महाराष्ट्र शासन योजना

समुदाय आरोग्य अधिकारीपदासाठी रविवार दि.२२ रोजी प्रवेश परीक्षा

अकोला, दि. २० जानेवारी २३ (आजचा साक्षीदार) : अकोला परिमंडळासाठी समुदाय आरोग्य अधिकारी या पदासाठी होणारी प्रवेश परीक्षा ही रविवार दि.२२ रोजी अकोला येथे होणार आहे. संबंधित उमेदवारांचे प्रवेश पत्र हे शासनाच्या आरोग्य विभागाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत, असे अकोला मंडळ उपसंचालक आरोग्य डॉ. तरंगतुषार वारे यांनी कळविले आहे.

यासंदर्भात उपसंचालक आरोग्य सेवा अकोला मंडळ यांच्या कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यक्रमा अंतर्गत अकोला परिमंडळासाठी समुदाय आरोग्य अधिकारी या पदाकरीता राज्यस्तरावरुन दि.१२ डिसेंबर २०२२ रोजी जाहिरात देण्यात आली होती. दि.२० डिसेंबर २०२२ पर्यंत अर्ज स्विकृतीची मुदत होती. या पदासाठी अकोल परिमंडळासाठी बरेच अर्ज प्राप्त झाले. अर्जांची छाननी झाली असून रविवार दि.२२ जानेवारी २०२३ रोजी प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे. परीक्षेसाठी पात्र उमेदवारांचे प्रवेश पत्र https://arogya.maharashtra.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आले आहेत. अकोला मंडळासाठी परीक्षा ही अकोला येथे खालील परीक्षा केंद्रांवर होणार आहे.

महाराष्ट्र  शासकीय उपक्रम । सरकारी योजना । महाराष्ट्र शासन योजना ।

परीक्षा केंद्र याप्रमाणे-
१) अकोला/ अमरावती/ यवतमाळ जिल्ह्यांसाठी श्रीमती लक्ष्मीबाई राधाकिसन तोष्णीवाल वाणिज्य महाविद्यालय, रतनलाल प्लॉट, अकोला.
२) बुलडाणा जिल्ह्याकरीता- श्री. शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, शिवाजी पार्क, अकोला.
३) वाशीम जिल्ह्याकरीता- न्यू इंग्लिश हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, रामदास पेठ पोलीस स्टेशन जवळ, अकोला.

समुदाय आरोग्य अधिकारीपदासाठी रविवार दि.२२ रोजी प्रवेश परीक्षा

समुदाय आरोग्य अधिकारीपदासाठी रविवार दि.२२ रोजी प्रवेश परीक्षा

अकोला परिमंडळासाठी समुदाय आरोग्य अधिकारी या पदासाठी होणारी प्रवेश परीक्षा ही रविवार दि.२२ रोजी अकोला येथे होणार आहे. संबंधित उमेदवारांचे प्रवेश पत्र हे शासनाच्या आरोग्य विभागाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत, असे अकोला मंडळ उपसंचालक आरोग्य डॉ. तरंगतुषार वारे यांनी कळविले आहे.

फेब्रुवारी महिन्यासाठी जीवनावश्यक वस्तू वाटप परिमाण

फेब्रुवारी महिन्यासाठी जीवनावश्यक वस्तू वाटप परिमाण

जिल्ह्यासाठी माहे फेब्रुवारी महिन्यासाठी लक्ष्य निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अन्नधान्य, नियंत्रित साखर इ. जीवनावश्यक वस्तूंचे वाटप परिमाण निश्चित करण्यात आले आहे. वाटप परिमाण व दर याप्रमाणे-

रब्बी हंगामाची ई-पीक पाहणी अँपद्वारे पीक पेरा नोंदवण्यासाठी तीन दिवसीय विशेष मोहिम - 20 ते 22 जानेवारी 2023 या कालावधीत मोहिम

रब्बी हंगामाची ई-पीक पाहणी अँपद्वारे पीक पेरा नोंदवण्यासाठी तीन दिवसीय विशेष मोहिम – 20 ते 22 जानेवारी 2023 या कालावधीत मोहिम

शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांची माहिती सहज उपलब्ध व्हावी, पीक नोंदणी प्रक्रीयेत शेतकऱ्यांचा सक्रीय सहभाग वाढवा, कृषी पतपुरवठा धोरण सुलभ व्हावे, पीक विमा आणि पीक पाहणी दावे निकाली काढण्याची प्रक्रिया सुलभ करणे, किमान आधारभूत किंमत योजनेतंर्गत विक्रीसाठी संगती देण्याची सुविधा उपलब्ध करुन देणे, नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास अचूक भरपाई आणि योग्य प्रकारे मदत करणे शक्य व्हावे या उद्देशाने राज्य शासनाने ई-पीक पाहणी उपक्रम सुरु केला आहे.

सेवा प्रणालींमधील सुधारणा सुचनांचा प्रस्ताव पाठवा विभागीय सेवा हक्क आयुक्तांचे निर्देश

सेवा प्रणालींमधील सुधारणा सुचनांचा प्रस्ताव पाठवा विभागीय सेवा हक्क आयुक्तांचे निर्देश

नागरिकांना शासनाच्या विविध सेवा सुविधांचा लाभ देतांना त्या ऑनलाईन व अधिकाधिक पारदर्शक पद्धतीने दिल्या जाव्यात तसेच सध्या देत असलेल्या सेवा प्रणालींमध्ये करावयाच्या सुधारणा सुचनांचा प्रस्तावही पाठवावा असे निर्देश महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोगाचे अमरावती विभागाचे आयुक्त रामबाबू यांनी आज येथे दिले.

आत्माच्या माध्यमातून सेंद्रिय शेतीला बळकटी । शेतकऱ्यांनी परस बागेत का होईना सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला पिकवावा

आत्माच्या माध्यमातून सेंद्रिय शेतीला बळकटी । शेतकऱ्यांनी परस बागेत का होईना सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला पिकवावा

आपल्या शेतीतील उत्पादीत मालामधून रासायनिक घटकांचे प्रमाण रासायनिक खते, औषधी यामुळे वाढून त्याचा मानवी आरोग्यावर अतिशय विपरीत परिणाम होत आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी परस बागेत का होईना सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला पिकवावा, असे आवाहन आत्मा प्रकल्प संचालक शीतल चव्हाण यांनी केले आहे.

राज्य शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कारासाठी प्रवेशिका आमंत्रित - प्रवेशिका 31 जानेवारी पर्यंत स्विकारणार !

राज्य शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कारासाठी प्रवेशिका आमंत्रित – प्रवेशिका 31 जानेवारी पर्यंत स्विकारणार !

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने दरवर्षी उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार दिले जातात. सन 2022 च्या या पुरस्कारांसाठी दि. 31 जानेवारी पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.या स्पर्धेसाठी दिनांक 1 जानेवारी ते 31 डिसेंबर, 2022 पर्यंतच्या कालावधीत प्रसिध्द झालेल्या लेखन, छायाचित्रे, वृत्तकथा यांचा समावेश असावा. या स्पर्धेत फक्त मराठी भाषेसाठी राज्य व विभागीयस्तर पुरस्कार आहेत. इंग्रजी, हिंदी, उर्दू या भाषेतील पुरस्कार तसेच समाज माध्यम आणि स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती पुरस्कार हे केवळ राज्यस्तरीय आहेत.

प्रजासत्ताक दिनी प्लास्टिक ध्वज विक्री व वापरास मनाई

प्रजासत्ताक दिनी प्लास्टिक ध्वज विक्री व वापरास मनाई

26 जानेवारी या राष्ट्रीय प्रजासत्ताक दिनी लहान आकारातील कागदी व प्लास्टिक राष्ट्रध्वजांची विक्री मोठया प्रमाणात केली जाते. शालेय विद्यार्थी व लहान मुले यांच्यासह अनेक व्यक्ती राष्ट्रभक्ती व उत्साहापोटी राष्ट्रध्वज विकत घेतात व त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी इतरत्र टाकून देतात. त्यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होतो. काहीवेळा तसेच विशेष कला व क्रीडा प्रसंगी वैयक्तिकरित्या वापरण्यात येणारे राष्ट्रध्वज फेकले जातात.

निरोगी आरोग्यासाठी तृणधान्यांचे महत्व !

निरोगी आरोग्यासाठी तृणधान्यांचे महत्व !

आपल्या आहारात पौष्टीक तृणधान्याचा समावेश नसल्याने आरोग्याच्या समस्यात वाढ झालेली आहे. निरोगी आरोग्यासाठी आपल्याला संतुलित आहार घेणे आवश्यक आहे. संतुलित आहारात सर्व प्रकारचे धान्य, तृणधान्य, पालेभाज्या, फळे, सुकामेवा आदीचा समावेश असणे गरजेचे आहे. निरोगी आरोग्यासाठी सर्व समावेशक विभिन्नतेचा आहार घेणे तृणधान्यांचे महत्व अत्यंत आवश्यक आहे.

महाराष्ट्र गुंठेवारी विकास अधिनियम-2021 । अनधिकृत भूखंड व बांधकामे नियमाधीन करण्यासाठी आता 30 जुनपर्यंत मुदतवाढ

महाराष्ट्र गुंठेवारी विकास अधिनियम-2021 । अनधिकृत भूखंड व बांधकामे नियमाधीन करण्यासाठी आता 30 जुनपर्यंत मुदतवाढ

महाराष्ट्र गुंठेवारी विकास अधिनियम-2021 । अनधिकृत भूखंड व बांधकामे नियमाधीन करण्यासाठी आता 30 जुनपर्यंत मुदतवाढ

व्यावसायिक व उद्योग यांच्यामध्ये जागृती निर्माण होण्यासाठी इज ऑफ डुइंग बाबत कार्यशाळा संपन्न.!

व्यावसायिक व उद्योग यांच्यामध्ये जागृती निर्माण होण्यासाठी इज ऑफ डुइंग बाबत कार्यशाळा संपन्न.!

व्यावसायिक व उद्योग यांच्यामध्ये जागृती निर्माण होण्यासाठी इज ऑफ डुइंग बाबत कार्यशाळा संपन्न.!