्धा नदी आहे. याठिकाणी 5,547 जल समिती (वॉटर बॉडीस) असून 25,429 हेक्टर पाणी क्षेत्र आहे. यामधील 29% टक्के तळी मत्स्यव्यवसायासाठी वापरले जातात तर 20% टक्के तळी हे शेत तळे आहेत.

देशातील इतर भागात ज्याप्रमाणे गोडया पाण्यातील मत्स्यपालन प्रादेशिक संशोधन केंद्रे उभारली आहेत, त्याच धर्तीवर चंद्रपूरमध्येही असे संशोधन केंद्र उभारण्यात यावे. यामुळे गोडया पाण्यातील मच्छीमारांचा जलदगतीने विकास होऊ शकेल. माश्यांचे बीजपुरवठा, अद्यावत तंत्रज्ञानाची माहिती ही प्रशिक्षणाव्दारे देऊन कौशल्य विकास करता येईल.

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी मासेमारी जोडधंदा म्हणून अधिक उपयोगी ठरत आहे. विदर्भात मत्स्यबीज समुह केंद्राला (फिश सीड क्लस्टर) वाव आहे. भारतीय कृषीसंशोधन परिषद (ICAR) आणि महाराष्ट्र पशुसंवर्धन आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूरच्या समन्वयाने चंद्रपूर येथे प्रादेशिक संशोधन केंद्र उभारावे अशी मागणी निवेदनात नमुद आहे.

महाराष्ट्रातील सागर परिक्रमेसाठी संपूर्ण सहकार्य मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थित आढावा बैठक

मत्स्यपालन प्रादेशिक संशोधन केंद्र चंद्रपूरात उभारावे : मत्स्यपालन मंत्री सुधीर मुनगंटीवार

मत्स्यपालन प्रादेशिक संशोधन केंद्र चंद्रपूरात उभारावे : मत्स्यपालन मंत्री सुधीर मुनगंटीवार

सकस आहार तिरंगा थाळी स्पर्धेचे उद्घाटन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे पुरस्कार वितरण । राज्य शासन अन्नदाता शेतकऱ्याच्या पाठीशी – मुख्यमंत्री

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे पुरस्कार वितरण । राज्य शासन अन्नदाता शेतकऱ्याच्या पाठीशी - मुख्यमंत्री

जिल्ह्यात केंद्रीय योजनांची अधिक प्रभावीपणे अंमलबजावणी करावी - केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया

जिल्ह्यात केंद्रीय योजनांची अधिक प्रभावीपणे अंमलबजावणी करावी – केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया

जिल्ह्यात केंद्रीय योजनांची अधिक प्रभावीपणे अंमलबजावणी करावी - केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया

गटई कामगार योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

गटई कामगार योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

गटई कामगारांना अस्मानी संकटापासून संरक्षण मिळावे तसेच त्यांची आर्थिक उन्नती व्हावी यासाठी शंभर टक्के शासकीय अनुदानातून गटई कामगारांना पत्र्याचे स्टॅाल देण्याची योजना राबविण्यात येते. गटई कामगार योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अवयवदान जनजागृती रॅलीत २५० अधिक सहभागी । ४० जणांनी केली अवयवदानची नोंदणी

अवयवदान जनजागृती रॅलीत २५० अधिक सहभागी । ४० जणांनी केली अवयवदानची नोंदणी

अवयव दानाचे महत्त्व जनतेमध्ये वाढवून समाजात अवयवदान करणारे दाते निर्माण व्हावे याबाबत जागरूकता वाढवण्यासाठी आज प्रादेशिक परिवहन कार्यालयांच्या वतीने मोटार सायकल रॅली आयोजित करण्यात आली होती. या रॅलीत अडीचशेहुन अधिक विद्यार्थी, बाईकर व नागरिकांनी सहभाग नोंदविला तर यावेळी अवयवदानाबद्दल प्रतिज्ञा घेणाऱ्या ४० दात्यांची नोंदणी करण्यात आली.

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

माज कल्याण विभागांतर्गत कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील दारिदय रेषेखालील भूमिहीन कुटुंबांना शेतजमीन उपलब्ध करून देण्याकरिता

मतदार ओळखपत्र नाही अशा मतदारासाठी पर्यायी कागदपत्र ग्राह्य - जिल्हाधिकारी

मतदार ओळखपत्र नाही अशा मतदारासाठी पर्यायी कागदपत्र ग्राह्य – जिल्हाधिकारी

छायाचित्रासह मतदार ओळखपत्रान्वये मतदाराची ओळख पटत असेल तर मतदार ओळखपत्रातील किरकोळ विसंगती दुर्लक्षीत करण्यात याव्यात. तसेच, छायाचित्रासह मतदार ओळखपत्रावरील विसंगत छायाचित्रामुळे मतदाराची ओळख पटणे व पटविणे शक्य नसल्यास मतदारास उपरोक्त पर्यायी कागदपत्रांपैकी एक ओळख कागदपत्र सादर करणे आवश्यक राहील, अशा सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिल्या आहेत.

शासकीय वसतिगृहासाठी जमीन देऊ इच्छिणाऱ्यांनी संपर्क साधण्याचे आवाहन

शासकीय वसतिगृहासाठी जमीन देऊ इच्छिणाऱ्यांनी संपर्क साधण्याचे आवाहन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृह, भोर या शासकीय वसतिगृहासाठी भोर मुख्यालयापासून ३ कि.मी. अंतरामध्ये खाजगी जागा खरेदी करावयाची असून इच्छूक जमीन मालकांनी ३१ जानेवारी २०२३ पर्यंत संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

महाराष्ट्र एनएसएस NSS च्या 14 विद्यार्थ्यांचा कर्तव्यपथा वरील पथसंचलनासाठी सराव

महाराष्ट्र एनएसएस NSS च्या 14 विद्यार्थ्यांचा कर्तव्यपथा वरील पथसंचलनासाठी सराव

प्रजासत्ताक दिनी होणा-या पथसंचलनात राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबीर सध्या राजधानीत आहे. यामध्ये महाराष्ट्रातील राष्ट्रीय सेवा योजनेचे(एनएसएस) 14 आणि गोव्यातील 2 असे एकूण 16 विद्यार्थी-विद्यार्थीनी कसून सराव करीत आहेत.

महाज्योती नागपूर मार्फत पोलीस-मिलिटरी भरती पूर्व प्रशिक्षण

महाज्योती नागपूर मार्फत पोलीस-मिलिटरी भरती पूर्व प्रशिक्षण

महात्मा ज्योतीबा फूले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), नागपूर या संस्थेमार्फत इतर मागास वर्ग विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी पोलीस-मिलिटरी भरती पूर्व प्रशिक्षण नागपूर व औरंगाबाद या दोन ठिकाणी देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणाची नोंदणी प्रक्रिया सुरु करण्यात आलेली